वेध माझा ऑनलाइन - राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत असताना दुसरीकडे बारामती मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिल जात आहे. बारामतीमधील मतदार पवार कुटुंबालाच निवडून देतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले, बारामतीत भाजपकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही. सुप्रिया सुळे यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या वेळी सुप्रिया सुळे थोडक्यात वाचल्या. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही. आमचे प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येकजण यश मिळावं यासाठीच प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि सुरक्षा सर्वसामान्यांना प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment