Friday, July 7, 2023

कोल्हापुरात पाऊस ; राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली ;

वेध माझा ऑनलाइन। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांसह धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा यंदाच्या पावसात पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे या बंधाऱ्यावरून अद्याप धोकादायक वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. शहरात जरी पावसाची उघडझाप  असली तरी ग्रामीण भागात त्याचबरोबर धरण क्षेत्रात संतधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.

No comments:

Post a Comment