Saturday, August 5, 2023

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचा आज १० वा स्मृतिदिन

वेध माझा ऑनलाईन।  कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांचा १० वा स्मृतिदिन आज शनिवारी आहे यानिमित्त आज सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, आप्पासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जयवंत आयुर्वेदीक हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्यावतीने कराड तालुक्यात ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान मोफत सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. अनुक्रमे शेणोली, बेलवडे बुद्रुक, घोगाव, वडगाव व दुशेरे येथे होणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबीरांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment