Saturday, August 5, 2023

कोविडचा एक नवीन व्हेरिएंट सापडला ;

वेध माझा ऑनलाईन। ब्रिटनमध्ये कोविडचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. मात्र, यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मे महिन्यापासून नवीन व्हेरिएंटची सात प्रकरणे आढळली आहेत. तसेच, लोकांना याची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चिंतेची बाब अशी आहे की, देश एका नव्या लाटेच्या तडाख्यात येणार आहे. या नवीन व्हेरिएंटचे नाव EG5.1 आहे, ज्यामुळे ब्रिटनमध्ये कहर होत असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वी या व्हेरिएंटला एरिस म्हणत होते. 

दरम्यान, शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, नवीन कोविड व्हेरिएंट जुन्यापेक्षा जास्त धोकादायक असण्याची लक्षणे नाहीत. अधिकारी त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या नवीन स्ट्रेनच्या प्रादुर्भावमध्ये बार्बेनहाइमर इफेक्ट देखील आहे याशिवाय, अलीकडचे खराब हवामान आणि लोकांची कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळे त्याचा प्रसार होण्यास हातभार लागला आहे.

No comments:

Post a Comment