Thursday, September 14, 2023

कराडात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यां विविध व्हाट्सअप ग्रुपच्या 8 जणांना पोलिसांची नोटीस ; एक व्हाट्सअप ग्रुप बंद ;

वेध माझा ऑनलाइन । पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारांना कराड पोलिसांनी आजच नोटीसा बजावल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर आज विविध व्हाट्सअप ग्रुपच्या 8 जणांवर नोटीसीची कारवाई करण्यात आली आहे व एक व्हाट्सअप ग्रुप बंदही करण्यात आल्याची  माहिती आहे

याबाबत अधिक महिती अशी की, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी कराड पोलीस उपविभागामध्ये विशेष सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यावर कराड शहर व परिसरातील प्राप्त तक्रारी नुसार कारवाई देखील करण्यात आली आहे आक्षेपार्ह पोस्ट टाकून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या शहर पोलिसांनी आज नोटीसा बजावल्या होत्या त्यानुसार वेगवेगळ्या व्हाट्स अप ग्रुपच्या ८ जणांवर नोटीशीची कारवाई झाली आहे. त्यांना पहिल्या टप्प्यांमध्ये पोलीस स्टेशनला बोलवून समज देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर एक व्हाट्सअप ग्रुप बंद देखील करण्यात आला आहे.

पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेशासह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या कालावधीमध्ये सामाजिक स्वास्थ बिघडवणे, मोर्चा काढणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे आशा गोष्टीला बंदी आहे. असे असतानाही काही जणांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. अशा पोस्ट टाकणाऱ्या ८ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून योग्य ती समज देण्यात आली.तसेच एक व्हाट्सअप ग्रुप बंद देखील करण्यात आला आहे.कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्यास त्यावर प्रतिक्रिया न देता पुढील क्रमांकावर ..8482913737.. संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांनी केले आहे

No comments:

Post a Comment