वेध माझा ऑनलाइन। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचे वारे वाहत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत उपोषण केले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीष महाजन, अजित पवार तसेच इतर काही नेते जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेले होते. मराठा समाजाला कुणबी जातप्रमापत्र मिळावे ही मागणी जरांगे पाटलांची होती. उपोषणाला काही दिवस झाल्यानंतर सरकारने उपोषण मागे घेण्यासाठी सांगितले. मात्र जरांगे पाटील आपल्या मतावर ठाम होते. मात्र 40 दिवस सरकारने वेळ द्या असे सांगितले होते. मात्र अजूनही यावर कुणीच काही बोलत नाही.
मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. यासाठी आता ते राज्यातील ठिकठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. रात्री एक म्हणू नका की दोन म्हणू नका त्यांच्या सभांना महिला, अपंग लोक देखील उपस्थिती दाखवत आहेत. अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत त्यांनी ओबीसी वर्गात मराठा समाजाला सामावून सरकार घेत नाही. कारण सरकारमध्ये काही ओबीसी नेते आहेत ते मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेत नसल्याचे जरांगे म्हणाले. जरांगे पाटील सभा घेत आहेत यावरून 7 कोटी रुपये कुठून आले असा सवाल छगन भुजबाळांनी जरांगे पाटलांना विचारला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
मनोज जरांगे पाटील हे सभा घेत आहेत. सभा घेण्यासाठी निधी कुठून आला ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. 100 एकराची शेती साफ करण्यासाठी सभा घेण्यासाठी 7 कोटींचा निधी कुठून आला? असा सवाल केला. आपल्याला आरक्षण मिळाले म्हणजे आपण श्रीमंत झालो असे नाही. अजूनही काही लोकं झोपडपट्टीत राहतात त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे.
मराठा आरक्षणात मिठाचा खडा टाकू नये
मराठा समाजातील सरसकट लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी उपोषण करत असताना केली होती. यातून मार्ग काढण्यासाठी महिन्याभरात सरकारकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राज्यातील ओबीसी समाजाच्या वतीने आक्षेप घेण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणात कुणीही वाटेकरी होऊ नका, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली आहेत. यातूनच मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. जरांगे म्हणाले, आमच्याकडे मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याची कागदपत्रे आहेत. यात मिठाचा खडा टाकू नये असे जरांगे पाटील म्हणाले.
No comments:
Post a Comment