Friday, October 6, 2023

कोयना धरण भरण्यासाठी आता 8 टीएमसी पाण्याची गरज ;

वेध माझा ऑनलाइन। गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा पाणीसाठा 94.19 टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता 8 टीएमसीची पाण्याची गरज आहे.सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. दोन दिवसपासून पावसाने उघडीप दिली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा, बामणोली भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून शुक्रवारी सकाळ पर्यंत 2154’11” इतकी धरणातील पाणी पातळी झाली आहे.

No comments:

Post a Comment