वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्ह्यातील किरकोळ औषधे परवाना धारकांनी त्यांच्या दुकानात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असा आदेश प्रशासनाने काढला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त म.स.जवंजाळ-पाटील यांनी दिली.
गुंगी कारक औषधांच्या अवैध विक्रीवर लक्ष ठेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडू यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.या आदेशात सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज आवश्यकते प्रमाणे औषध निरीक्षक, बालकल्याण पोलीस अधिकारी आणि शासनाने अथवा जिल्हादंडाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी,कर्मचारी यांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देणेही बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment