उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. राज्यात भाजपचा ते मोठा चेहरा आहेत.अशात राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आगामी काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला बोलावले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता आहे.
भाजपचे नेते जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे. या जागेवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी?
लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपला फारसं यश मिळालं नाही. महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. यानंतर फडणवीस यांनी राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करुन भाजप पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेची मोट पुन्हा नव्याने बांधायची असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. यासाठी पक्षश्रेष्ठींनी राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, अशी विनंती देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.अशात फडणवीस यांना थेट दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार?
भाजपकडून त्यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याची माहीती समोर येत आहे.त्यामुळे आता फडणवीस दिल्लीला कधी जाणार?, याबाबत सर्वांच्या नजरा लागून आहेत.
राज्यातील उत्कृष्ठ राजकारणी म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांनी पक्षाला सत्तेत आणून अनेक अडचणीमधून पक्षाला बाहेर देखील काढले आहे. त्यांची रणनीती व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कौशल्य बघून पक्षश्रेष्ठी आता त्यांच्या अनुभवाचा केंद्रासाठी फायदा करून घेऊ शकतात.
No comments:
Post a Comment