वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर स्थिर आहेत.
गुरूवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 25 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत 3 हजार 788 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 485 मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात पाथरपूंज नंतर नवजा येथेच सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला २४ तासांत ८४ तर दोन महिन्यांत ४ हजार ९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे
No comments:
Post a Comment