सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी अधिक चर्चेत राहिली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होतं. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचं स्व.यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं 21-0 असा विजय मिळवला. त्यानंतर शहरातून निघालेल्या विजयी मीरवणुकीतून बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या विधांनसभेवेळी मारलेल्या शड्डूला...शड्डूनेच उत्तर देत.. . ठोक आता शड्डू असे म्हणत पुन्हा चॅलेंज दिले आहे...
दरम्यान बाळासाहेब पाटील यांनी विजयानंतर केलेल्या त्यांच्या भाषणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळचा एक प्रसंग सांगितला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गना केल्या, आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार, आम्ही जिंकणार, नाही म्हटलं तरी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती. सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलावरुन कारखान्याकडे बघून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडं बघून शड्डू ठोकला गेला. 32 हजार लोकांशी लढत होती ते विसरले. कुणापुढं उन्माद वापरतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त वेळीच करणं आवश्यक आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले .
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या प्रचार सभांमधून घोरपडे व त्यांचे अनुयायी यांनी शड्डू ठोकत बाळासाहेब पाटील यांना चॅलेंज देत आमदारकीची निवडणूक आम्ही जिंकणारच... अशी घोषणा केली होती... त्यावेळी त्यांचा तो शड्डू चांगलाच चर्चेत राहिला होता... दरम्यान निवडणूक पार पडली घोरपडे मोठ्या मतांनी निवडून आले... आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढला... त्यांनी शड्डू ठोकत सह्याद्री कारखाना निवडणुकीत देखील लक्ष घालण्याचे ठरवले...त्यांचा कॉन्फिडन्स आणखी वाढला जेव्हा त्यांना दक्षिण च्या उदयदादाची साथ मिळाली...
कारखान्याची ही निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलची सरशी झाली...घोरपडे यांच्या पॅनेलचा पराभव झाला...
दरम्यान या कारखान्याच्या निवडणुकीदरम्यानचा प्रचार करताना देखील घोरपडे म्हणाले होते...6 तारखेला मी मंगळवार पेठेत येऊन गुलाल उधळून पुन्हा शड्डू ठोकणार आहे... मात्र त्यांचा पराभव झाला... दरम्यान या कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे यांच्या त्या शड्डूच्या चॅलेंजला आपल्या शड्डूने उत्तर देत विजयी मिरवणुकीतून ...आता ठोक शड्डू... असे चॅलेंज पुन्हा दिले आहे...हे चॅलेंज थेट मनोज घोरपडे यानाच दिले आहे...
त्यामुळे आमदार घोरपडे पुढील कोणत्या निवडणुकीतून या शड्डूचे उत्तर ...आपल्या आणखी एका शड्डूने देतात... हेच आता पहावे लागणार आहे...
No comments:
Post a Comment