वेध माझा ऑनलाइन
समाजसेविका अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र पाठवलं आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे. धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.
राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरु केला होती. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. याचसंबंधी अंजली दमानिया यांनी राज्याच्या लाचलुचपत विभागाकडे पत्र लिहून तक्रार केली होती. त्याचसंबंधी आता अंजली दमानिया यांना हजर राहावं लागणार आहे. दमानिया चौकशीस हजर न राहिल्यास त्यांचे या प्रकरणात काहीही म्हणणे नाही असे समजून सदरचा अर्ज दप्तरी दाखल करण्यात येईल असेही पत्रात म्हटले आहे.
कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकरी बळकटीकरण योजना राज्यात सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना मोठा भ्रषाचार झाल्याचा आरोप केला गेला. अंजली दमानिया यांनीही नंतर त्यासंबंधी कागदपत्रं जाहीर करुन धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले होते.
No comments:
Post a Comment