Monday, June 2, 2025

लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांची कबुली ; राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ; अजित पवारांनी राजीनामा द्यावा ; विरोधकांची मागणी ; काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन
लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी नुकतीच दिलेली कबुली सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक सरकारी कर्मचारी आणि अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेतील कोट्यवधी रुपये लाटल्याचं उघड झाल्यानंतर आता अर्थमंत्री अजितदादांनी चूक कबुल केली त्यामुळे ही कबुली सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे तर अनेक लाडक्या भावानी-स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले.  अर्थ खात्यातून हे पैसे गेले आहेत त्यामुळे अजित पवारांनी त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजना
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली योजना. विधानसभा निवडणुकीत महायुतीला आधार दिलेली योजना. महाराष्ट्राच्या तिजोरीवर सर्वाधिक भार पडणारी योजना. इतर खात्यांचा निधीही वळवण्याची गरज पडणारी योजना... अशा या योजनेवरून गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण ढवळून निघाल्यानंतर आता खुद्द अर्थमंत्री अजित पवारांनी एक मोठं कन्फेशन दिलं.
अजित पवार म्हणाले...
"ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली, तेव्हा वेळ कमी होता. दोन-तीन महिन्यांतच निवडणुका होत्या. सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी जेवढा वेळ हवा तेवढा नव्हता. तरीही आवाहन केलं होतं. जे बसत नाहीत ते अर्ज करणार नाहीत, असं वाटत होतं. दिलेले पैसे घेण्याचा प्रश्न येत नाही. मान्य आहे ना... चुकलं आता... नको होतं करायला.
चूक झाली हे तर अजितदादांनी मान्य केलंच. मात्र सध्या वेगवेगळ्या खात्यातून निधी वळवल्यामुळं उमटणाऱ्या नाराजीबाबतही खुलासा केला. हा खुलासा करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू ढकलला. लाडकी बहीण योजनेत सगळ्यांना अर्ज मागवले होते. त्यामध्ये सरकारी कर्मचारी यांनी लाभ घेतला आहे. निधी वळवला याबाबत मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले आहे. जे आरोप करतात त्यानी मुख्यमंत्री यांना विचारावे असं अजित पवार म्हणाले. 

अजितदादांची चुकीची कबुली
दिल्यामुळं विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. लाडकी बहिण च्या नावाने आर्थिक घोटाळा झाला आहे, याचे प्रायश्चित्त अजित पवार यांनी घेतले पाहिजे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनेक लाडक्या भावानी-स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले.  अर्थ खात्यातून हे पैसे गेले आहेत त्यामुळे अजित पवारांनी त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

No comments:

Post a Comment