वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्व बैठक घेतली आहे. ही बैठक स्वतंत्रपणे करण्यात आली असून यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत 'वन टू वन' चर्चा केली. मात्र, प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे शिंदेंचे सर्वच्या सर्व अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या या बैठकीत प्रत्येक खात्याचा आढावा घेतला. खात्याचे काम कसे सुरू आहे? किती कामे केली किती करायची आहेत? निधी संदर्भात काही अडचणी आहेत का? इतर कोणती अडचण आहे का? भविष्यात तुमच्या खात्यामधून कोणते महत्वाचे काम हाती घेणार? अशा सर्व बाबींची माहिती एकनाथ शिंदे यांनी घेतली. लोकोपयोगी कामांवर भर द्या, लवकरात लवकर कामे पूर्ण करा, फाइल पेंडिंग ठेऊ नका, सामान्य लोकांपर्यंत पोहोचा असा सल्ला देखील शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला.
अजित पवार आमच्या विकास कामांवर खोडा घालत आहेत, असं म्हणत शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अजित पवारांबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत आढावा घेतली आहे. या बैठकीत मंत्र्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आवाज उठवलाय.
No comments:
Post a Comment