वेध माझा ऑनलाइन
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम, अटींचे पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशाळगडवर जाणाऱ्या सर्वच भक्तांना अशी कुर्बानी देता येणार आहे.
गेल्या वर्षी विशाळगडवर झालेल्या वादामुळे अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या पार्श्वभूमीवर ईदच्या कुर्बानीची परवानगी मिळणार की नाही याबद्दल साशंकता होती. ईदच्या दिवशी विशाळगडवर कुर्बानीची परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याला आता परवानगी देण्यात आली आहे
गेल्या वर्षी 14 जुलै रोजी विशाळगडवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन दंगल घडली होती. त्यानंतर काही काळ या गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली. नंतरच्या काळात या ठिकाणी कुर्बानी देण्यावरही नियंत्रण आलं. गेल्या वर्षी विशाळगडवर जो उरुस झाला त्यावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आली होती. या वर्षीच्या ईदच्या निमित्ताने विशाळगडावर कुर्बानीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली होती. त्यावर हायकोर्टाने ही परवानगी दिली आहे.
No comments:
Post a Comment