Tuesday, June 3, 2025

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्ता कधी मिळणार ? काय म्हणाल्या अदिती तटकरे?

वेध माझा ऑनलाइन
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात असल्याचं देखील म्हटलं. लाडक्या बहिणींना ज्या प्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यात आला होता त्याप्रमाणेच मे महिन्याचा हप्ता दिला जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. 

मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात वितरित केला जाईल. लाडक्या बहिणींना आश्वस्त करायचं आहे की जसा एप्रिल महिन्याचा थेट खात्यात जमा झाला होता तसाच मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं समोर आलं होतं. त्याबाबत विचारल असता आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. तीन चार महिन्यापूर्वी आम्ही बारकाईन स्क्रूटिनी करण्यात आली. त्या तपासणीत लक्षात आले होते की सरकारी महिला कर्मचारी लाभ घेतायत. शासकीय कर्मचाऱ्यांचा 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा मिळाला होता. त्यातील 2 ते अडीच हजार कर्मचारी लाभ घेत होते. जेव्हा ते लक्षात आलं होतं तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.  

No comments:

Post a Comment