Saturday, July 26, 2025

कराडमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत सेना-भाजप युती होणार का? वेध-माझा च्या प्रश्नावर आमदार डॉ अतुलबाबांची प्रतिक्रिया काय ?


वेध माझा ऑनलाईन ।
कराडमध्ये सेना भाजप पक्षाची युती येत्या कराडच्या नगरपरिषद निवडणुकीत पहायला मिळणार का? या वेध - माझा च्या प्रश्नावर आमदार अतुल भोसले म्हणाले... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितले आहे की जिथं शक्य आहे त्याठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत... त्यामुळे आमची भूमिका स्पष्टच आहे. शिवाय आमचे संबंध चांगले आहेत. समंजसपणाने आम्ही येणाऱ्या निवडणुकीत मार्ग काढू अस म्हणत जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचे संकेत आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी आज दिले... मात्र कराडमध्ये पालिका निवडणुकीत ही युती होणारच...असे ठामपणे आमदार भोसले आजतरी म्हणाले नाहीत...

श्रावण महिना सुरू आहे. त्याअगोदरच्या आषाढ महिन्यात शहरात झालेल्या काही आखाड्या मोठ्या चर्चेत आल्या. त्यादरम्यान माजी आमदार बाळासाहेब पाटील व आमदार अतुल भोसले यांचे फोटो एकत्रपणे फ्लेक्सवर झळकवत एक आखाडी शहरात पार पडली. त्या फोटोवरून कराडच्या राजकारणात मनोमिलनाचे राजकारण होण्याचे संकेत मिळाले अशी चर्चा सुरू झाली.याला झालेल्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. त्या निवडणुकीत पक्षाची झूल बाजूला ठेवत डॉ अतुल भोसलेना एक मैत्रीपूर्ण मदत झाली व त्यानंतर त्यांना मोठ्या लिडने आमदारकी मिळाली अशी चर्चा होती
त्याचाच धागा पकडत होणाऱ्या पालिका निवडणुकीत डॉ अतुल भोसलेकडून त्याचीच मैत्रीपूर्ण परतफेड होणार का? अशा चर्चा सुरू असतानाच शहरात पार पडलेल्या "आखाडया' नी व काही ठिकाणी झलकलेल्या फ्लेक्सवरील आजी माजी आमदारांच्या फोटोनी शहरातील पालिका निवडणुकीसाठी नव्याने होणाऱ्या मनोमिलनाचे संकेत मिळाले असे बोलले गेले...त्याच अनुषंगाने आज आमदार भोसले स्टेडिउमवर पहाणी करण्याकरिता आले असता ,त्यांना कराडच्या पालिका निवडणुकीत युती म्हणून लढणार का?असे  विचारले असता कराडमध्ये पालिका निवडणुकीत ही युती होणारच...असे ठामपणे आमदार भोसले आजतरी म्हणाले नाहीत...ते म्हणाले...जिथं शक्य आहे त्याठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, समंजसपणाने मार्ग काढू... 
मग आता याचा अर्थ काय घ्यायचा? अशी आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

कराडच्या स्टेडियमच्या पुनर्निर्माण प्रक्रियेला सुरवात होत आहे त्या अगोदर त्याठिकाणची पहाणी करून विविध क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंबरोबर चर्चा करण्यासाठी आमदार अतुल भोसले त्याठिकाणी आले होते
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला 
त्यांच्यासह शिवसेना जिल्हा समनवयक राजेंद्रसिह यादव देखील तेथे हजर होते 

यावेळी आमदार भोसले म्हणाले नव्याने होणारे कराडचे स्टेडियम देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर कराडचे नाव उजवल व मोठे करणारे ठरेल . हे स्टेडियम स्वप्नवत होणार आहे यात शंका नाही. राज्य शासनाकडून 10 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आले आहेत. पैशाची काळजी करायचे कारण नाही.  कसलीही अडचण येणार नाही. राज्य व देश, पातळीवरील खेळाडू तयार होण्यासाठी याद्वारे मदत होणार आहे, त्या दर्जाचे काम व सर्व सुविधा याठिकाणी निर्माण होतील यासाठी मी सूचना केल्या आहेत. स्टेडियम तयार होताना क्वालिटी मध्ये कसलेही कोंप्रमाईज केले जाणार नाही, दर्जेदारच काम होईल असा ठाम विश्वास आमदार भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान जोपर्यंत या स्टेडियम चे काम चालू राहणार आहे तोपर्यंत खेळाडूंना पर्यायी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही आमदार भोसले यावेळी म्हणाले

राजेंद्रसिह यादव म्हणाले कराडचे स्टेडियम देशात आदर्शवत असे खेळाडूंसाठीचे संकुल म्हणून नावारूपास येईल स्टेडियम तयार होईपर्यंत खेळाडूंना खेळण्यासाठी आपण इतर दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहोत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील यादव यांनी यावेळी केले

यावेळी शहरातील काही खेळाडू व प्रशिक्षक यांच्यासह लोकशाही आघाडी, शिवसेना, तसेच भाजपचे काही माजी नगरसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असणारे काहीजण देखील यावेळी उपस्थित असल्याचे दिसले. 

No comments:

Post a Comment