कराड शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील कोल्हाटी समाज वस्तीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याबरोबरच त्या परिसरातील लाईट व गटारची कामे करण्यात यावी अशी मागणी युवा नेते विनायक कदम यांनी शिवसेनेचे सातारा जिल्हा समनवयक राजेंद्रसिह यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या सर्व कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ व ही कामे लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही राजेंद्रसिह यादव यांनी यानिमित्ताने दिली यावेळी कोल्हाटी समासासह वार्ड क्रमांक 2 मधील नागरिक उपस्थित होते
दरम्यान राजेंद्रसिह यादव याना, विनायक कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की...
कराड नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक दोनमध्ये कोल्हाटी समाजाची वस्ती आहे. या वस्तीत अनेक ठिकाणी आतील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी साचते व चिखलामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना, तसेच रहिवाशांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून आपण माननीय नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभागाशी पाठपुरावा करून या रस्त्यांचे तातडीने काँक्रीटीकरण करून देण्यासाठी प्रयत्न करावा त्यामुळे या भागातील नागरिकांचा मोठा प्रश्न सुटेल व सर्वांना मोठा दिलासा मिळेल असा आम्हाला विश्वास आहे असे सदर निवेदनात म्हटले आहे
विनायक कदम हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर दिसतात त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे त्यांनी कोरोनात केलेल्या कामाची नेहमीच मोठी चर्चा होत असते नुकतेच त्यांनी वार्डातील नवमतदार नोंदणीचा यशस्वि कार्यक्रम घेत पक्ष नेतृत्वाकडून वाहवा मिळवली त्यांनी वार्डातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी पालिकेत जाऊन मागच्या आठवड्यात निवेदन दिले होते त्यानंतर पालिकेने तत्काळ त्याठिकाणच्या कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदि केली होती नुकतीच त्यांनी वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यात असणारे खड्डे बुजवण्याची मोहीम नुकतीच राबवली आहे आणि आता त्यांनी या परिसरात काँक्रीट रस्ते वीज व गटर ची मागणी करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे
दरम्यान राजेंद्रसिह यादव यांनी त्या परिसरातील रस्ते व गटरच्या दुरावस्थेची पाहणी केल्यानंतर विनायक कदम यांनी मागणी केल्याप्रमाणे या भागात काँक्रीट रस्ते गटर तसेच लाईटची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक तो निधी शासनाद्वारे उपलब्ध करून देऊ व लवकरात लवकर ही कामे मार्गी लावू असे लगोलग तेथेच सांगून टाकले
यावेळी माजी नगरसेवक गजाभाऊ कांबळे गुंड्याभाऊ वाटेगावकर सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम विनोंद शिंदे ओंकार मुळे सुधीर एकांडे तसेच शूभम कांबळे नरेंद्र लिबे गणेश आवळे प्रमोद पवार नूरुल मुल्ला सुजित पवार बाबा जावळे विशाल जावळे आकाश पाटणकर सागर जावळे (सावळ्या) कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment