कराड शहरातील संपूर्ण जाधव गटासह एकूण 16 जनशक्तीचे समर्थक आज सकाळी मुंबईला रवाना झाले उद्या जनशक्ती आघाडी आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत त्यापूर्वी आजच्या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी जाधव गट आपल्या जनशक्तीच्या सहकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाला आहे
दरम्यान मंगळवारी हा प्रवेश मुंबईत होणार असे नक्की झाले होते या विषयाबाबत आमदार अतुल भोसले यांनी जाधव यांच्याशी चर्चाही केली होती ती चर्चा यशस्वी झाली होती त्यासाठी माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी मध्यस्थी केली होती त्यानुसार आज संपूर्ण जनशक्ती आघाडीचे सर्व मेम्बर्स मुंबईला रवाना झाले आहेत उद्या मंगळवारी हा प्रवेश होणार आहे
कराडच्या राजकारणात ऐन दिवाळीत आता रंग भरू लागले आहेत शहरात नगराध्यक्ष पदासाठी ओपन आरक्षण पडले असल्याने या निवडणुकीत अनेकजण इच्छुक आहेत त्यातच माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव यांच्या समवेत माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्या मध्यस्थीने काही दिवसापूर्वी बैठक पार पडली होती आमदार डॉ अतुल भोसले हे स्वतः बैठकीस हजर होते बैठकीतील चर्चेनंतर या महिन्याच्या अखेरीस जाधव गट संपूर्ण जनशक्ती आघाडीसह भाजप मध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळाली होती
दरम्यान शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजप सहित शिवसेना व काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांची गर्दी आहे तसेच आणखी बरीच नावे चर्चेत आली आहेत त्यामध्ये या रेसमध्ये किती जण राहतात व कितीजण नुसतीच चर्चा करतात हे लवकरच कळणार आहे त्यातच शहरांतील जाधव गटाची एन्ट्री भाजप मध्ये होणार अशीही चर्चा बरेच दिवस होत आहे मात्र भाजप बरोबर जाधव गटाची बैठक होऊन उद्या (मंगळवारी) संपूर्ण जनशक्ती चा मुंबईत भाजप प्रवेश होईल यावर आता शिक्का मोर्तब झाले आहे
अरुण जाधव शारदाताई जाधव व आशुतोष जाधव यांच्यासह एकूण 15 ते 16 प्रमुख मान्यवर हा प्रवेश करतील असे वृत्त आहे
या सर्वांनी भाजप मध्ये यावे यासाठी स्वतः आमदार डॉ अतुल भोसले प्रयत्नशील व इच्छुक आहेत आणि त्यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे जनशक्तीचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी यासाठी यशस्वी मध्यस्थी व प्रयत्न केले आहेत.
No comments:
Post a Comment