Wednesday, November 5, 2025

कराड पालिका निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर एकत्र येण्याचे बाळासाहेब पाटील यांचे संकेत ;म्हणाले...समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता ;

वेध माझा ऑनलाईन
लोकशाही आघाडी शहरातील सर्व प्रभागमध्ये आपले उमेदवार देण्यास सक्षम आहे याबाबद्दल कोणी मनात शंका बाळगण्याचे कारण नाही मात्र समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे... समविचारी असणार्यांशी आपण चर्चाही करणार असल्याचे सांगत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी या निवडणुकीत जुळवून घेण्याचे संकेत दिले!
शहराच्या शांततामय सहजीवनासाठी "माझं गाव कराड...मी गावासाठी'... ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे असे आवाहन करत आपण या निवडणुकीत तरुणांना संधी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले 

कराड पालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे त्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सारडा लॉन याठिकाणी लोकशाही आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते
यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील माजी अध्यक्ष सुभाषकाका पाटील माजी नगरसेवक सौरभ पाटील, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, माजी नगराध्यक्षा ऍड विद्याराणी साळुंखे, सौ हिंगमीरे तसेच सर्व माजी नगरसेवक,नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

माजी मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले...
कराड गावाला ऐतिहासिक आणि राजकीय परंपरा आहे आपलं गाव म्हणजे कोकण तसेच पंढरपूर सोलापूर भागाला जोडणारा मुख्य भाग आहे...कराड हे मोठ्या दळणवळणाचे केंद्र देखील आहे...पुण्यानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील कराडची ओळख आहे...
स्व यशवंतराव चव्हाण यांचाही वरदहस्त या शहराला मिळाला...हे माझं गाव आहे या भावनेने त्यांनी काम केलं...
कराडची सेवा स्व पी डी पाटील साहेबांनी 42 वर्षे नगराध्यक्ष म्हणून केली...स्व पी डी पाटील साहेबांनी विकासात्मक ड्रीष्टीकोन ठेवत शहराचा लौकिक वाढवला... त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शहराचा विकास केला...सर्व लोकांचीही त्यांना साथ मिळाली...कालांतराने लोकशाही आघाडी म्हणून आपण पालिका राजकारणात पुढे आलो आणि शहराची सेवा करत आहोत...
आपल्या शहराला कृष्णा कोयनेचा आशीर्वाद आहे त्यामुळे याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण नाही, तसेच प्रदूषणही नाही... शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था चांगल्या अवस्थेत आहे... पालिकेची इमारत देखील चांगल्या अवस्थेत आहे... 
शहरात काम करत असताना लोकशाही आघाडीने शहराचा विकास  स्व पी डी पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातत्याने केला आहे... पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना तसेच कोरोना काळातही लोकांसाठी लोकशाही आघाडीने चांगले काम केले आहे... 
मतदारसंघ पुनर्ररचनेनंतर मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कराड उत्तर चे प्रतिनिधित्व केले... मात्र आपल्या शहरासाठी काम करता आले नाही याची खंत मनात होती... शरद पवार साहेबांनी मधल्या काळात मला जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले, त्यामुळे मी शहराला भरगोस निधी देऊ शकलो... दुर्दैवाने मंत्रिपद अधिककाळ मिळाले नाही त्यामुळे अधिक काम करता आले नाही तरी त्या कालावधीत मला शहरासाठी भरीव काम करता आले असेही ते म्हणाले... 
समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे... असेही त्यांनी सांगितले ...
काल निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूका जाहीर केल्या आहेत...दुबार मतदानाचा मुद्दा यानिमित्ताने देशभर गाजला... काल कोर्टात याबाबतची याचिका फेटाळली गेली आणि सायंकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली... आता निवडणूक लागली आहे... आपल्याला कालांतराने राजकीय भाष्य करावे लागणार आहे...मात्र सध्या ती वेळ नाहीये... प्रत्येकाने आपला प्रभाग आणि मतदारयाद्या यावर लक्ष केंद्रित करत काम करायचं आहे... निवडणुकीदरम्यान काहीही वावड्या उठतील... त्याकडे लक्ष न देता... आपल्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत... असेही ते यावेळी म्हणाले...

दरम्यान यावेळी उपस्थित 7 ते 8 मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत यावेळी आपली स्पष्ट मते मांडली...सूत्रसंचालन अडव्होकेट प्रताप पाटील यांनी केले, युवा नेते व राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी आभार मानले

Tuesday, November 4, 2025

काँग्रेस महाविकास आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असेल, मात्र आघाडी नाही झाली तर, स्वबळावर लढणार — वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू ;अमित जाधव यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. शहरात “काँग्रेसचे अस्तित्व आहे का?” अशी चर्चा सध्या सुरू असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निर्णायक मते मिळाल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रियपणे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू मात्र आघाडी नाही झाली तर स्वबळावर लढू असे काँग्रेस चे तालुकाध्यक्ष अमित जाधव म्हणाले आहेत 

 कराड शहर काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक तयारी केली जात आहे.
“जरी काँग्रेससाठी सध्या संघर्षाचा काळ असला, तरी पक्षाची वैचारिक परंपरा आणि जनतेशी असलेले नाते या संघर्षातून निश्चितच नवा मार्ग काढेल,” असा विश्वास काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष ऍड. अमित जाधव यांनी व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले की, “कराड शहरात काँग्रेसचा भक्कम कार्यकर्ता वर्ग आहे. विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन करेल.”

आमदार अतुलबाबा जिद्दीला पेटले ; म्हणाले... यापूर्वीचा नगराध्यक्ष भाजपचा होता, याहीवेळी भाजपचाच होणार...

वेध माझा ऑनलाईन।
मागील निवडणुकीत नगराध्यक्ष भाजपचाच होता याहीवेळी भाजपचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीच्या सर्व लोकांनी प्रयत्न करावा अशी माझी ठाम भूमिका आहे त्यासाठी मी संबंधित प्रत्येकाशी चर्चा करणार आहे
आणि त्यासाठीच मी महायुतीच्या सर्व प्रमुख लोकांशी बोलणार आहे त्यात शिंदे गट असेल अजितदादा गट असेल तसेच शहरातील काही आघाड्या असतील त्यांच्याशी चर्चा करून भाजप चा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडून आणण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत शहरात सलोखा राहिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे
या मतदार संघाने भाजपवर विश्वास ठेवून मला आमदार म्हणून जबाबदारी दिली आणि माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला त्याचप्रमाणे आता महायुतीच्या माध्यमातून भाजपचाच नगराध्यक्ष व्हावा यासाठी माझे प्रयत्न असतील असे ठाम मत आमदार डॉ अतुल भोसले यांनी कराडच्या सर्किट हौस याठिकाणी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले

ते म्हणाले 
भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे पक्षाच्या धोरणानुसार पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला त्याठिकाणी स्थान देणे गरजेचे आहे त्यानुसार आम्ही पक्षात येणार्याला येथे स्थान देत आहोत मात्र मी त्यापैकी कोणालाही नगराध्यक्ष पदासाठी शब्द दिलेला नाही भाजप मध्ये तशी पद्धत नाही वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेऊन उमेदवार जाहीर करतील आपण सर्वांनी त्याचा प्रचार करून भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे असेही ते म्हणाले 

दुबार मतदारांचं काय ? निवडणूक आयोगाकडून डबल स्टारचा तोडगा...

वेध माझा ऑनलाईन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केली. या घोषणेनुसार आता राज्यात एकूण 246 नगपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यात 15 नव्या नगरपंचायती आहेत. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्याआधी महाविकस आघाडी तसेच मनसेने मतदार याद्यांत घोळ आहे. अनेक मतदार दुबार आहे, असा आरोप करत मतदार याद्या स्वच्छ करा आणि मगच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणू घ्या, अशी मागणी केली होती. विरोधकांच्या याच आक्षेपाला झुगारून आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. सोबतच दुबार मतदारांचा घोळ मिटावा यासाठी एक तोडगा काढला आहे.
मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर मतदारांना त्यांचे नाव शोधता येईल. याशिवाय मतदारांच्या सोईसाठी एक विशेष अॅपही विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येईल. सोबतच त्यांच्या मतदान केंद्राचाही शोध घेता येईल. उमेदवार कोण आहे, त्यांच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत याचाही शोध मतदारांना घेता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
तसेच, मतदार याद्यांतील संभाव्य दुबार नावांचीही राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या त्यांच्या सिस्टिमवर एक टूल विकसित केले आहे. याच टूलच्या मदतीने प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य मतदाराच्या नावापुढे डबल स्टार दिसेल, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Monday, November 3, 2025

सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर कराड पालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 7 मधून रिंगणात उतरणार ! ;

वेध माझा ऑनलाईन
सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी कराडच्या प्रभाग क्रमांक 7 मधून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वेध माझा शी बोलताना म्हटले आहे

अजय उंडाळकर हे गेली 15 वर्षे सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरात काम करत आहेत ते कोणाला कसलीही अडचण असेल तर मदतीसाठी पुढे असतात 
त्यांचे समाजकार्य अनेकवर्षं सातत्याने प्रभाग क्रमांक 7 मध्ये सुरू आहे कोविड मध्ये त्यांनी स्वतः त्या परिसरात प्रतिबंधक औषध फवारणी करण्यासाठी प्रयत्न केले होते लसीकरण मोहीम असेल तसेच मतदार नोंदणी मोहीम असेल तसेच विविध  शासकीय योजनांचा जनतेला लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न दिसले आहेत 
त्यामध्ये शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळऊन देण्यासाठी त्यांनी महिला वर्गास सहकार्य केले आहे तसेच वयोश्री योजनेचा लाभ मिळण्यासाठी देखील नागरिकांना त्यांचे सहकार्य मिळाले आहे विविध योजनांची माहिती त्यांनी वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवली आहे
त्यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार देखील अनेक सामाजिक उपक्रमे राबवत उंडाळकर यांच्या कार्याचा आलेख उंचावत ठेवताना नेहमीच दिसतो 
उंडाळकर यांच्यावतीने सोमवार पेठेत सीसीटीव्ही कॅमेरे  बसवण्यात आले आहेत उंडाळकर यांच्यावतीने 7 अणि त्यांच्या मित्र परिवाराच्यावतीने 6 असे मिळून एकूण 13 सीसीटीव्ही कॅमेरे याठिकाणी बसवण्यात आले आहेत त्यासाठी उंडाळकर यांनी पुढाकार घेतला आहे 

उंडाळकर यांचा दुधविक्री व्यवसाय आहे त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यातूनच आर्थिक बचत करत सामाजिक कार्यासाठी ते आपली तरतूद करून स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रमांना मूर्त स्वरूप देताना दिसतात त्यांना असणारी सामाजिक कार्याची आवड एवढंच त्यामागाचे कारण आहे यांनी यावेळी प्रभाग क्रमांक 7 मधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे हा प्रभाग ओपन पडल्यानंतर त्यांनी याठिकाणी फटाके वाजवून आनन्द व्यक्त केला होता प्रभाग क्रमांक 7 मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे


Sunday, November 2, 2025

युवा नेते साईभक्त संजय चन्ने प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवणार; संजय चन्ने यांच्या उमेदवारीची शहरात जोरदार चर्चा;

वेध माझा ऑनलाईन।
कराडातील सामाजिक कार्यकर्ते तसेच साईभक्त व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची संपूर्ण कराड शहरात ओळख आहे असे युवा नेते संजय चन्ने यांनी कराडच्या प्रभाग क्रमांक 8 मधून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वेध माझा शी बोलताना म्हटले आहे

संजय चन्ने हे गेली 15 वर्षे सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरात काम करत आहेत ते ओबीसी समाजाचे युवा नेते म्हणूनही परिचित आहेत कोणाला कसलीही अडचण असेल तर ते मदतीसाठी नेहमी पुढे असतात मागील झालेल्या पालिका निवडणूकीत त्यांनी पाचशेहून अधिक मते घेत आपली अपक्ष उमेदवार म्हणून त्यावेळी असणाऱ्या वार्डातुन छाप टाकली होती आता प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे

संजय चन्ने यांचे समाजकार्य देखील अनेकवर्षं सातत्याने प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुरू आहे कोविड मध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या परिसरात प्रतिबंधक औषध फवारणी केली होती शहरात पाणी टंचाई झाली असता टँकर ने त्या भागात पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न केले होते  लसीकरण मोहीम असेल तसेच मतदार नोंदणी मोहीम असेल तसेच परिसरातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी त्याठिकाणी राबवले आहेत तसेच विविध  शासकीय योजनांचा जनतेला लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न दिसले आहेत 
त्यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार देखील अनेक सामाजिक उपक्रमे राबवत चन्ने यांच्या कार्याचा आलेख उंचावत ठेवताना नेहमीच दिसतो 
 त्यांचा लौंड्रि व्यवसाय आहे त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यातूनच आर्थिक बचत करत सामाजिक कार्यासाठी ते आपली तरतूद करून स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रमांना मूर्त स्वरूप देताना दिसतात त्यांना असणारी सामाजिक कार्याची आवड एवढंच त्यामागाचे कारण आहे ओबीसी समाजासाठी देखील त्यांचे काम मोठे आहे साईभक्त म्हणून देखील त्यांची ओळख आहे अध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांचा परिचय आहे त्यांनी यावेळी प्रभाग क्रमांक 8 मधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे त्याठिकाणी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे

Saturday, November 1, 2025

सौ. देवयानी दिग्विजय डुबल प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा बनलेला प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले आहे. या प्रभागाच्या विकासासाठी त्यामुळे माजी नगरसेवक शहाजीराव डुबल यांच्या सुनबाई सौ. देवयानी दिग्विजय डुबल यांना उमेदवारी मिळावी अशी वाढती मागणी होऊ लागली आहे. मतदारांचा विचार करता सौ देवयानी डुबल यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे. सौ. देवयानी डुबल या व्यावसायिक व समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणारे दिग्विजय डुबल यांच्या पत्नी व माजी नगरसेवक शहाजीराव डुबल यांच्या सून आहेत. सौ. देवयानी यांना राजकीय वारसा असून समाजसेवा करण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे. 1985 ते 1991 दरम्यान त्यांचे सासरे शहाजीराव डुबल हे कराड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून डुबल घराणे हे लोकांच्या नेहमीच जनसंपर्कात कायम असते. त्यामुळे त्यांना लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे.

सौ. देवयानी डुबल उच्चशिक्षित असून घराचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहेत व त्यांचे पती दिग्विजय यांचा कायम समाजकार्यात पुढाकार असतो. या पार्श्वभूमीवर कराड शहरातील जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना समाजसेवा करण्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचे सासरे शहाजीराव डुबल यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केले असल्याने साहजिकच त्यांना राजकीय वारसा असल्यामुळे व स्वतःचा जनसंपर्क खूप मोठा असल्याने त्या निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या प्रभागातील मतदार ही सौ देवयानी डुबल यांनी ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा बाळगून आहेत. कोणत्याही जाती-पातीचे राजकारण न करता गोरगरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता माझे सासरे व माजी नगरसेवक शहाजीराव डुबल हे कायम सर्वांच्या मदतीला धावून जात होते. तोच आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या मुलांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवला आहे. त्या माध्यमातून आपण स्वतः राजकीय व समाजसेवेचा हा वारसा या पुढे चालू ठेवू असे सौ. देवयानी दिग्विजय डुबल यांनी यावेळी सांगितले.

आमदार अतुलबाबा म्हणाले...मित्रपक्षाशी मैत्रीपूर्ण लढत देताना प्रचाराची पातळी घसरणार नाही याची काळजी घेणार

वेध माझा ऑनलाईन।
आम्ही भाजप म्हणून आमच्या मित्र पक्षाशी ज्याठिकाणी लढत देऊ त्याठिकाणी व्यक्तिगत टीका करणार नाही... तसेच प्रचाराची पातळी खालच्या स्तराला नेणार नाही... तशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला केल्या आहेत... त्यामुळे  आमची स्थानिक निंडणुकांमध्ये भूमिका तशीच असेल असे, आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी काल कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले

तळबीडमधील कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमानंतर आमदार अतुल भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

ते पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यात शक्यतो महायुती म्हणून लढण्यासाठी माझी तयारी असली तरी ज्या ठिकाणी महायुतीची शक्यता नाही त्याठिकाणी शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू
आजपर्यंत धक्के दिले...आता मात्र आता धक्के नाही देणार...तर आम्ही भूकम्प करणार... असे म्हणत अतुलबाबानी कराडच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडणार असल्याचे यावेळी संकेत दिले... हा भूकम्प कधी करायचा हे ठरवायचं चालू आहे ठरल्यानंतर पत्रकारांना आंम्ही याबाबत माहिती देऊ असेही ते म्हणाले...
त्यामुळे कोण, कोण आणि कितीजण दिगग्ज भाजप मध्ये प्रवेश करून कराडच्या राजकारणात कधी हा भकम्प होणार हेच बघायचं आहे !