Monday, June 22, 2026

कृष्णा नदीच्या पाण्यात काय मिसळले आहे? पाण्याचा रंग हिरवा झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण! साथीचे रोग पसरणार नाही...यासाठी शासनाने उपाययोजना करणे महत्वाचे ; अन्यथा जनआंदोलन उभे राहणार ; खात्रीलायक वृत्त:

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीचे पाणी दूषित झाले आहे. पाण्यात केमिकल युक्त सांडपाणी सोडल्याने पाण्याचा कलर हिरवा गार झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका गंभीर बनत चाललेला आहे.सध्या हे पाणी वापरासाठी नदीकाठच्या गावांना पुरवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत अद्याप कोणतेही गांभीर्य पूर्वक पाऊस शासनाने उचलून याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याने हा प्रश्न भविष्यात गंभीर झाल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार का? हाच प्रश्न आहे...

उंब्रज शिवडे हनुमानवाडी वडोली भिकेश्वर या गावांमध्ये या पाण्याचा पुरवठा केला जात आहे त्यामुळे आता प्रशासनाने हे पाणी फिल्टर करून नागरिकांना पुरवठा करणेचे आदेश ग्रामपंचायतना देणे गरजेचे आहे.
मात्र या पाण्यात काय मिश्रण झाले आहे याचा खुलासा संबंधित पोल्युशन खात्याने करण्यासाठी पुढे आले पाहिजे अद्याप त्यांनी याबाबत कोणताही खात्रीलायक खुलासा सादर केलेला नाही त्यामुळे साथीचे रोग तसेच पाण्यातील जलचर प्राण्यांच्या जीवाशी खेळ करणारे हे नदीच्या पाण्यात मिसळलेले मिश्रण काय आहे? हे पुराव्यासाहित कळणार कधी? व कसे? हेही समजणे महत्वाचे आहे आणि हे पाण्यात मिसळलेले जे काही मिश्रण असेल ते मिश्रण व त्यासाठी जबाबदार कोणती संस्था आहे? याची माहिती देखील कळणेही तितकेच महत्वाचे आहे 
दरम्यान यापुढे  हे मिश्रण पाण्यात मिसळू नये म्हणून संबंधित प्रशासनाने काही उपाययोजना केल्या नाहीत तर कृष्णाकाठच्या जनतेकडून या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे असेही खात्रीलायक समजते

No comments:

Post a Comment