Monday, June 22, 2026

म.वि. आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल १०० मते फोडली? :

वेध माझा ऑनलाईन
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला. त्यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी २९२ मते मिळवली त्यांनी महायुतीची सुमारे १०० मतं फोडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 
दरम्यान सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप ३२५, राष्ट्रवादी (अ. प.) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६, राष्ट्रवादी (श. प.) १२०, काँग्रेस ७४, शिवसेना उबाठा १, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष ५४, असं पक्ष निहाय संख्याबळ होतं. महायुतीच्या मतांचा आकडा ६४६ होता, तर महाविकास आघाडीकडे १९५ मते होती. स्थानिक आघाड्या आणि अपक्षांपैकी बहुतांश मते ही महायुतीच्या गोटातील होती. तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल १०० मते फोडल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment