वेध माझा ऑनलाईन
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा दिसू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नदीचे पाणी नेहमीपेक्षा अधिक हिरवट दिसत असून, या बदलामागे शेवाळ (अल्गी) वाढणे, पाण्याचा कमी प्रवाह, सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढणे किंवा प्रदूषणाची शक्यता यांसारखी कारणे असू शकतात.
स्थानिक नागरिकांनी नदीच्या पाण्याच्या रंगातील अचानक झालेल्या बदलाची दखल घेत संबंधित प्रशासनाने पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. पावसाआधी नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास आणि तापमान वाढल्यास शेवाळाची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे पाणी हिरवट किंवा निळसर-हिरवे दिसू शकते, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
दरम्यान, नदीचे पाणी पिण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी घेत असलेल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. जलसंपदा व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने तपासल्यानंतरच रंगबदलाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
हेडलाईन :
No comments:
Post a Comment