Saturday, December 4, 2021

माझी वसुंधरा अभियानांतर्गत कृष्णाकाठ सप्ताहाच्या निमित्ताने कृष्णा नदी पात्राची स्वच्छता ; सौरभ पाटील , वाटेगावकर यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित... गैरहजर नगरसेवकांबाबत चर्चा...

वेध माझा ऑनलाईन
कराड
आज येथील प्रितिसंगम घाट परिसरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत कृष्णाकाठ सप्ताहाच्या निमित्ताने कृष्णा नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली

माजी वसुंधरा अभियानाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषद व समर्थ भारत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत "कृष्णाकाठ सप्ताह" चे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज 
प्रितीसंगमावरील कृष्णा-कोयना नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.यावेळी नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर व सौरभ  पाटिल तसेच शहरातील अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

 दरम्यान,येथील पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक "इव्हेंट' ला नगरसेवक सौरभ पाटील व गुंड्याभाऊ वाटेगावकर नेहमीच उपस्थित दिसतात मात्र बाकीचे नगरसेवक व  नेते म्हणवणारे का फारसे उपस्थित राहत नाहीत ? अशी चर्चा अशावेळी हमखास होत असते...  आजही नदी पात्राच्या स्वच्छतेवेळी ती चर्चा झालीच... 

No comments:

Post a Comment