Saturday, April 12, 2025

यमाई मंदिरात उद्या महाप्रसादाचे आयोजन ; आबा कोळी यांनी दिली माहिती ;

वेध माझा ऑनलाईन।
येथील यमाई मंदिराच्या उत्सवानिमित्त उद्या रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आबा कोळी यांनी दिली आहे

यमाईदेवी उत्सवानिमित्त आज शनिवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत जोतिबा मंदिर मंगळवार पेठ वाडी येथून जोतिबा सासन काठीची मिरवणूक निघाली 
रात्री 9 वाजता जोतिबा सासन काठी व पालखी यमाई मंदिर कन्याशाळेसमोर भेटायला येणार आहे ही परंपरा 100 वर्षापासून सुरू आहे 
यमाई भेटीला मानकरी, सालकरी भेटीला येत असतात 
कृष्णामाई पालखीची मिरवणूकही रात्री 8 वाजता भेटीस येते त्यानंतर जोतिबा सासनकाठी व पालखीची संपूर्ण मंगळवार पेठेत प्रदक्षिणा होते 
त्यानंतर पंढरीचा मारुती येथे रात्री 11 वाजता दर्शन घेऊन सादर सासनकाठी व पालखीची सांगता होते 
दरम्यान रविवारी सकाळी 11 वाजता यमाई मंदिरासमोर महाप्रसाद होणार आहे
सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोळी बंधूनी केले आहे

Wednesday, April 9, 2025

ठोक आता शड्डू! बाळासाहेबांच्या विजयी मिरवणुकीतून कार्यकर्त्यांचे विरोधकांच्या शड्डूला...शड्डू ठोकूनच चॅलेंज !

वेध माझा ऑनलाइन।
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी अधिक चर्चेत राहिली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होतं. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह  पाटील- उंडाळकर यांचं स्व.यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री  परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं 21-0 असा विजय मिळवला. त्यानंतर शहरातून निघालेल्या विजयी मीरवणुकीतून बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या विधांनसभेवेळी मारलेल्या शड्डूला...शड्डूनेच उत्तर देत.. . ठोक आता शड्डू असे म्हणत पुन्हा चॅलेंज दिले आहे...

दरम्यान बाळासाहेब पाटील यांनी विजयानंतर केलेल्या त्यांच्या भाषणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळचा एक प्रसंग सांगितला.  विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गना केल्या, आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार, आम्ही जिंकणार, नाही म्हटलं तरी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती.  सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलावरुन कारखान्याकडे बघून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडं बघून शड्डू  ठोकला गेला. 32 हजार लोकांशी लढत होती ते विसरले. कुणापुढं उन्माद वापरतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त वेळीच करणं आवश्यक आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले . 

दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या  प्रचार सभांमधून घोरपडे व त्यांचे अनुयायी यांनी शड्डू ठोकत बाळासाहेब पाटील यांना चॅलेंज देत आमदारकीची निवडणूक आम्ही जिंकणारच... अशी घोषणा केली होती... त्यावेळी त्यांचा तो शड्डू चांगलाच चर्चेत राहिला होता... दरम्यान निवडणूक पार पडली घोरपडे मोठ्या मतांनी निवडून आले... आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढला... त्यांनी शड्डू ठोकत सह्याद्री कारखाना निवडणुकीत देखील लक्ष घालण्याचे ठरवले...त्यांचा कॉन्फिडन्स आणखी वाढला जेव्हा त्यांना दक्षिण च्या उदयदादाची साथ मिळाली...
कारखान्याची ही  निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलची सरशी झाली...घोरपडे यांच्या पॅनेलचा पराभव झाला... 

दरम्यान या कारखान्याच्या निवडणुकीदरम्यानचा प्रचार करताना देखील घोरपडे म्हणाले होते...6 तारखेला मी मंगळवार पेठेत येऊन गुलाल उधळून पुन्हा शड्डू ठोकणार आहे... मात्र त्यांचा पराभव झाला... दरम्यान या कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे यांच्या त्या शड्डूच्या चॅलेंजला आपल्या शड्डूने उत्तर देत विजयी मिरवणुकीतून ...आता ठोक शड्डू... असे चॅलेंज पुन्हा दिले आहे...हे चॅलेंज थेट मनोज घोरपडे यानाच दिले आहे...
त्यामुळे आमदार घोरपडे पुढील कोणत्या निवडणुकीतून या शड्डूचे उत्तर ...आपल्या आणखी एका शड्डूने देतात... हेच आता पहावे लागणार आहे... 



जावयासोबत सासू गेली पळून, लग्नाआधी घडली थक्क करणारी घटना... पोलीसात तक्रार दाखल...

वेध माझा ऑनलाइन।
अलीगडमधील एका आईने असं काही केलं ज्याची कल्पनाही करता येणार नाही. लेकीचं लग्न ज्या पुरुषासोबत होणार होतं, त्याच्यासोबत आई पळून गेली. मुलीच्या लग्नाची तारिख जवळ येत असल्याचं लक्षात येताच आई जावयासोबत पळून गेली. दोघांच्या लव्ह कनेक्शनचं माध्यम होतं स्मार्टफोन… जो मुलीच्या आईला जावयाने भेट म्हणून दिलेला. दोघे एकमेकांसोबत 20 तासांपेक्षा अधिक वेळ गप्पा करत असायचे.
ही घटना अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावातील आहे, जिथे जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्रची पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दोघांनी एकत्र पळ काढला आहे. दोघे घरातून जवळपास त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत.

जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु होती. नातेवाईकांना पत्रिका देखील पाठवण्यात आल्या होत्या. घरात आनंदी वातावरण होतं. पण अचानक पत्नी घरातून गायब झाली. पत्नी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेली असावी.. असं जितेंद्र यांना वाटलं. पण असं काहीही नव्हतं.

Tuesday, April 8, 2025

मलकापुरात डॉ अतुल भोसलेंचा मनोहर शिंदेना जोर का झटका ; हजारो काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल ; मंत्री बावनकुळे म्हणाले... म्हणूनच काँग्रेस कार्यकर्ते पृथ्वीराजबाबाना सोडून अतुलबाबा यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत...

वेध माझा ऑनलाइन।
मलकापुरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे मलकापूरचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे आणि काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष, माजी सभापती प्रशांत चांदे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे व नुकताच त्यांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत, काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे..
दरम्यान प्रशांत चांदे व शंकरराव चांदे यांचा भाजप प्रवेश राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ना. अतुल सावे, आ.डॉ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे यांनी या प्रवेशकर्त्यांचे त्याठिकाणी स्वागत केले.

मलकापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे हे मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक असून, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत होते. तर ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे हे मलकापूर नगरपालिकेत तब्बल १५ वर्षे नगरसेवकपदी राहिलेले आहेत. यापैकी १० वर्षे ते बांधकाम सभापती, तसेच शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत राहिले आहेत. नगरपालिका होण्यापूर्वी जवळपास १२ वर्षे ते मलकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. प्रशांत शिवाजी चांदे हे त्यांचे पुतणे आहेत.  



ना. बावनकुळेम्ह म्हणाले...

कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे एक कर्तव्यदक्ष आमदार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना गेल्या २० वर्षात काहीही विकास करता आलेला नाही. पण आ.डॉ. अतुलबाबांचा कामाचा धडाका पाहता, ते या ५ वर्षातच विकासाचा बॅकलॉग भरुन काढतील, असा मला विश्वास आहे. या कर्तव्य तत्परतेमुळेच आ.डॉ. अतुलबाबांचे नेतृत्व स्वीकारुन, कराड दक्षिणमधील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस व पृथ्वीराज चव्हाणांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि येणाऱ्या निवणुकीत नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच ठिकाणी सर्व जागांवर भाजपा-महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत.