Tuesday, September 30, 2025

साताऱ्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत 7 ऑक्टोबरला ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सभापती पदांची आरक्षण सोडत दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडणार असून, त्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, पंचायत समित्यांचे कार्यकाळ सुरु झाल्यानंतर अडीच वर्षांनंतर सभापती पदांचा फेरबदल होत असतो. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व 11 पंचायत समित्यांसाठी नवीन सभापती निवड प्रक्रियेसाठी ही सोडत काढण्यात येत आहे.

सोडतीची प्रक्रिया व नियमावली

ग्रामविकास विभागाने 9 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित केले आहे.

सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांसाठी खुला कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

सोडतीनंतर तत्काळ निकाल जाहीर करून पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समित्यांना सूचना दिल्या जाणार आहेत.

प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या (११ पदे)

अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला) – 1 पद

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – 2 पदे

नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला) – 1 पद

सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) – 3 पदे

सर्वसाधारण प्रवर्ग (खुला) – 4 पदे

एकूण: 11 पदे

महिला नेतृत्वासाठी सकारात्मक चित्र

साताऱ्यातील पंचायत समित्यांमध्ये महिला नेतृत्वासाठी मोठी संधी खुली झाली आहे. एकूण 11 पैकी 6 सभापती पदे महिलांसाठी आरक्षित असल्याने तालुकास्तरावर महिलांचा प्रभाव आणि सहभाग अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्या

सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्या पुढीलप्रमाणे आहेत –

1. कराड
2. सातारा
3. कोरेगाव
4. खटाव
5. फलटण
6. माण
7. पाटण
8. वाई
9. महाबळेश्वर
10. जावली
11. खंडाळा
या सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीच ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

सभापती पदांचा तालुकास्तरावर राजकीय व विकासात्मक निर्णयांवर मोठा प्रभाव असतो.
आरक्षण सोडतीनंतर स्थानिक गटबाजी, नेत्यांचा वर्चस्व संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

काही पंचायत समित्यांत सत्ताधारी गटांना धक्का बसू शकतो, तर काही ठिकाणी विरोधकांना संधी मिळू शकते.
सोडतीत कोणत्या पंचायत समितीवर कोणता प्रवर्ग लागू होणार, याची उत्सुकता सर्व तालुक्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. अनेक पंचायत समित्यांमध्ये सभापती पदे गटबाजी, राजकीय समतोल व सत्ताधाऱ्यांच्या प्रतिमेवर अवलंबून असतात. त्यामुळे 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोडतीकडे केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर नागरिकांचेही डोळे लागले आहेत.


Saturday, September 27, 2025

.. चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू अस का म्हणाले अजितदादा... दादा पुन्हा चर्चेत, काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या थेट वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चुलत्या-पुतण्याचं मला नका सांगू असे म्हणत त्यांनी एका कार्यकर्त्याला थांबवले आणि यावर बोलण्यास महत्त्व न देण्याचे आवाहन केले. माध्यमांना २४ तास कार्यक्रम चालवण्यासाठी असे विषय लागतात, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या बदललेल्या भूमिकेवर बोलताना अजित पवारांनी सांगितले की, पूर्वी साहेब (शरद पवार) त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायचे, पण आता सर्व काही स्वतःच सांभाळावे लागते. पक्षात कोणीही वाईट विधान करू नये आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तींनाच पक्षात घ्यावे, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान पुणे येथे अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एका स्वच्छता करणाऱ्या आजीबाईंच्या ई-केवायसी संबंधित तक्रारीची दखल घेतली. सुरुवातीला काहीसे संतापलेले असले तरी, त्यांनी आजींची समस्या शांतपणे ऐकून घेतली आणि डीबीटीच्या पैशांसाठी ई-केवायसी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांचा हल्ला ; खळबळजनक प्रकार

वेध माझा ऑनलाईन
ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे. 

आज सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभा साठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.

अभिनेत्यापासून नेते बनलेल्या विजय यांच्या सभेत प्रचंड गर्दी ; 33 लोक चेंगरून मृत्युमुखी ; अनेकजण पडले बेशुद्ध ;

वेध माझा ऑनलाईन
तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम (टी व्ही के)प्रमुख आणि अभिनेत्यापासून नेते बनलेले विजय यांच्या मोठ्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली. हजारो लोक जमल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यात किमान 33 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेकजण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली. या घटनेत 58 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गर्दीमुळे त्यात काही मुलेसुद्धा, काही लोक बेशुद्ध पडली. विजय यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं आणि “पोलिसांनी मदत करा” अशी हाक दिली. लोक बेशुद्ध पडल्यावर त्यांनी पाणी बाटल्या प्रेक्षकांत टाकल्या आणि रुग्णवाहिका बोलावून श्वास गुदमरलेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.

पुण्यात स्टेजवर जाऊन गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला : भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी कमालीच्या संतापल्या:

वेध माझा ऑनलाईन
देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. ठिकठिकाणी गराब आणि रास दांडियाचं आयोजन केलं आहे. तरुण आणि तरुणी गरबा खेळण्यात दंग आहे. पण पुण्यात मात्र गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी कमालीच्या संतापल्या.' आवाजाची मर्यादा आणि धार्मिकतेची बंधन ओलांडली आहे. त्यामुळे या पुढे या मैदानात असे कार्यक्रमात होऊ देणार नाही', असं म्हणत गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला.

पुण्यात ठिकठिकाणी नवरात्री निमित्ताने गरबा आणि दांडियाचं आयोजन केलं आहे. कोथरूडमध्ये गरब्याचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणांनी प्रचंड गर्दी केली. शुक्रवारी रात्री कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं. खुद्द भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. पण, तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडला. त्यानंतर कार्यक्रमाच्या स्टेजवर जाऊन मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम बंद पाडला.

हवामान विभागाचा आज (दि 28 )मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा: कुठे दिलाय ऑरेंज अलर्ट ,आणि कुठे रेड अलर्ट ... वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन।
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने 28 सप्टेंबर रोजीही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पाहुयात 28 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथील नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कराडच्या मंगळवार पेठेतील चेतना पाटील यांना पीएचडी प्रदान ;

वेध माझा ऑनलाईन
कराडच्या मंगळवार पेठ येथील चेतना ज्ञानदेव पाटील (चव्हाण)याना नुकतीच शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली 

चेतना पाटील या मंगळवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांच्या भगिनी आहेत

डॉ विजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी संधीवात या विषयावर केलेल्या संशोधनासाठी ही पदवी त्यांना मिळाली त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे 
त्यांचे शिक्षण होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कुल एस जी एम कॉलेज तसेच कराड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, आप्पासाहेब बिरणाळे कॉलेज सांगली आणि डी वाय पाटील फार्मसी कॉलेज पिंपरी या ठिकाणी  झाले आहे
शांत आणि संयमी स्वभाव असणाऱ्या चेतना पाटील यांच्या या यशामुळे कराडचा गौरव वाढला आहे

Tuesday, September 23, 2025

कराडातील पत्रकार परिषदेत...वेध माझाचे प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांची उत्तरे...

वेध माझा ऑनलाईन।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रिकरण करण्यासाठी तुम्ही जसा पुढाकार घेतला त्याप्रमाणे अजितदादा आणि थोरले पवार साहेब यांच्या पुन्हा एक होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का ?या वेध माझा च्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सावधपणे उत्तर देत... टाळी एका हाताने वाजत नाही... असे म्हणत अजितदादा पुन्हा एक होण्यासाठी तयार नाहीत... असेच सुचवले...
काल सोमवारी राष्ट्रवादी च्या नेत्या खा सुप्रिया सुळे कराडात आल्या असता त्यांनी विरंगुळा बंगला येथे पत्रकारांशी संवाद साधला

त्या पुढे म्हणाल्या आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजप च्या गोपीचंद पडळकरांनी ज्या खालच्या दर्जाची टीका केली त्याचा मी निषेध करते ...मात्र अजितदादा आणि रोहित पवार हे देखील शासकीय अधिकाऱ्यांना अरेरावी च्या भाषेत बोलले असल्याची व्हीडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे मग याही दोघांच्या बोलण्याचा तुम्ही निषेध करता का?या वेध माझा च्या प्रश्नावर उत्तर देताना... प्रत्येकाने कोणाशीही बोलताना सुसंस्कृतपणे बोललं पाहिजे...आपण यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात राहतो... असे म्हणत त्यांनी गुळगुळीत उत्तर दिले...मग...त्यांच्याही बोलण्याचा तुम्ही निषेध करता का?असे विचारले असता आत्या या नात्याने मी रोहितला सुसंस्कृत बोलण्याचा नक्कीच सल्ला देईन,कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत म्हणून तो रागात तसे बोलला असेल असे म्हणत... त्यांनी विषय तिसरीकडेच नेला...

माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर पक्षातच नाराजी का आहे ? त्यांना लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवार म्हणून का डावलले? तसेच जयंत पाटील पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा आहे... नेमकं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीत काय चाललंय ? नेमकं चुकतंय कोणाचं? एकेकाळच्या बालेकिल्ल्यात पक्षाची अशी अवस्था का ? या प्रश्नावर... झालं गेलं जाऊ दे...माझ्याही पक्ष सोडण्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात...या बातम्या देणारे सूत्र कोण असतात...हेच कळत नाही...अस म्हणत त्यांनी तीसरीकडेच विषय नेला... मात्र वेध माझा च्या प्रश्नावर प्रॉपर उत्तर देणे टाळले.

Sunday, September 21, 2025

पै संतोष वेताळ याना जिल्ह्यातील शिवसेनेत मोठं भवितव्य ; माझी ताकद वेताळ यांच्या पाठीशी ; ना शंभूराज देसाई यांच्या पै. वेताळ यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा ;

वेध माझा ऑनलाईन
पैलवान संतोष वेताळ यांनी फक्त आपल्या विभागापूरत पक्षाच्या कामात न राहता संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी शिवसेनेचं काम करावं त्यांच्या पाठीशी माझी पूर्ण ताकद मी उभी करणार आहे त्यांना राजकारणात मोठं भवितव्य आहे एवढंच मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो अस म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांना शुभेच्छा दिल्या

आज पै वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास उपस्थित राहुन त्यांनी माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ना देसाई यांनी हे विधान केले


Saturday, September 20, 2025

वाढदिवसाचे सामाजिक भान; विविध उपक्रमांचा हजारोंना लाभ / राजेंद्रसिंह यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वेध माझा ऑनलाइन
शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा लाभ हजारो कराडकरांना झाला. यावेळी प्रथमच सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला.  राजेंद्रसिंह यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव दिवसभर सुरू होता.
वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत, गुणवंतांचा सत्कार व शिबिरे आयोजित करण्याची परंपरा राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराने यावर्षीही जपली.  रविवार पेठ पाण्याची टाकी व बारा डबरे येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गरजू नागरिक व महिलांना झाला.

दत्त चौक येथे यशवंत विकास एकता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेकडो युवक, युवतींनी सहभाग घेतला. यातील विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सात शहीद येथे रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांना पाच लाखांचा विमा संरक्षण देण्यात आले. संत तुकाराम हायस्कूलमध्ये संगीत साहित्य भेट देण्यात आले. 
साईबाबा मंदिर, बस स्थानक परिसरात वृक्षारोपणज्ञतर शिवाजी स्टेडियम अंगणवाडीला शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा मुजावर कॉलनी व महाराष्ट्र हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये महिला स्वसंरक्षण स्पर्धाही पार पडल्या.होणार आहेत. 

 खराडे कॉलनी येथे अंगणवाडी व आरोग्य सेविका सन्मान सोहळा पार पडला.  तर नगरपालिका जलतरण तलाव येथे कोल्हाटी वस्तीमध्ये गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक तीनमध्ये गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, आदर्श शाळा पुरस्कार सोहळा पार पडला. उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता कीट व फळेवाटप तर  बसस्थानक येथे प्रवाशांना बसण्यासाठी स्टीलची बाके देण्यात आली. या सर्व उपक्रमांचा लाभ गोरगरीब व गरजू‌ नागरिक व महिलांना झाला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार सुहास बाबर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्यासह मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड. उदयसिंह पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कराड अर्बनचे कार्यकारी संचालक दिलीप गुरव यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. कराड व मलकापूरचे माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघ व तरुण कार्यकर्ते यांनीही यादव यांना भेटून शुभेच्छा दिल्या. कराडमधील विविध समाजाच्या प्रतिनिधींनीही शुभेच्छा दिल्या.

कराड फेज टूचे कौतुक 
वाढदिवसाच्या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरासाठी ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. याचा सविस्तर आढावा यादव यांनी माध्यमांतून सादर केला. या अंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांचे अनेक नागरिकांनी कौतुक करत यादव यांना शुभेच्छा दिल्या.

Friday, September 19, 2025

मोबाईल बदलून देण्यावरुन झालेल्या वादावादीत एका युवकाचा मृत्यू ; कराडमधील घटना ;

 वेध माझा ऑनलाईन
शहरात बस स्थानक परिसरात एका मोबाईलच्या दुकानात नवीन मोबाईल बदलून देण्यावरुन झालेल्या वादावादीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अखिलेश नलवडे (वय २१, गजानन सोसायटी, कराड) असे या मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुकानातील कर्मचारी अजीम मुल्ला (शिवाजीनगर, मलकापूर) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीतून तीन दिवसांपूर्वी अखिलेशने एक नवीन मोबाईल घेतला होता. मात्र, त्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित काम करत नसल्याने तो बदलून घेण्यासाठी तो रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसोबत दुकानात गेला होता.
त्यावेळी मोबाईल बदलण्यावरून दुकान मालक आणि अखिलेश यांच्यात वाद सुरू झाला आणि वादानंतर ही घटना घडली 

इंद्रजित गुजर आणि राजेंद्रसिह यादव यांचे राजकीय मनोमिलन आले कराडकरांसमोर : ...निमित्त राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसाचे ; शहराचे राजकीय समीकरणे बदलणार:

वेध माझा ऑनलाईन।
कराड मधील एकाच वार्डातील एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून शहराला परिचित असलेले नगरसेवक इंद्रजित गुजर आणि राजेंद्रसिह यादव यांचे राजकीय मनोमिलन झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून शहरात सुरू होती मात्र आज प्रत्यक्षात राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इंद्रजित गुजर 4 वाजण्याच्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह आले असता अनेकांच्या भुवया त्याठिकाणी उंचावल्या त्यामुळे आता शहरात राजकीय समीकरणाचा वेगळाच ट्विस्ट निर्माण झालाय अशी चर्चा आहे

कराड मधील शनिवार पेठेतील नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्रसिह यादव आणि इंद्रजित गुजर यांचा राजकीय विरोध गेली दोन दशके शहराने पहिला आहे यादव  आणि गुजर त्याठिकाणी एकमेकविरोधात नगरसेवक म्हणून निवडूनही आले आहेत... मात्र या वेळच्या होणाऱ्या पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद ओपन पडल्यास राजेंद्रसिह यादव उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, तर इंद्रजित गुजर यांनी नुकतीच झालेली आमदारकीची निवडणूक लढवली आहे... नगरपरिषदेच्या होणाऱ्या यावेळच्या  शहरातील राजकारणात एकमेकाला मदत  करन्यासाठी एकत्र येण्याचा मानस या दोघांकडूनही समनवयक पद्धतीने करण्यात आला होता... त्या अनुषंगाने एकत्र येत या दोघांच्यात एक बैठक देखील पार पडली होती... त्याचवेळी ही युती फिक्स झाली अशीही चर्चा होती... आणि आज यादव यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः इंद्रजित गुजर व राजेंद्रसिह यादव या दोघांनी उघडपणे एकत्रित येत या युतीसंदर्भातील कराडकरांसमोर आपली पाने उघड केली... त्यामुळे इंद्रजित गुजर यांच्या जनपरिवर्तन आघाडीसह राजेंद्रसिह यादव यांची यशवंतआघाडी शहरातील होणाऱ्या पालिका निवडणुकीत एकमेकांला मदत करणार का? अशी चर्चा आहे...

तर दुसरीकडे यादव यांच्या वाढदिवसानिमित्त काल शहरातील लोकशाही आघाडीच्या सौरभ पाटील यांनी देखील यादव याना आपल्या निवासस्थानी नेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या... त्यामुळे त्यांच्याही या भूमिकेचा पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  अनेक अर्थाने राजकीय तर्क लावला जात आहे...लोकशाही आघाडी यादव यांच्या आघाडीशी पालिका निवडणुकीत जुळवून घेण्यासाठी इच्छुक आहे का? अशाही चर्चा यानिमित्ताने सुरू आहे...
दरम्यान शहराची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे अशा चर्चा आता होणारच...

Wednesday, September 17, 2025

राजेंद्रसिह यादव यांचा उद्या वाढदिवस ...

वेध माझा ऑनलाईन
सातारा जिल्हा शिवसेना समन्वयक व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष तसेच कराड पालिका निवडणुकीत ओपन आरक्षण पडल्यास नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून शहरात जोरदार चर्चेत असलेले राजेदसिंह यादव यांचा वाढदिवस सर्व मित्र परिवाराच्या वतीने युवा प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षी या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन बुधवार 18 व गुरूवार 19 रोजी करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली.
 
वाढदिवसाच्या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने समाजातील गरीब व गरजूंना मदत होत असते. या बरोबर सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत या रोजगार मेळाव्यातून कराड शहर व परिसरातील जवळपास पाच हजार युवा-युवतीना नोकर्या प्राप्त झाल्या आहेत.
गेली २५ वर्षे राजेंदसिंह यादव कराड नगरपरिषदेत नगरसेवक, सभापती,उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेली दहा वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत विकास आघाड़ीची सत्ता नगरपरिषदेत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराच्या सर्वगीण विकासाची फेज-२ही संकल्पना मांडून ती अस्तित्वात आणली आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, बंदिस्त गटार, चौकाचे व पुतळ्यांचे सुशोभिकरण, ४२कि.मी.ची पाणीपुरवठा व ५६ कि.मी. ची ड्रेनेज लाईनची कामे, ६ मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, ४ नवीन पपिंग स्टेशन, समाज मंदिरे, व्यायामशाळा या बरोबर संविधान भवन, अभ्यासिका, कराड शहराच्या विकासासाठी राज्य नगरोत्थान विकास निधीमधून शहरात फेज-२च्या माध्यमातून विविध पथदर्शी विकासकामे सुरु आहेत. तसेच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्रसिंह यादव यांच्या माध्यमातून डीपीड़ीसीमधून प्राप्त झालेल्या निर्धीतून कराड शहरात विविध विकास कामे सुरू आहेत.
नागरिकांच्या सुविधेसाठी मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय आहे. ते कायम उघडे असते. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या सोडविल्या जातात, तसेच नवमतदार नोदणी, बेरोजगार मेळावे, रक्तदान शिबीरे, आधारकार्ड, लाडकी बहीण योजनेची नोंदणी, बांधकाम कामगार मदत, आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे, उपमुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजना सातत्याने राबवित आहेत.
स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारावर असलेली  श्रद्धा व कराडच्या सर्वगीण विकासाचा ध्यास घेऊन समाजात कार्यरत असलेल्या राजेंद्रसिंह यादव  यांच्या यावर्षीच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार 18 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर असे सलग दोन दिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
गुरुवारी 18 रोजी यशवंत विकास एकता मॅरेथॉनचे आयोजन सकाळी 7 वाजता दत्त चौक येथे करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता साईबाबा मंदिर, बस स्थानक परिसरात वृक्षारोपण होणार आहे. सकाळी 10 वाजता शिवाजी स्टेडियम अंगणवाडीला शालेय साहित्य वाटप होणार आहे. सकाळी 10.30 वाजता 12 डबरे पाण्याची टाकी येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषद शाळा मुजावर कॉलनी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये महिला स्वसंरक्षण स्पर्धा होणार आहेत. दुपारी 12 वाजता महाराष्ट्र हायस्कूल येथे पुस्तके व शालेय साहित्य वाटप होणार आहे. दुपारी 1 वाजता खराडे कॉलनी येथे अंगणवाडी व आरोग्य सेविका सन्मान सोहळा होणार आहे. 1.30 वाजता गोरक्षणमध्ये गायींना चारा वाटप, दुपारी 4 ते 6 या वेळेत कराड शहरात विविध ठिकाणी विकास कामांची भूमिपूजने मा. राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते होणार आहेत. तर सायंकाळी 6 वाजता नगरपालिका जलतरण तलाव येथे कोल्हाटी वस्तीमध्ये गरजू महिलांना साडी वाटप होणार आहे. 
शुक्रवार 19 रोजी सकाळी 8.30 वाजता राजेंद्रसिंह यादव देवदर्शन व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी अभिवादन करणार आहेत. सकाळी 8.45 वाजता सात शहीद मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. तसेच संत तुकाराम हायस्कूलमध्ये संगीत साहित्य वाटप होणार आहे. तर 9.30 वाजता रविवार पेठ पाण्यात टाकी येथे सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10:30 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये रोजगार मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 वाजता नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये गुणवंत विद्यार्थी शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार सोहळा व अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. दुपारी 1 वाजता उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता कीट व फळेवाटप होईल. दुपारी 1.30 बसस्थानक येथे स्टीलची बाके लोकार्पण होणार आहे तर दुपारी 4 ते 9 या वेळेत नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये राजेंद्रसिंह यादव वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
 या सर्व कार्यक्रमांना कराडकर नागरिक व शिवसेना कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याच्या घटनेवर फडनवीसांची प्रतिक्रीया काय...:

वेध माझा ऑनलाईन
मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोत्री आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांना आदराने माँ साहेब म्हणतात. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आता पोलीसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अशाप्रकारची घटना ही निषेधार्य आहे. ज्या कुठल्या समाज कंटकांनी हे कृत्य केलं आहे, त्याला पोलिस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं मला योग्य वाटत नाही.’

अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणार ; विशेष सत्र न्यायालयाचे आदेश

वेध माझा ऑनलाईन 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणार आहे. विशेष सत्र न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत. या आधी ही चौकशी तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपल्या जीवावर राजकारणी स्वतःचे खिसे भरतात, मात्र आपल्याला न्याय मिळत नाही. आता भुजबळांची चौकशी सुरू झाल्यानतंर तरी देवेंद्र फडणवीस हे त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करणार की नाही असा प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, "छगन भुजबळ आणि त्यांच्यासारखे असंख्य मंत्री जे अमाप पैसा कमावतात, त्यांच्याविरुद्ध कितीही लढलात तरी तुम्ही जिंकणार नाहीत याची त्यांना खात्री असते. छगन भुजबळ यांनी कोविड काळात पिटीशन फाईल केलं. तेव्हा महाराष्ट्र सदन घोटाळ्याला चॅलेंज करता येणार नाही असा जीआर काढण्यात आला. त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला. म्हणून छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री माझ्यावर अब्रू नुकसानीचे दावे धडधड करतात."


मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी मोठी माहिती आली समोर ;

वेध माझा ऑनलाईन।
दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी रंगफेक केल्याची घटना घडली. यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्या पुतळा असलेल्या ठिकाणाला भेट दिली आणि २४ तासात कोणी रंग टाकला त्याला शोधून काढा, अशा सूचना पोलिसांना दिल्या. यानंतर एक मोठी माहिती समोर आली आहे.   मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलिसांना घटनेचा तपास करण्यात अडचणी येत आहेत.
पुतळ्याच्या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही, यामुळे घटना घडवणाऱ्यांना ओळखणे कठीण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्याची सूचना दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, सीसीटीव्ही फुटेज नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली आहे. घटनेच्या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

आता मनोज जरांगे पाटील यांचा चलो दिल्लीचा नारा : मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार :

वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे, त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाज गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे. हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे.  धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

"नमो उद्यान’ योजना राज्य शासन राबवणार ; आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूर शहराचा या योजनेत समावेश ; 2 कोटींचा निधी मंजूर ;

 वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूर शहराचाही समावेश करण्यात आला असून, याठिकाणी ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी एकूण २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

राज्यातील शहरी भागात हरित उद्यानांचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘नमो उद्यान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी नगरपालिकांना प्रत्येकी १ कोटींचा निधी वितरित केला जाणार आहे. या योजनेत कराड आणि मलकापूर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कराड आणि मलकापूर येथे नमो उद्यान साकारण्यासाठी प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकूण २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

‘नमो उद्यान’ ही योजना केवळ हरित पट्टे उभारण्यापुरती मर्यादित नसून, ती शहरी जीवनमान सुधारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या उद्यानांमुळे नागरिकांना निरोगी व शुद्ध हवा मिळून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी आधुनिक साधने आणि तर युवक व महिला यांच्यासाठी व्यायाम साधनांची सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक व शांत विश्रांती स्थळेही निर्माण केली जाणार आहेत. या हरित उद्यानांमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार असून, शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. 

दरम्यान, या उद्यानांची उभारणी केल्यानंतर शासनाकडून या उद्यानांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या ३ क्रमांकांसाठी नगरपालिकांना बक्षीस म्हणून अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

आ डॉ अतुलबाबांची प्रतिक्रिया 

शहरी भागात हरित उद्यानांचे जाळे उभारून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण मिळावे, यासाठी शासनाने ‘नमो उद्यान’ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कराड व मलकापूरमध्ये लवकरच उद्याने उभारली जाणार असून, त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. तसेच कराड व मलकापूर शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.

Tuesday, September 16, 2025

संतकृपा इंजिनिअरिंग कॉलेज व श्री निनाई देवी विद्यालय यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ;

वेध माझा ऑनलाइन
घोगाव येथील संत कृपा इंजिनिअरिंग कॉलेज  व श्री निनाई देवी विद्यालय यांच्यावतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात कॉलेजचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपल्याला भविष्यात सांभाळेल. कारण आज आपण सर्वत्र प्रदूषणाचे विविध दुष्परिणाम पाहत आहोत. सुनामी, भूकंप, महापूर, ढगफुटी सारखे अनेक नैसर्गिक आपत्तींना आपणास तोंड द्यावे लागत आहे याचे प्रमुख कारण होणारी वृक्षतोड आहे. 
सर्वांनी वृक्ष लागवड करावी, झाडे जतन करावी म्हणजे निसर्ग आपल्याला सोबत करेल. 
यावेळी कल्याण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. व आभार मानले
याप्रसंगी गणेश पवार, लालासो पाटील, आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर, संत कृपा कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 
 
  श्री निनाई देवी विद्यालय येथे नूकतेच      वनविभाग सातारा व वनपरिक्षेत्र कराड यांच्या वतीने बिबट्या वन्यप्राणी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले 
याप्रसंगी वनपाल डी बी कांबळे वनरक्षक संतोष पाटील , वनरक्षक चिवटे साहेब, वनसेवक. हनुमंत कोळी इत्यादी उपस्थित होते. 
मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. 
ज्येष्ठ शिक्षक आनंदराव जानुगडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वनपाल कांबळे साहेब यांनी या प्राण्यापासून कशी काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 
वैभव जाधव यांनी आभार व्यक्त केले.

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या... आधार अपडेटेशन केंद्रांची संख्या ताबडतोब वाढविण्याबाबत प्रशासनाला सूचना;

वेध माझा ऑनलाईन।
आधार कार्ड अपडेशन केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे कराड तालुक्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आधार अपडेटेशन केंद्रांची संख्या ताबडतोब वाढविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. याबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत, येत्या आठवड्याभरात कराड तालुक्यात १३ ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र सुरू करण्याची ग्वाही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.

विविध शासकीय योजना, शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, तसेच बँकिंग व्यवहारांमध्ये आधार कार्ड ही अत्यावश्यक बाब बनली आहे. आधार कार्डचे अपडेशन करण्याबाबत सर्वत्र कार्यवाही सुरु आहे. मात्र अपुऱ्या आधार अपडेटेशन केंद्रांमुळे नागरिकांना सध्या प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रांची अपुरी संख्या, सर्व्हर डाऊन यासारख्या अडचणींमुळे अशा केंद्रांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. तसेच हेलपाट्यांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाया जात आहे. 

नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी तालुक्यात आधार अपडेशन केंद्रांची संख्या तातडीने वाढविण्याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याशी चर्चा करुन, याबाबतच्या सूचना केल्या होत्या. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत, येत्या आठवड्याभरात तालुक्यात १३ ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र सुरू करण्याची ग्वाही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.

नवीन केंद्रे सुरू झाल्याने नागरिकांना जवळच्या ठिकाणी आधार दुरुस्ती किंवा अपडेट करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे रांगा कमी होतील, तसेच नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. 

आ डॉ अतुलबाबांची प्रतिक्रिया... 
आधार अपडेटेशनसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मी प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत आहे. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक पाऊल उचलल्याने येत्या आठवड्याभरात कराड तालुक्यात १३ नवीन आधार अपडेशन केंद्रे सुरु होतील. ज्यामुळे तालुक्यातील नागरिकांना सुलभ सेवा मिळू शकेल.



व्यावसायिक स्वरूपात आयोजित होणाऱ्या दांडिया-गरबा कार्यक्रमांवर बंदी घालावी ;कराडमधील सकल हिंदू समाजाची मागणी;

वेध माझा ऑनलाईन ।
नवरात्रोत्सव हा माता दुर्गेचा भक्तिभावाने साजरा होणारा पवित्र उत्सव आहे. या काळात व्यावसायिक स्वरूपात आयोजित होणाऱ्या दांडिया-गरबा कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी ठाम मागणी कराडमधील सकल हिंदू समाजाने केली आहे. अशा कार्यक्रमांमुळे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात, तसेच हिंदू संस्कृतीचे विकृतीकरण होत असल्याचा आरोप करत असे कार्यक्रम झाल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा सज्जड इशारा समाजाने प्रशासनाला दिला आहे.

सोमवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. निवेदनावर अनेक समाजबांधवांची नावे आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समाजाने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी समाजबांधवांनी सांगितले की, नवरात्रोत्सव हा भक्तिभाव, भजन-कीर्तन आणि पारंपरिक दांडियांचा उत्सव आहे. परंतु, कराड शहर व परिसरातील काही हॉटेल्स, लॉन्स आणि इव्हेंट कंपन्या व्यावसायिक फायद्यासाठी तथाकथित “डिस्को गरबा” आयोजित करत असल्याचे निदर्शनास येते. यामुळे महिलांच्या सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होतात, तसेच चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी मिळते आणि उत्सवाचे पावित्र्य कलंकित होते. नवरात्राचे पावित्र्य नष्ट करून समाजासमोर चुकीचा संदेश दिला जात आहे. यांमुळे महिलांचा सन्मान धोक्यात येतो आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातात. अशा कार्यक्रमांना परवानगी दिल्यास तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी समाजाने प्रशासनाकडे कराड शहर व परिसरात व्यावसायिक दांडिया-गरबा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशा कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास आयोजकांवर कठोर कारवाई करावी, उत्सव काळात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे कार्यक्रम संबंधित समाजापुरते मर्यादित राहावेत; अन्य धर्मीयांना प्रवेश नाकारावा, हॉटेल, लॉन व कॅफे मालकांनी आपली ठिकाणे अशा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देऊ नयेत, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

दरम्यान, गणेशोत्सव काळात प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन व देखावे आणि विसर्जन मिरवणुकांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल समाजाने कृतज्ञता व्यक्त केली. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सवातही प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. तसेच, स्पीकर परवाने नियमानुसार द्यावेत व दसऱ्यानंतर दोन दिवस विसर्जनासाठी मुभा द्यावी, अशीही मागणी केली आहे.

Sunday, September 14, 2025

जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले ; डॉ सुरेश भोसले ;

 वेध माझा ऑनलाईन
लहान मुलांमध्ये कॅन्सर बरा होण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु जीवनशैलीतील बदल आणि जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत पालक आणि मुलांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले. लायन्स क्लब ऑफ कराडच्यावतीने ‘लहान मुलांमधील कॅन्सर जनजागृती' अभियानाच्यानिमित्ताने कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लायन्स इंटरनॅशनलच्यावतीने दरवर्षी १३ सप्टेंबर हा दिवस ‘लहान मुलांमधील कॅन्सर जनजागृती अभियान दिन’ म्हणून पाळला जातो. सप्टेंबर महिनाभर हे अभियान सुरू राहते. यानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ कराडतर्फे कृष्णा हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारात दिलेल्या उत्तुंग योगदानाची दखल घेत, लायन्स क्लबच्यावतीने डॉ. सुरेश भोसले यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी कणवीकर-गुडूर, डॉ. प्रणिता पाटील यांच्यासह कॅन्सर युनिटमधील सर्व डॉक्टरांचाही लायन्स क्लब कराडच्यावतीने सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमध्ये १९९५ पासून कर्करोग विभाग कार्यरत असून, आतापर्यंत ५०,००० हून अधिक कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच दररोज सुमारे १५० रुग्ण ओपीडीद्वारे तपासले जातात. आजच्या काळात वैद्यकीय शास्त्र अधिक प्रगत बनले आहे. वेळेवर निदान, योग्य उपचाराने दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येते. त्यामुळे कॅसरग्रस्त रुग्णांनी भिती न बाळगता उपचारासाठी पुढे यावे आणि आनंदी आयुष्य जगण्याचा आनंद घ्यावा. 

यावेळी त्यांनी लायन्स क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करत, भविष्यात कृष्णा हॉस्पिटलसोबत संयुक्तरित्या आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमाला लायन्स क्लब कराडचे अध्यक्ष सतीश मोरे, सचिव सुप्रीम तावरे, खजिनदार दशरथ वाघमोडे, प्रथम उपाध्यक्ष योगेश देशमुख, नईम कागदी, प्रवीण राव, विजय खबाले, अनिल पवार, राहुल कुंभार, सुहास जगताप तसेच इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत कृष्णा हॉस्पिटल राज्यात दोन नंबरला
कृष्णा हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सर्व योजना राबवून कॅन्सरवर मोफत उपचार केले जातात. महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार येथे उपलब्ध करून दिले जातात. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत कृष्णा रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले. 



Saturday, September 13, 2025

नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओपन पडल्यास... कराड शहरात 7 ते 8 जण इच्छुक असल्याची चर्चा...ते इच्छुक उमेदवार कोण ...?

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्ह्यातील सातारा वाई महाबळेश्वर पाचगणी म्हसवड मलकापूर रहिमतपूरसह कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सोडत ऑक्टोबर मध्ये मुंबईत काढली जाणार असल्याची माहिती मिळत आहे कराड शहरात नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांनी जोरदार तयारी करत कम्बर कसली आहे दरम्यान प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर नगरसेवक पदासाठीची सोडत निघेल व त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठीची सोडत निघणार असल्याची माहिती आहे 
दरम्यान ओपन आरक्षण पडल्यास कराड शहरात नगराध्यक्ष पदासाठी 7 ते 8 इच्छुकांची नावे आतापासूनच चर्चेत आहेत 

त्यामध्ये शहरातील प्रत्येक राजकीय पार्टीच्या प्रमुखाच्या नावाची या उमेदवारीसाठी चर्चा आहेच याशिवाय त्याच पार्टीतील आणखी एक किंवा दोन इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा देखील गावात आहे त्यामुळे साहजिकच नगराध्यक्ष पदाच्या  निवडणुकीत मोठी चुरस व अंतर्गत कुरघुड्या पहायला मिळणार आहेत... तसेच भाजप मधून या पदासाठी अनेकजण इच्छुक असून काहीजण पक्षाने उमेदवारीसाठी शब्द दिला तर ऐनवेळी पक्षप्रवेश करून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपली तयारी करत आहेत... 
काँग्रेस व राष्ट्रवादी कडून देखील इच्छुकांची तयारी सुरू आहे... झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरी भाजप चा उमेदवार जिल्ह्यात निवडून आला असला तरी कराड शहरापुरत बोलायचं झाल्यास त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कराड शहरात भाजप च्या उमेद्वारासमोर लक्षवेधी मते घेतली आहेत...तर... त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ अतुल भोसलेंनी शहरात लीड घेतले आहे...  
म्हणजेच शहरातील मतदारांचा लोकसभेला  एका बाजूला तर विधानसभेला दुसऱ्या बाजूला असा कौल दिसून आला हा कौल देणाऱ्या कराड शहराची आता होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या पदरात मताचं दान टाकण्याची  मानसिकता असेल? याचा विचार करूनच शहरातील प्रत्येक पार्टी अथवा राजकीय पक्ष यावेळी आपला उमेदवार जाहीर करेल...अशी शक्यता आहे... 

दुसरीकडे या निवडणुकीकरिता जातीयतेच्या मुद्यांची किनार लावून त्या मतांना आपलेसे करत काही इच्छुक या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे... त्याकरिता उमेदवारांकडून हिंदू आणि मुस्लिम कार्ड खेळलं जाऊ शकत... हेही लक्षात घेतलं पाहिजे...
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याही मुद्यांना पुढे करून काही उमेदवार ही निवडणूक  कॅच  करायला नक्कीच बघतील... हा मुद्दा देखील सध्या जोरदार गाजतोय... त्यामुळे हा मुद्दा पुढे करत काही उमेदवार आपले नशीब त्या, - त्या मतदारांच्या जिवावर आजमावू शकतात... हेही तितकेच खरे...
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा नसेल असं आत्तातरी दिसतंय... मात्र  मते खाण्यासाठी म्हणून आणि एखाद्याची जिरवायची ठरवून ऐनवेळी एखादा उमेदवार  आपली उमेदवारी अपक्ष म्हणून जाहीर करू शकतो अशीही चिन्हे आहेत ...
हे सगळे राजकीय अंदाज असले तरी नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार प्रत्यक्ष बाहेर पडतील... त्यावेळी त्यांची नावे देखील लोकांसमोर येतील...त्यावेळी त्या सर्वच इच्छुक उमेदवारांची शहरातील लोकांमध्ये असणारी ईमेज...  आतापर्यंतचे त्यांचे समाजासाठीचे केलेलं उपयुक्त कार्य, शहराच्या विकासासाठी त्या उमेदवाराचे आत्तापर्यंतचे योगदान, भविष्यात शहरासाठी त्या उमेदवाराचे विकसनशील व्हिजन काय आहे... या आणि अशा अनेक बाबी पाहूनच जनता या शहराचा नगराध्यक्ष निवडून देणार आहे...
दरम्यान कराड पालिकेची मुदत संपून 3 ते 4 वर्षाचा कालावधी निघून गेला आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना होईल अशी शक्यता आहे त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठीची सोडत निघणार आहे, त्यामुळे...यापुढची चर्चा त्यानंतरच करू...तूर्तास इतकंच ...!

Friday, September 12, 2025

मुंबई हायकोर्टाला धमकचा मेल ; मेल मध्ये म्हटलय;बॉम्ब स्फोटासाठी शुक्रवार पवित्र; पाकिस्तानचाही मेलमध्ये उल्लेख-

वेध माझा ऑनलाईन।
मुंबई हायकोर्टाला आज, 2 वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्ट रिकामे करण्यात आले असून तापसणी सुरु आहे. बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक हायकोर्टात तातडीने दाखल झाले आहे. हायकोर्टातील वकील, न्यायाधीशांचे सर्व चेंबर खबरदारी म्हणून तपासणीच्या कारणास्तव रिकामे करण्यात आले आहेत. हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती.
काय म्हटलंय मेल मध्ये ?
हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या मेलमध्ये ‘बॉम्ब स्फोटांसाटी शुक्रवार पवित्र, त्यासाठी पाकिस्तान-तामिळनाडू यांची मिलीभगत… जज रुम, कोर्ट परिसरात तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत खाली करा…‘ असे म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले...जीआरबाबत हायकोर्टात योग्य भूमिका मांडू;


वेध माझा ऑनलाईन 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या शासनाच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की उच्च न्यायालयात या प्रकरणी राज्य सरकार योग्य भूमिका मांडेल. त्याचवेळी त्यांनी ओबीसी समाजालाही आश्वस्त केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की जीआर अंतर्गत कोणालाही सरसकट आरक्षण दिले जात नाही. कायद्यानुसार आणि पुराव्याच्या आधारेच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल. याआधीच न्यायालयाने मराठा समाज मागांसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. फडणवीस सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या भीतीमुळे ओबीसी समाजाच्या 35 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या ; लिहून ठेवली सुसाईड नोट ; काय लिहिलंय त्यात ?

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली आहे. आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या सुरू असलेल्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती ओबीसी समाजाला वाटत आहे. याच भीतीमुळे एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भरत महादेव कराड (३५) असे या तरुणाचे नाव आहे. ते लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत कराड हे गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाबद्दल चिंतेत होते. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या सुरू असलेल्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, अशी भीती त्यांना वाटत होती. ते फारसे शिकलेले नव्हते. त्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्याची त्यांना विशेष काळजी होती. आपल्या मुलामुलींना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, या विचाराने ते निराश झाले होते. याच निराशेपोटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली आहे.
त्यात लिहिलं आहे की, मी भरत महादेव कराडे आताच महाराष्ट्र सरकारने समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरुपी आरक्षण संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करुन ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी जीवन कायमस्वरुपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ;

वेध माझा ऑनलाईन।
मुंबईतील उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर तात्काळ खबरदारी म्हणून कोर्ट परिसर रिकामा करण्यात आलं आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण परिसरात कसून तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल शुक्रवारी सकाळी आला. या मेलमध्ये कोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. कोर्ट परिसरातील सर्व कामकाज थांबवून कर्मचाऱ्यांसह लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बॉम्बशोधक आणि नाशक पथक आणि स्थानिक पोलीस पथके घटनास्थळी पोहोचली असून, प्रत्येक कोपऱ्याचा तपास करत आहेत

Thursday, September 11, 2025

वारुंजी (ता कराड) गावचे सुपुत्र प्रा चेतन दिवाण यांना पुणे येथील जाधववर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
वारुंजी (ता कराड ) गावचे सुपुत्र, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये गेली अकरा वर्षापासून शिक्षण सेवा देऊन श्रीगोंदा येथील सनराईज समाजकार्य महाविद्यालयात नुकतेच  प्राचार्य म्हणून रुजू झालेले प्रा चेतन दिवाण यांना पुणे येथील नामांकित जाधव वर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचा आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले संस्थेचे उपाध्यक्ष ॲड शार्दुलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सदर पुरस्कार Dदेण्यात आला

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल डॉ भूषण गोखले व प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक अध्यक्ष डॉ दीपक शहा तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकर राव जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती

प्रा चेतन दिवाण हे गेली वीस वर्षांपासून व्यावसायिक समाजकार्य, मानसिक आरोग्य, दिव्यांगत्व, व्यावसायिक समाजकार्य शिक्षण व संशोधन या विविध क्षेत्रांमध्ये नवोपक्रम उदयास आणणारे तसेच प्रत्यक्ष कार्याद्वारे , प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींचा अवलंब करीत अनुभव देणारे तसेच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून अनुभव देणारे प्राध्यापक म्हणून सर्वत्र परिचित असून विद्यार्थ्यांची नाळ समजून साध्या व सरळ भाषेमध्ये प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देणारे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये व शैक्षणिक क्षेत्रामध्ये परिचित आहेत 

प्रा चेतन दिवाण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास मंडळाचे माजी सदस्य तथा अध्यक्ष व विद्या परिषदेचे माजी अध्यक्ष असून राज्यातील बहुतांशी महाविद्यालये, शिक्षण संस्था, विद्यापीठे तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च शिक्षण विभागाच्या विविध समित्यांवर तज्ञ सदस्य व तज्ञ शिक्षण सल्लागार म्हणून देखील काम पाहत आहेत

विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये घेण्यात येत असलेल्या समाजकार्य विषयाच्या सेट परीक्षेचे चेअरमन म्हणून ते उत्तम कार्य पार पाडत असून महाराष्ट्र राज्यात नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून देखील ते नवीन शैक्षणिक धोरणाची व्यावसायिक समाजकार्यामध्ये उत्तम प्रकारे अंमलबजावणी करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र सरकारच्या वतीने राज्यामध्ये यशस्वी व्यसनमुक्ती मोहीम राबविणे, कोविड काळामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय साधून विविध हेल्पलाइन सुरू करीत जनतेचे मानसिक आरोग्य संवर्धन करणे तसेच मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती व दिव्यांग क्षेत्रामध्ये पाठीमागील वीस वर्षांपासून दिलेल्या योगदानाची दखल घेत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने प्रा चेतन दिवाण यांना शिक्षक दिन व संस्थेचे उपाध्यक्ष ऍड शार्दुल राव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी तसेच सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुनील भिरूड यांना आदर्श कुलगुरू, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक , दत्तकला शिक्षण संस्था दौंड चे संस्थापक अध्यक्ष डॉ रामदास झोड यांना आदर्श संस्थापक, तसेच मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य अशा पुरस्कारांनी या समारंभामध्ये सन्मानित करण्यात आले.

प्रा चेतन दिवाण यांना प्रदान करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

गणपती विसर्जन गेल्या काही दिवसांपूर्वी झालं मात्र कराडच्या चावडी चौकात त्या दिवशी त्याठिकाणी असलेल्या विसर्जन मंडपात फक्त माजी आमदार बाळासाहेब पाटील व काही शहराचे मोजके नगरसेवकच गणपती मंडळांचे स्वागत करण्यासाठी हजर होते शहरातील मुख्य पुढारी समजले जाणारे त्या दिवशी का गैरहजर होते..याची चर्चा गणेश भक्तांमध्ये त्या दिवशी झालीच...


आमदार डॉ अतुलबाबांचा संवेदनशीलपणा ... सामाजिक कार्यकर्ते गणेश पवारच्या एका मेसेजवर केली कॉटेज हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेची कारवाई ; कर्तृत्ववान व संवेदनशील आमदार म्हणून जनतेत ओळख ; जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
 कराडच्या कॉटेज हॉस्पीटलची स्वच्छता वेळच्या वेळी होत नाही त्याचा रुग्णांना त्रास भोगावा लागतो अशा अनेक तक्रारी वारंवार येत होत्या तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते कराडच्या दिवटे गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आ अतुल भोसले याना याबाबतचा मेसेज केला त्यानंतर तातडीने कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांनी त्याठिकाणी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणची स्वच्छता करण्याचे आदेश कृष्णा हॉस्पिटलच्या स्वच्छता टीमला दिले व कॉटेज हॉस्पिटलची स्वछता करून घेतली कॉटेजच्या रुग्णांसह शहरातील सुज्ञ नागरिकांनी  त्यानिमित्ताने आमदार भोसले यांचे अभिनंदन केले आहे 

शहर व परिसरातील गोर गरिबांच्या उपचारासाठी महत्वाच्या असलेल्या कॉटेज हॉस्पिटलमधील संडास बाथरूमच्या अस्वच्छतेसह त्या हॉस्पिटल परिसराचा कॅम्पस व एकूणच त्याठिकाणी सगळीकडेच घाणेरडे वातावरण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार अतुल भोसलेंनी कृष्णा हॉस्पिलच्या "स्वच्छता टीमला' त्याठिकाणची स्वच्छता करण्याचे आदेश दिले व कॉटेज रुग्णालयाचा कायापालटच करून टाकला आहे
त्याठिकाणी अस्वच्छतेमुळे रुग्णांना त्रास होत असल्याच वारंवार बोललं जातं होत तशा तक्रारी रुग्ण व इतर लोकांकडून सातत्याने येत होत्या डॉ भोसले यांच्या कानावर या तक्रारी आल्यानंतर याविषयाला गांभीर्याने घेत त्याठिकाणची स्वछता करण्यासाठी त्यांनी तात्काळ आदेश दिले  
त्यानिमित्ताने छोट्या छोट्या गोष्टीचे देखील गांभीर्य ओळखून जनतेच्या सेवेत आपले कर्तव्य असल्याची भावना असलेला कार्यक्षम व संवेदनशील आमदार म्हणून आमदार अतुल भोसले यांची आता ओळख निर्माण होऊ लागली आहे 
आमदार नसताना त्यांनी हजारो कोटींचा निधी शहर व परिसरासाठी आणला होता आणि आमदार झाल्यावर त्यावरच काम करत त्यांनी आपला शब्द पाळला आहे संपूर्ण कराड दक्षिणमध्ये त्यांनी आणलेली विकासकामे सुरू आहेत त्यांच्या विकसनशील दृष्टीने शहराचा चेहरा बदलत आहे तरी अजूनही अतुलबाबा निधी आणतच आहेत व परिसराचा विकास त्यांच्याकडून सातत्याने चालूच आहे आणि आता दोन दिवसांपूर्वी कराडच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये स्वछतेचा अध्याय गिरवत आमदार भोसले यांनी मोबाईलवर आलेल्या एका मेसेजवर ऍक्शन घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे 
एक संवेदनशील आमदार म्हणून त्यांनी यानिमित्ताने आपली ओळख निर्माण केली आहे  शहर व परिसरात तशी चर्चाही सुरू आहे शहरातील सुज्ञ नागरिकांनी त्यानिमित्ताने आमदार भोसले यांचे अभिनंदन केले आहे 

Thursday, September 4, 2025

छगन भुजबळ सरकारमध्ये मनापासून सहभागी नाहीत, ते असह्य मानसिकतेतून सत्तेत आहेत ; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा कराडमध्ये गौप्यस्फोट ; वेध- माझा शी केली बातचीत ; आणखी म्हणाले...गजेटच्या जीवावर आरक्षण देता येते का? तसा निकष नाहीये...

वेध माझा ऑनलाईन।
छगन भुजबळ हे असह्य मानसिकतेतून या सरकारमध्ये सामील झाले असावेत... कारण ते प्रतिगामी सरकारचे सध्या घटक आहेत...मात्र ते मूळ पुरोगामी विचाराचे आहेत...मी त्यांना चांगले ओळखतो...आम्ही एकत्र काम केले आहे , ते सिनिअर नेते आहेत... ते मनापासून या सरकारमध्ये नक्कीच सहभागी झाले नाहीत...असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज कराडमध्ये वेध माझा शी बोलताना केला

दरम्यान जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून मुंबईत उपोषण केले ते त्यांनी फार मोठ्या परिपक्वतेने हाताळले त्यात त्यांनी मुंबई व संपूर्ण राज्याची काळजी घेतली असल्याचे दिसले असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले...मात्र सरकारकडून मिळालेला या संबंधितचा जीआर पाहिल्यानंतर मराठ्यांची काळजी वाटते असेही थोरात म्हणाले... मराठा समाजाला नेमकं त्यातून काय दिलंय?असा सवाल करत त्यांनी राज्यात मराठा आरक्षण मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली.. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले

ते आज कराड येथील शासकीय विश्राम गृह येथे आले असता वेध- माझा शी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले

ते पुढे म्हणाले...आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या सरकारच्या माध्यमातून सातारा गॅजेट ची जबाबदारी घेतली आहे मात्र खरतर गॅजेट च्या जीवावर आरक्षण देता येते का?तसा निकशच नाहीये मग कसे आरक्षण देणार? हाच मोठा प्रश्न आहे...आरक्षण चिघळत चाललंय म्हणून काहीतरी शब्द द्यायचा म्हणून हा प्रयोग केला गेला असावा आणि जरांगे पाटील यांनीही या प्रश्नाबाबत परिपक्वता दाखवत आरक्षण थांबवत मुंबई आणि महाराष्ट्राची एकप्रकारे चांगली काळजी घेतली असेही थोरात म्हणाले...
पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांसहित त्यांच्या पी ए आवळकर याच्या दुबार मतदान करण्याबाबतच्या भाजप च्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी याबाबत प्रशासनाला जबाबदार धरत वेळेवर नावे कट केली गेली नसल्याने हा प्रश्न उपस्थित झाल्याचे थोरात म्हणाले

भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जातंय असा आरोपही त्यांनी यावेळी केला तसेच
शेतकऱ्यांच्या प्रश्नासह सरकारचे राज्यातल्या अनेक मुद्यावर दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली
दरम्यान राहुल गांधी यांच्या व्होटचोरी च्या मुद्याला  राज्यात लोकांपर्यंत पोचवायला काँग्रेस कमी पडतंय का? या प्रश्नावर सविस्तर उत्तर देण्याचे टाळत त्यांनी पुन्हा भाजपवर टीका केली

Tuesday, September 2, 2025

मराठा आरक्षणाबाबत नवा जीआर काढण्याच्या तयारीत;

वेध माझा ऑनलाईन।
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज (2 सप्टेंबर) मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. मनोज जरांगे यांनी कालपासून पाणी पिणंही बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येतंय. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या देखील हालचाली वाढल्या आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकार लवकरच नवा जीआर काढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगेंना मसुदा दाखवून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्याचा सर्वात मोठा पेच सध्या राज्य सरकारसमोर आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांच्यात बैठक पार पडली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील  यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज (2 सप्टेंबर) मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. मनोज जरांगे यांनी कालपासून पाणी पिणंही बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येतंय. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या देखील हालचाली वाढल्या आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकार लवकरच नवा जीआर काढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगेंना मसुदा दाखवून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्याचा सर्वात मोठा पेच सध्या राज्य सरकारसमोर आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांच्यात बैठक पार पडली.

Monday, September 1, 2025

विदयार्थी घडला तरच चांगल्या समाजाची निर्मीती होत असते ; प्रा. के.पी.वाघमारे

वेध माझा ऑनलाईन।
स्पर्धेच्या युगात  विद्याथ्यांर्ची वाचन संस्कृती जपली पाहिजे , थोरपुरुषांची चिरीत्रे , पुस्तके  वाचणे गरजेचे असून सध्याच्या युगात विदयार्थी घडला तरच चांगल्या समाजाची निर्मीती होत असते असे प्रतिपादन प्राचार्य  प्रा. के.पी.वाघमारे यांनी  विद्यार्थी गौरव सन्मान सोहळ्यामध्ये केले. 

कराड  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर  येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवक संघ बुधवार पेठ कराड यांच्यावतीने बुधवार पेठेतील सन २०२४-२०२५ सालातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचा गौरव सन्मान सोहळा पार पडला या  प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.के.पी.वाघमारे बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.नगरसेवीका बेबीताई थोरवडे, तसेच संघाचे अध्यक्ष गौतम लादे, उपाध्यक्ष मारुती काटरे, सचिव संजय शिखरे,मा.नगरसेवक शांताराम थाेरवडे  मिलींद कांबळे, धनाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी संघाच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्राचार्य प्रा.के.पी.वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर सामुदायीक  बुध्दवंदना घेणेत आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलींद कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय संजय शिखरे यांनी केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. के.पी.वाघमारे यांचा व पाहुण्यांचा सत्कार करणेत आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या  हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचा सन्मान चिन्ह , शालेय साहित्य देवून मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला.  प्रा.वाघमारे पुढे बोलताना म्हणाले  स्पर्धेच्या युगात विद्याथ्यानी उतरणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचा उर्तीर्ण झालेबद्दल  गौरव सन्मान सोहळा या सारखे  उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. तसेच  मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह थोरपुरुषांची पुस्तके वाचन केल्यामुळे इतिहास समजतो त्यामुळे यशस्वी होण्यासाठी वेगळी चालना मिळते व आपल्या भविष्यासाठी ते खुप ते गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले. त्याबरोबर आपल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवक संघ बुधवार पेठ कराड यांनी असे समाजाेपयोगी कार्यक्रम राबवावे असे सांगितले. 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल सरतापे , विकास लादे, रवींद्र लादे, प्रशांत थोरवडे, अमोल सोनवले, नितीन लादे, सिद्धार्थ कांबळे, रवी काटरे, राजेंद्र बा.कांबळे, रत्नाकर कांबळे,भास्कर काटरे, अतुल माने, रणजित थोरवडे , प्रवीण शिंदे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. शेवटी संजय शिखरे यांनी आभार मानले.