सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 53 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 663 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाकडून देण्यात आली.
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील 27, खंडाळा तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 1, महाबळेश्वर तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 1, सातारा तालुक्यातील 10, माण तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 6, वाई तालुक्यातील 5 असे एकूण 53 नागरिकांचा समावेश आहे.
*663 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 54, कराड येथील 12, कोरेगाव 17, वाई येथील 63, शिरवळ येथील 88, रायगाव 6, पानमळेवाडी येथील 130, मायणी येथील 60, महाबळेश्वर येथील 70, पाटण येथील 17, खावली 39, ढेबेवाडी 17 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 90 असे एकूण 663 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
*4 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सांगुर ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, वडगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष व तसेच साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात व्यंकटपुरा पेठ सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुषाचा अशा 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने 33530
एकूण बाधित 5939
घरी सोडण्यात आलेले 2806
मृत्यू 192
उपचारार्थ रुग्ण 2941
000
No comments:
Post a Comment