Thursday, April 24, 2025

कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर :

वेध माझा ऑनलाइन
 कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत गुरुवारी निश्चित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील आरक्षण जाहीर करण्यात आले. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी हे आरक्षण सोडत जाहीर केले. हे आरक्षण 2025 - 2030 या कालावधीत होणाऱ्या निवडणुकीतील सरपंचपदासाठी असणार आहे.

येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल) मध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, महसूल नायब तहसीलदार महेश उबारे, हेमंत बेस्के, युवराज पाटील, राजेश सपकाळ, युवराज काटे, आनंदराव पोळ, आदिनाथ मंडले,  प्रसाद देशपांडे, प्रकाश नागरगोजे,  सुरज लोकरे, अभिजित रावते व मदतनीस आदी उपस्थित होते. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सन 1995 सालापासून 2025 पर्यंतचे शासनाच्या गाव निहाय आरक्षणाबाबत तपशीलवार माहिती उपस्थितांना दिली.

सरपंच आरक्षण खालील प्रमाणे : 

अनुसूचित जाती महिला -  
आणे, आरेवाडी, बेलवाडी, चोरजवाडी, विठोबाचीवाडी, घोणशी, भोसलेवाडी, वडोली भिकेश्वर, केसे, बनवडी, मालखेड, खोडशी.

अनुसूचित जाती 
 शेळकेवाडी (म्हसोली) भोळेवाडी, बामणवाडी, सयापुर, वराडे, येवती, विरवडे, हनुमानवाडी, हवेलवाडी, माळवाडी, पवारवाडी, नडशी.

अनुसूचित जमाती महिला - सुपने

नागरिकांचा मागास प्रवर्ग -
 हरपळवाडी, राजमाची, तासवडे, येळगाव, किरपे, मरळी, वाठार, पाडळी (केसे ), करवडी, येरवळे, विंग, रेठरे खुर्द, मेरवेवाडी, आदर्शनगर, कोयना वसाहत, वाण्याचीवाडी, संजयनगर (शेरे), वाघेश्वर, ओंडोशी, निगडी, वडगाव (उंब्रज), पाल, टेंभू, खालकरवाडी, म्हसोली, अंबवडे
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कोरेगाव, शेणोली, नांदगाव, सैदापूर, कुसुर, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, मस्करवाडी, धनकवडी, वसंतगड, चिंचणी, अंधारवाडी, हणबरवाडी, पाचुपतेवाडी, चौगुलेमळा(भैरवनाथनगर, पाडळी हेळगाव, बेलवडे हवेली, कोर्टी, वडगाव हवेली, वाघेरी, कोणेगाव, उत्तर तांबवे, वनवासमाची (सदाशिवगड) घोगाव, वारुंजी तळबीड, खराडे
सर्वसाधारण महिला प्रवर्ग - 
शेवाळेवाडी (उंडाळे),वडोली निळेश्वर, गोळेश्वर, कोळेवाडी, किवळ, इंदोली, शहापूर, कार्वे, पाचुंद, हजारमाची, वस्ती साकुर्डे, काले, कोरीवळे, पश्चिम सुपणे, गोवारे, शामगाव, संजयनगर (काले) दुशेरे, उत्तर कोपर्डे( यादववाडी), बाबरमाची पुनर्वसन डिचोली, तारुख, वहागाव, चिखली, शिरवडे, गोडवाडी, अक्काईचीवाडी, महारुगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, कामठी, पोतले, जुळेवाडी, शेवाळेवाडी (म्हासोली), जिंती, नारायणवाडी, शितळवाडी, लटकेवाडी, शेवाळेवाडी (येवती), कचरेवाडी, हिंगनोळे, बेलवडे बुद्रुक, जखिनवाडी, गोंदी, नांदलापूर, चचेगाव, सुरली, बाबरमाची, मनू, हेळगाव, गणेशवाडी, सावरघर, करंजोशी, जुजारवाडी, कालवडे, कालगाव, साकुर्डी, पिंपरी, उंब्रज, कासारशिरंबे, चरेगाव, धोंडेवाडी


सर्वसाधारण - रिसवड, जुने कवठे, पेरले, साळशीरंबे, यशवंतनगर, अंतवडी, कपिल, येणके, भुयाचीवाडी, गमेवाडी, खोडजाईवाडी, तुळसण, कालेटेक, येणपे, साजूर, ओंड, शिवडे, सवादे, गोसावीवाडी, लोहारवाडी, बानगुडेवाडी, उंडाळे, भांबे, शेरे, तांबवे, गोटे, मसूर, बेलदरे, नवीन कवठे, वनवासमाची ( खोडशी) यादववाडी, घराळवाडी, टाळगाव, अभयचीवाडी, आटके, मुनावळे, धावरवाडी, हनुमंतवाडी, गायकवाडवाडी, वानरवाडी, कोडोली, डिचोली (मुनावळे), शिरगाव, विजयनगर, कंबिरीवाडी, कोळे, घारेवाडी, भवानवाडी, शिंगणवाडी, नानेगाव, डेळेवाडी, शिंदेवाडी (विंग), मांगवाडी, चोरे, पार्ले, खुबी, मुंढे, भुरुभुशी, म्होप्रे, रेठरे बुद्रुक, घोलपवाडी 

Tuesday, April 22, 2025

कुटुंबासमोरच केंद्रीय गुप्तचर अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या, ; जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला ;

वेध माझा ऑनलाइन
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये केंद्रीय गुप्तचर संघटने मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हा अधिकारी मूळचा हैदराबादचा असून कुटुंबासमोरच त्याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितले. हे कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान गुप्तचर संघटनेत काम करणारा हैदराबादचा हा अधिकारी कुटुंबासोबत काश्मीरमध्ये गेला होता. त्यावेळी तो एक रील शूट करत होता. त्या दरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. यावेळी त्या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुले समोर होती अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसात ते काश्मीरमध्ये कार्यरत होते. या दरम्यान ते पहेलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेले. त्याचवेळी त्याची हत्या करण्यात आली.  दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे.
या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमधील जोडप्यातील पतीला त्याच्या पत्नीसमोरच गोळ्या घालण्यात आल्या. 
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.   
या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. NIA टीम बुधवारी पहलगामला जाऊ शकते. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करून या हल्ल्याची माहिती दिली. पंतप्रधानांशी बोलल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली. सध्या गृहमंत्री श्रीनगरला पोहोचले आहेत.




आमच्याकडे 237 आमदार आहेत, ज्यांना युतीत राहायचं आहे ते राहतील, ज्यांना नाही राहायचं ते बाहेर पडतील. मी आमदारांच्या नाराजीचा फारसा विचार करत नाही,- अतुल सावे असे का म्हणाले / महायुती सरकारमध्ये निधीवाटपावरुन अंतर्गत धुसफुस / शिंदे गटात नाराजी!

वेध माझा ऑनलाइन- 
लोकांना महायुतीत राहायचं आहे ते राहतील, ज्यांना महायुतीत राहायचं नसेल ते बाहेर पडतील, असे वक्तव्य भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. अतुल सावे यांनी शिंदे गटाच्या  आमदाराला हा इशारा दिल्याचे समजते. भाजपकडे पाच वर्षे आहेत. आमच्याकडे 237 आमदार आहेत. त्यामुळे ज्यांना युतीत राहायचं आहे ते राहतील, ज्यांना नाही राहायचं ते बाहेर पडतील. मी आमदारांच्या नाराजीचा फारसा विचार करत नाही, असे अतुल सावे यांनी म्हटले. ते सोमवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.काही दिवसांपूर्वी तांडावस्ती निधी वाटपावरून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना आमदार बाबुराव कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती. अतुल सावे यांनी निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मंत्री अतुल सावे माझ्या मतदारसंघात आल्यावर मी आंदोलन करुन त्यांना विरोध करणार असल्याचा इशारा बाबुराव कदम यांनी दिला होता. तसेच मेघना बोर्डीकर यांनी पत्र लिहून निधी वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत काम रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनी रोखठोक भूमिका घेत एकप्रकारे मेघना बोर्डीकर आणि आमदार बाबुराव कदम यांना थेट इशारा दिला आहे. मी आमदारांच्या नाराजीची खूप काळजी करत नाही. आमच्याकडे 237 आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतोय, ज्याला युतीत राहायचंय त्यांनी राहावं, ज्यांना नाही राहायचं, त्यांनी बाहेर पडावं, असे अतुल सावे यांनी म्हटले. अतुल सावे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अतुल सावे यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटाचे नेते कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या वादात आपल्या गटाच्या आमदारांची बाजू कशी उचलून धरणार, हेदेखील पाहणे औत्स्युकाचे ठरेल.गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये निधीवाटपावरुन अंतर्गत धुसफुस असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांन निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तांडा वस्तीचा निधी मिळावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करुनही अतुल सावे यांनी दिला नाही. हा निधी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिला. त्यामुळे अतुल सावे जिल्ह्यात दौऱ्यावर येतील तेव्हा विरोध करुन आंदोलन करेन, असा इशारा शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी दिला होता. तर मेघना बोर्डीकर यांनी अतुल सावे यांना पत्र लिहीत मंजूर केलेली काम रद्द करण्याची मागणी केली होती.

UPSC चा निकाल लागला ; पुण्याच्या आर्चित डोंगरेने मिळवले दैदिप्यमान यश ; महाराष्ट्रात आला पहिला तर देशात तिसरा!

वेध माझा ऑनलाइन।
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित हा पुण्यातला रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. 

युपीएससी आयोगाकडून 2024 च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण 1009 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये, 335 सर्वसाधारण, 109 ईडब्लूएस, 318 ओबीसी, 160 एससी, 87 एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. 
विशेष म्हणजे 17 एप्रिल 2025 पर्यंत या युपीएससी परीक्षांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर, 7 जानेवारी 2025 पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. युपीएसीकडून 2024 च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण 1132 पदांसाठी भरती काढली होती.

युगेंद्रची तुलना अजितदादा किंवा माझ्याशी नको, शरद पवार अस का म्हणाले

वेध माझा ऑनलाइन
युगेंद्रची  तुलना माझ्याशी किंवा अजितदादांशी करू नका असं शरद पवार म्हणाले. आम्ही राजकारणाची सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडे सत्ता होती. युगेंद्र सत्ता नसताना काम करतोय असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. 

युगेंद्रचा स्वभाव हा नम्र आहे, त्याला सुसंवाद ठेवायचा आहे. तो आपल्या परीने जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय असं शरद पवार म्हणाले. त्यावेळी त्याची तुलना ही माझ्याशी किंवा अजित पवारांशी करू नका असं ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, "आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी आमच्या हातात सरकार होतं. युगेंद्र हा सत्ता नसताना काम करतोय. त्यामुळे त्याच्या हातात कष्ट करणे हे आहे. लोकांशी जेवढा संपर्क ठेवता येईल तेवढा ठेवायचा हे त्याच्या हातात आहे. त्यासाठी तुम्हच्या सर्वांची साथ त्याला हवी आहे. त्यामुळे या क्षणी सत्तेची अपेक्षा आपण ठेवता कामा नये."
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने ते आणि त्यांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना खास शुभेच्छा दिल्या. 
आता एकट्याचे अभिनंदन किती दिवस करायचे अस म्हणत आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, लांबवू नका असं शरद पवार म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हास्य फुललं. 
युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करताना शरद पवारांनी त्यांच्या वाढदिवसाची आठवण सांगितली. ते म्हणाले की, आज जमाना बदलला आहे. गावागावात केक आले आहेत. आमचा वाढदिवस हा गुळ खोबरं किंवा गुळ शेंगदाणे वाटून साजरा केला जायचा.

Saturday, April 12, 2025

यमाई मंदिरात उद्या महाप्रसादाचे आयोजन ; आबा कोळी यांनी दिली माहिती ;

वेध माझा ऑनलाईन।
येथील यमाई मंदिराच्या उत्सवानिमित्त उद्या रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आबा कोळी यांनी दिली आहे

यमाईदेवी उत्सवानिमित्त आज शनिवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत जोतिबा मंदिर मंगळवार पेठ वाडी येथून जोतिबा सासन काठीची मिरवणूक निघाली 
रात्री 9 वाजता जोतिबा सासन काठी व पालखी यमाई मंदिर कन्याशाळेसमोर भेटायला येणार आहे ही परंपरा 100 वर्षापासून सुरू आहे 
यमाई भेटीला मानकरी, सालकरी भेटीला येत असतात 
कृष्णामाई पालखीची मिरवणूकही रात्री 8 वाजता भेटीस येते त्यानंतर जोतिबा सासनकाठी व पालखीची संपूर्ण मंगळवार पेठेत प्रदक्षिणा होते 
त्यानंतर पंढरीचा मारुती येथे रात्री 11 वाजता दर्शन घेऊन सादर सासनकाठी व पालखीची सांगता होते 
दरम्यान रविवारी सकाळी 11 वाजता यमाई मंदिरासमोर महाप्रसाद होणार आहे
सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोळी बंधूनी केले आहे

Wednesday, April 9, 2025

ठोक आता शड्डू! बाळासाहेबांच्या विजयी मिरवणुकीतून कार्यकर्त्यांचे विरोधकांच्या शड्डूला...शड्डू ठोकूनच चॅलेंज !

वेध माझा ऑनलाइन।
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी अधिक चर्चेत राहिली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होतं. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह  पाटील- उंडाळकर यांचं स्व.यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री  परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं 21-0 असा विजय मिळवला. त्यानंतर शहरातून निघालेल्या विजयी मीरवणुकीतून बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या विधांनसभेवेळी मारलेल्या शड्डूला...शड्डूनेच उत्तर देत.. . ठोक आता शड्डू असे म्हणत पुन्हा चॅलेंज दिले आहे...

दरम्यान बाळासाहेब पाटील यांनी विजयानंतर केलेल्या त्यांच्या भाषणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळचा एक प्रसंग सांगितला.  विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गना केल्या, आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार, आम्ही जिंकणार, नाही म्हटलं तरी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती.  सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलावरुन कारखान्याकडे बघून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडं बघून शड्डू  ठोकला गेला. 32 हजार लोकांशी लढत होती ते विसरले. कुणापुढं उन्माद वापरतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त वेळीच करणं आवश्यक आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले . 

दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या  प्रचार सभांमधून घोरपडे व त्यांचे अनुयायी यांनी शड्डू ठोकत बाळासाहेब पाटील यांना चॅलेंज देत आमदारकीची निवडणूक आम्ही जिंकणारच... अशी घोषणा केली होती... त्यावेळी त्यांचा तो शड्डू चांगलाच चर्चेत राहिला होता... दरम्यान निवडणूक पार पडली घोरपडे मोठ्या मतांनी निवडून आले... आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढला... त्यांनी शड्डू ठोकत सह्याद्री कारखाना निवडणुकीत देखील लक्ष घालण्याचे ठरवले...त्यांचा कॉन्फिडन्स आणखी वाढला जेव्हा त्यांना दक्षिण च्या उदयदादाची साथ मिळाली...
कारखान्याची ही  निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलची सरशी झाली...घोरपडे यांच्या पॅनेलचा पराभव झाला... 

दरम्यान या कारखान्याच्या निवडणुकीदरम्यानचा प्रचार करताना देखील घोरपडे म्हणाले होते...6 तारखेला मी मंगळवार पेठेत येऊन गुलाल उधळून पुन्हा शड्डू ठोकणार आहे... मात्र त्यांचा पराभव झाला... दरम्यान या कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे यांच्या त्या शड्डूच्या चॅलेंजला आपल्या शड्डूने उत्तर देत विजयी मिरवणुकीतून ...आता ठोक शड्डू... असे चॅलेंज पुन्हा दिले आहे...हे चॅलेंज थेट मनोज घोरपडे यानाच दिले आहे...
त्यामुळे आमदार घोरपडे पुढील कोणत्या निवडणुकीतून या शड्डूचे उत्तर ...आपल्या आणखी एका शड्डूने देतात... हेच आता पहावे लागणार आहे... 



जावयासोबत सासू गेली पळून, लग्नाआधी घडली थक्क करणारी घटना... पोलीसात तक्रार दाखल...

वेध माझा ऑनलाइन।
अलीगडमधील एका आईने असं काही केलं ज्याची कल्पनाही करता येणार नाही. लेकीचं लग्न ज्या पुरुषासोबत होणार होतं, त्याच्यासोबत आई पळून गेली. मुलीच्या लग्नाची तारिख जवळ येत असल्याचं लक्षात येताच आई जावयासोबत पळून गेली. दोघांच्या लव्ह कनेक्शनचं माध्यम होतं स्मार्टफोन… जो मुलीच्या आईला जावयाने भेट म्हणून दिलेला. दोघे एकमेकांसोबत 20 तासांपेक्षा अधिक वेळ गप्पा करत असायचे.
ही घटना अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावातील आहे, जिथे जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्रची पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दोघांनी एकत्र पळ काढला आहे. दोघे घरातून जवळपास त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत.

जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु होती. नातेवाईकांना पत्रिका देखील पाठवण्यात आल्या होत्या. घरात आनंदी वातावरण होतं. पण अचानक पत्नी घरातून गायब झाली. पत्नी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेली असावी.. असं जितेंद्र यांना वाटलं. पण असं काहीही नव्हतं.

Tuesday, April 8, 2025

मलकापुरात डॉ अतुल भोसलेंचा मनोहर शिंदेना जोर का झटका ; हजारो काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल ; मंत्री बावनकुळे म्हणाले... म्हणूनच काँग्रेस कार्यकर्ते पृथ्वीराजबाबाना सोडून अतुलबाबा यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत...

वेध माझा ऑनलाइन।
मलकापुरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे मलकापूरचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे आणि काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष, माजी सभापती प्रशांत चांदे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे व नुकताच त्यांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत, काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे..
दरम्यान प्रशांत चांदे व शंकरराव चांदे यांचा भाजप प्रवेश राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ना. अतुल सावे, आ.डॉ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे यांनी या प्रवेशकर्त्यांचे त्याठिकाणी स्वागत केले.

मलकापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे हे मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक असून, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत होते. तर ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे हे मलकापूर नगरपालिकेत तब्बल १५ वर्षे नगरसेवकपदी राहिलेले आहेत. यापैकी १० वर्षे ते बांधकाम सभापती, तसेच शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत राहिले आहेत. नगरपालिका होण्यापूर्वी जवळपास १२ वर्षे ते मलकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. प्रशांत शिवाजी चांदे हे त्यांचे पुतणे आहेत.  



ना. बावनकुळेम्ह म्हणाले...

कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे एक कर्तव्यदक्ष आमदार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना गेल्या २० वर्षात काहीही विकास करता आलेला नाही. पण आ.डॉ. अतुलबाबांचा कामाचा धडाका पाहता, ते या ५ वर्षातच विकासाचा बॅकलॉग भरुन काढतील, असा मला विश्वास आहे. या कर्तव्य तत्परतेमुळेच आ.डॉ. अतुलबाबांचे नेतृत्व स्वीकारुन, कराड दक्षिणमधील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस व पृथ्वीराज चव्हाणांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि येणाऱ्या निवणुकीत नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच ठिकाणी सर्व जागांवर भाजपा-महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत.