कऱ्हाड दक्षिणचे आमदार अतुलबाबा यांच्याविषयी लिहिताना या मतदार संघाच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करणे गरजेचे आहे. (स्व.) यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी २७ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व केले. व्यासंग पूर्ण अभ्यासू वृत्ती व बाणेदारपणा त्यांनी नेहमी जपला. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कापूस एकाधिकार योजना, कोयना धरण, एस. टी महामंडळ यासारखे त्यांनी केलेले १६ कायदे महाराष्ट्राच्या विधीमंडळात बघावयास मिळतात. निषकलंक या स्वच्छ चारित्र्यच्या नेत्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली असती, तर अजून महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता. त्यांच्यानंतर ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिणचे नेतृत्व करणारे विलासकाका पाटील यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी कौटुंबिकरित्या संबंध जोडले गेले. सर्किट हाऊस, मंत्रालय यांचे दरवाजे काकांनी सामान्य लोकांसाठी खुले केले. त्यांच्यात स्वाभिमान जागवला हे करत असताना सातारा जिल्ह्याच्या राजकारणात, जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा जिल्हा परिषद, जिल्ह्यातील पंचायत समिती इतर संस्था याच्यावर अभूतपूर्व पकड होती. त्यामुळे ते नेहमी आदरणीय राहिले.
त्यानंतर २०१० ते २०१४ या काळात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत असणारे मा. पृथ्वीराजबाबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुंबईला यावे लागले. २०१० ते २०१४ या त्यांच्या चार वर्षाच्या मुख्यमंत्री काळात कराड दक्षिणसाठी झुकते माफ राहिले. मा. आनंदराव नाना यांना विधान परिषदेचे आमदार म्हणून मिळालेली संधी त्यांनी पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्री पदाचा संपुर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्यांना ताकद देण्यासाठी उपयोग केला. या प्रत्येक नेत्याचे आपले राजकिय, सामाजिक स्थान उल्लेखनीय आहे.
आमदार अतुलबाबांचा विधानसभेत जाणेचा प्रयत्न सुरुवातीपासून होता. त्यासाठी त्यांनी २००९ मध्ये मा. विलासराव काकांचे स्नेहाचे संबंध लक्षात घेऊन कराड उत्तरमधून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हावर प्रस्थापित आमदारांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (साहेब) व ३५ वर्षे मतदार संघाचे नेतृत्व करणारे विलासकाका पाटील या दोघांच्या विरोधात भाजपच्या चिन्हावर ना. देवेंद्र फडणवीस (साहेब) यांच्या शब्दाला मान देऊन निवडणूक लढवली ही लढत अतिशय लक्षणीय ठरली. २०१९ ला पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (साहेब) व विलासकाकांचे वारस अॅड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. २०१९ नंतर झालेल्या मार्केट कमेटीच्या निवडणूकीत बाबांच्या पॅनेलचा झालेला पराभव ह्या चारही पराभावाची गोष्ट लक्षात घेतली असता, कोणत्याही अपयशाला न खचणारा नेता, प्रत्येक पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून जनतेमध्ये उतरला. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी अनेक जेष्ठ कार्यकर्ते, हितचिंतक, कुटुंबिय यांचा सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रभारीपद अतुलबाबांनी स्विकारु नये असा कल होता.
सातारच्या उदयनराजेंना स्विकारावा लागलेला पराभव अतुल बाबांच्या जिव्हारी लागला होता. त्यांनी तन, मन, धन खर्च करुन सातारा लोकसभा मतदार संघ पिंजून काढला. व कऱ्हाड दक्षिणमधील राजेंच्या विरोधात मागील निवडणूकीत असणारे ३२ हजार मताचे मताधिक्य ओलांडून ७०० मतांनी कऱ्हाड दक्षिण आघाडीवर नेला. आणि हिच खरी उदयनराजेंच्या विजयाची प्रमुख गोष्ट ठरली.
भारतामध्ये भाजप मायनोरिटी असतात २४० खासदारामध्ये उदयनराजेंचा समावेश ही पक्षश्रेष्टीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट ठरली. ना. देवेंद्र फडणवीस साहेबांची असणारी विशेष मर्जी व कऱ्हाड दक्षिणमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून केलेली ७०० कोटीची विकासकामे २०२४च्या निवडणूकीमध्ये अतुलबाबांचे जनतेशी निर्माण झालेले नाते, डॉ. सुरेशबाबा, आनंदराव पाटील व बाबांचे कुटुंबिय यांच्या अथक प्रयत्नातून डॉ. अतुलबाबांचा ३९००० मतांनी विजयी झाला.
कऱ्हाड तालुक्याचा राजकीय सामाजिक वारसा (स्व.) यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या विचारांनी चालतो. हा वारसा जपत असताना आमदार म्हणून निवडून आलेल्या अतुलबाबांनी माजी लोकप्रतिनिधी यांच्यावरती टिका टिप्पन्नी न करता आपली वाटचाल सुरु केली आहे. अतुलबाबांचे वय असणारा उमदेपणा व उत्साह लक्षात घेता त्यांनी केलेला संकल्प मला माझ्या १,३९,००० मतदारांच्या विकासासाठी व त्याच्याबरोबर विरोधात पडलेल्या १ लाख मतासाठी कोणतीही कटुता न बाळगता मी कार्यरत राहीन, हीच गोष्ट त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस कौतुकास्पद ठरुन लोकभावनेचा आदर करुन केलेली वाटचाल कऱ्हाड दक्षिण, सातारा जिल्हा व महाराष्ट्र यामध्ये उज्वल भविष्याचा उमदे नेतृत्व म्हणून मान्यता पावेल. या सर्व आशावादासह मा. अतुलबाबांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
लेखन...
श्रीरंग देसाई संचालक,
य. मो. कृष्णा कारखाना लि, रेठरे. रा. आणे, ता. कऱ्हाड