Tuesday, August 5, 2025

कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत भैरवनाथ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या वाढीव खर्चास मंजुरी ; १७.१६ कोटी रुपयांच्या निधीस सरकारने दिली मान्यता ;

वेध माझा ऑनलाइन
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या सुधारित वाढीव खर्चास मंजुरी मिळावी, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून, भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाच्या निधीस भाजपा-महायुती सरकारने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच या पाईपलाईनचे स्थलांतर होऊन, विमानतळ विस्तारीकरण कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून, याठिकाणी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून विमानतळ उभा राहिले. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून सन २०२३ मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारामुळे कराडच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने २२१.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 

पण या निधीमध्ये भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी २०१२ च्या शासन निर्णयात नमूद केलेली ८ कोटी ५० लाखांची तरतूद तशीच ठेवण्यात आली होती. वास्तविक या खर्चात संबंधित पाईपलाईनचे स्थलांतर शक्य नसल्याने, स्थलांतराअभावी विमानतळ विस्तारीकरण कामात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी, भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी सुधारित वाढीव खर्चास मंजुरी मिळावी यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थितीबाबत चर्चा केली होती. 

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत, शासनाने भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाच्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश ४ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रकाशित करण्यात आला आहे. 

भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी सुधारित खर्चाला मंजुरी मिळाल्यामुळे कराड विमानतळाच्या विकासाला गती मिळणार असून, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार व आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.

आज सहकार महर्षी स्व जयवंतराव भोसले यांची पुण्यतिथी ; कराड व वाळव्यामध्ये विविध स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन।
कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची आज १२ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त आज वाळवा व कराड तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी (ता. ५) कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
 

प्रा.हर्षद लोखंडे यांना पी.एच.डी.पदवी प्रदान ; हर्षद लोखंडे हे दैनिक कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांचे चिरंजीव होत.

वेध माझा ऑनलाइन ।
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे येथील संगणक अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. हर्षद नंदकुमार लोखंडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून "Electronics and Telecommunication Engineering" या शाखेत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
"Object Identification and Tracking for Surveillance Applications" या विषयावर त्यांनी आपले संशोधन प्रबंध सादर केला होता. हे संशोधन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. संजय गणोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
या शैक्षणिक प्रवासात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत लोखंडे यांचा मोलाचा सहभाग आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे, MIT ADT युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पूजेरी, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. गणेश पाठक, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. रमेश माळी यांचे सततचे प्रोत्साहन, सहकार्य आणि संस्थात्मक पाठबळ लाभले.
प्रा. डॉ. हर्षद लोखंडे यांनी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 संशोधन लेखांचे प्रकाशन केले असून, त्यांनी 5 आंतरराष्ट्रीय व १ राष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले आहे. तसेच, त्यांना १ जर्मन पेटंट आणि १ भारतीय पेटंट मंजूर झाले आहेत. त्यांच्या संशोधन कार्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. हर्षद लोखंडे हे दैनिक ‘कर्मयोगी’ चे मालक व प्रकाशक प्रा. एन. डी. लोखंडे आणि संपादिका सौ. मंगलताई लोखंडे यांचे चिरंजीव असून, ते  15 वर्षांच्या अभियांत्रिकी अनुभवातून, MIT ADT युनिव्हर्सिटी, पुणे येथून गुणवत्तापूर्ण अध्यापन करीत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Monday, August 4, 2025

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची आज पुण्यतिथी ; कराड व वाळवा तालुक्यात स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन।
कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी १२ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वाजता कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण व अभिवादन केले जाणार आहे.

स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.

त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी (ता. ५) कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. तसेच स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

Sunday, August 3, 2025

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ;

वेध माझा ऑनलाइन।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ही देण्यात आलीये. यामुळे मोठी खळबळ उडाली. गडकरींच्या घराची सुरक्षा आता वाढण्यात आलीये. पोलिस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर खळबळ उडाली. मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी 8:46 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन आला आणि थेट गडकरी यांच घर बॉम्बने उडवून टाकणार असल्याचे म्हटले.
या धमकीच्या फोननंतर स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. धमकीच्या फोननंतर नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर प्रताप नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस आणि श्वान पथक गडकरी यांच्या घरात शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्येक बारीक गोष्टीवर पोलिसांची नजर आहे.

मंत्री शंभूराज देसाई आईला मिठी मारून ढसाढसा रडले: काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन।
स्व.बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला. त्याच मेघदूत बंगल्यात आज तब्बल 55 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाई यांनी गृहप्रवेश केला. यावेळी त्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झालेले बघायला मिळाले.

मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं आहे. आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता. त्यामुळे पहिली पाच वर्ष शंभूराज देसाई यांनी बालपण घालवलं. त्यानंतर आज तब्बल ५५ वर्षानंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रीसह गृहप्रवेशा दरम्यान आले असताना त्यांचे डोळे पानावले. तर संपूर्ण देसाई कुटुंब भावूक झाले.

निशिकांत दुबेंचं महाराष्ट्रात स्वागत करु, ; देवेंद्र फडणवीसांचे विधान, विरोधक आक्रमक ; निशिकांत दुबे म्हणाले होते...पटक पटककर मारेंगे ; कोणाला म्हणाले होते?


वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही दिवसांपासून निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात हिंदी-मराठी वाद चर्चेत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दुबे यांचे स्वागत करण्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात संताप आहे. विरोधी पक्षनेत्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार निशिकांत दुबे हे सातत्याने चर्चेत आहेत. महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद शिगेला पोहोचलेला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेवरुन टीका केली होती. राज ठाकरे जर महाराष्ट्राबाहेर किंवा उत्तर भारतीय राज्यांमध्ये आले, तर त्यांना पटक-पटक कर मारेंगे असे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. राज ठाकरेंनी दुबेच्या धमकीवर खोचक टोला देत प्रतिक्रिया दिली होती. आप मुंबई आइए. मुंबई के समंदर में डुबो-डुबोकर मारेंगे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबेंबद्दल एक विधान केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांचं महाराष्ट्रात आले तर संविधानिकरीत्या त्यांचे स्वागत करू, असे म्हटले आहे. यावरुन आता एकच गदारोळ सुरु आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या स्वागताच्या विधानावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Saturday, August 2, 2025

महादेवी हत्तीणिला परत आणा ; कराडकरांची स्वाक्षरी मोहीम ;


वेध माझा ऑनलाइन।
महादेवी हत्तींनीला परत आणले जावे यासाठी आता कोल्हापूरसह कराडमध्ये देखील स्वाक्षरी मोहीम पार पडली या हत्तींनीला लवकरात लवकर परत आणण्यासाठी यावेळी साकडे घालण्यात आले कराडच्या दत्त चौक येथे ही स्वाक्षरी मोहीम पार पडली 
कोल्हापूर येथे याबाबत मोठी स्वाक्षरी मोहीम पार पडली 2 लाखाहून अधिक स्वाक्षऱ्या यावेळी करण्यात आल्या त्याचे पूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते व  त्या स्वाक्षऱ्या राष्ट्रपती मुर्मु याना पाठवण्यात आल्या होत्या
काल कराडमध्ये देखील दत्त चौकात याच मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली यानिमित्ताने महादेवी हत्तींनीला परत आणण्याबाबत कराडकरांनीदेखील कोल्हापूकरांबरोबरीने आपला आवाज उठवला आहे हा आवाज हळूहळू महाराष्ट्रभर उठण्याची शक्यता आहे

Friday, August 1, 2025

शिवराज मोरे यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करत शिवराज मोरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून, दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

शिवराज मोरे हे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले तरुण नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी दोन वेळा यशस्वी कार्य केले असून, युवक काँग्रेसमध्येही सरचिटणीस आणि उपाध्यक्षपदी निवडणुकीतून निवड होऊन जबाबदारी पार पाडली आहे. युवक काँग्रेसच्या मागील निवडणुकीत त्यांना राज्यभरातून दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मते मिळाली होती. ही बाब त्यांच्या नेतृत्व क्षमतेचा व कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्काचा स्पष्ट पुरावा मानली जात आहे.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवराज मोरे यांनी सामाजिक जाणिवा आणि संघटन कौशल्याच्या जोरावर युवकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राज्यभर युवकांचे संघटन मजबूत करत युवक काँग्रेसची गती वाढवली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण राज्यातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना शिवराज मोरे म्हणाले, “काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. ही केवळ पदाची नव्हे, तर जबाबदारीची संधी आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार युवकांची नवी पिढी घडविणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसचे कार्य गावोगावी पोहोचवणे हे माझे उद्दिष्ट राहील.”

मोरे पुढे म्हणाले, “आज काँग्रेस पक्ष संघर्षाच्या काळातून जात आहे. या कठीण काळात पक्षाला बळ देणे, नव्या उमेदवारांना संधी देणे, आणि सामान्य युवकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचवणे, यासाठी मी स्वतः झटणार आहे. हे केवळ राजकीय नाही, तर वैचारिक आंदोलन आहे.”
शिवराज मोरे यांच्या या नियुक्तीचे अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी स्वागत केले आहे. काँग्रेस नेत्यांसह विविध सामाजिक संस्थांनी देखील त्यांच्या निवडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Thursday, July 31, 2025

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री, तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला कराडकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे उद्घाटन कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, सुरेश पाटील व राहुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेषतः महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समाजासमोरील आपले कर्तव्य पार पाडले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
हा उपक्रम राहुल भोसले आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Wednesday, July 30, 2025

डॉ अतुलबाबा भोसले यांचे कट्टर समर्थक रोखठोक युवा नेते समाधान चव्हाण(बापू)यांचा वाढदिवस दणक्यात साजरा ; विविध स्तरातील मान्यवरांच्या "बापू' ना शुभेच्छा...

वेध माझा ऑनलाइन
आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांचे कट्टर समर्थक व युवा नेते समाधान चव्हाण (बापू)यांचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला आमदार अतुल भोसले यांनी युवा नेते श्री चव्हाण याना भेटून शुभेच्छा दिल्या 
सर्व स्तरातील मान्यवरांनी श्री चव्हाण यांना यावेळी शुभेच्छा देत शुभचिंतन केले

युवा नेते समाधान चव्हाण हे आमदार अतुल भोसले यांचे अतिशय जवळचे व कट्टर कार्यकर्ते मानले जातात मनाने अतिशय मनमोकळा स्वभाव असणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे जे मनात ते मुखात असा त्यांचा स्वभाव आहे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो मागील एका नगरपरिषद निवडणुकित थोड्या फरकाने त्यांची विजयश्री हुकली होती शाहूंचौक मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे कोविड च्या काळात त्यांनी खूप मोठे काम केले आहे त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे सर्व स्तरातील लोकांमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान आहे
भाजप चे आमदार डॉ अतुल भोसले यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात त्यांच्या आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत श्री चव्हाण यांनी डॉ भोसले यांच्या झेंड्याला खांद्यावर घेत किल्ला लढवला आहे आमदार भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी  सकाळीच भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या श्री चव्हाण यांना शहरातील नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांचे शुभचिंतन केले  
त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले गेले

माजी नगरसेवक सुहास पवार ऍक्शनमोड मध्ये... थेट कराड पालिकेत जाऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी ;

वेध माझा ऑनलाइन 
कराड शहरात वाखान परिसरासह अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे  अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे त्याठिकाणी नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक सुहास पवार यांनी थेट पालिका गाठत प्रशासनाला केली आहे

माजी नगरसेवक सुहास पवार यांनी शहरासह वाखान परिसरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेला केली आहे त्याकरिता त्यांनी कराड पालिकेत जाऊन मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्येवर उपाय काढण्याची विनंती केली आहे
या मोकाट कुत्र्यांनी शहरातील विविध भागातील वृद्ध तसेच महिला व लहान मुलांना झुंडीने हल्ला करत चावा घेतल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत
दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील मोकाट कुत्र्यांनी वाखाण परिसरातील लहान मुले व काही महिलांना चावा घेतल्याची घटना घडल्याने त्याठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याठिकाणच्या रहिवास्यानी सुहास पवार यांना भेटून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केल्याने सुहास पवार यांनी पालिका गाठत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्येबाबत उपाययोजना करा असे सांगितले आहे त्यानंतर पालिकेने या मोकाट कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदी देखील करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे त्यामुळे आता ही समस्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे   

Tuesday, July 29, 2025

दहशतवाद्यांना मातीत गाडलं; संसदेतील नरेंद्र मोदींचे खणखणीत भाषण ; म्हणाले ... काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही ; ट्रम्प यांनी मध्यस्ती केल्याचं फेटाळलं ; काँग्रेस पाकिस्तानवर निर्भर होत चाललंय ; काँग्रेसने पाकिस्तानने केलेले खोटे दावे पसरवले ;

वेध माझा ऑनलाइन
पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला असं नरेंद्र मोदी संसदेत आपल्या भाषणात म्हणाले. 

मोदी म्हणाले
पहलगामवरील हल्ला म्हणजे भारताला हिंसेचा खाईत लोटण्याचं आणि देशात दंगे करण्याचा प्रयत्न होता. पण देशवासियांच्या एकीमुळे तो प्रयत्न फसला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाढणार असा संकल्प मी त्यावेळी केला होता. या हल्ल्याची सजा दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना मिळणार. 22 एप्रिल रोजी हा हल्ला झाल्यानंतर मी परदेशातून लागोलाग आलो. त्या दिवशी एक बैठक बोलावली आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणार असा निश्चय केला.
आमच्या सैन्यबलाच्या संकल्पावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली. त्यांनीच ठरवावं की कुठे आणि कधी हल्ला करायचा, सैन्याला सर्व अधिकार दिले. त्यानंतर सैन्याने अशी कारवाई केली की त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणारे आजही थरथरतात.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर भारताच्या बाजूने जगभरातून पाठिंबा मिळाला. जगभरातून समर्थन मिळालं पण माझ्या देशातील विरांना काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही हे दुर्दैव.पहलगामच्या हल्यानंतर मोदींची 56 इंच छाती कुठे गेली असा प्रश्न विचारण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसने राजकारण केलं. काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या सैन्यबलाचे मनोबल कमी होत होतं. काँग्रेसला ना भारताच्या समार्थ्यावर विश्वास आहे ना भारतीय सैन्यावर.आमचा हल्ला निश्चित होता, आमचे ध्येय निश्चित होतं. भारताने ते लक्ष्य पूर्ण केलं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं. जगातल्या कोणत्याही नेत्याने हा हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली नाही हे मी जबाबदारीने सांगतोय.
9 मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सातत्याने मला फोन करत होते. तीन-चार वेळा फोन केल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, असं जर झालं तर पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत त्यापेक्षाही मोठा हल्ला करेल. आम्ही गोळीला उत्तर गोळीने देणार.

पाकिस्तानने जर यापुढे असं काही केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. आजचा भारत हा आत्मविश्वासाने भरला आहे. आजचा भारत हा आत्मनिर्भर आहे. एकीकडे भारत गतीने पुढे जात आहे, पण दुसरीकडे काँग्रेस मतांसाठी पाकिस्तानवर निर्भर होत आहे. काँग्रेसकडून राजकारणासाठी जनतेमध्ये अविश्वास निर्माण केला जात आहे.

सातत्याने भारतीय सैन्याच्या कामगिरीवर काँग्रेसने अविश्वास दाखवला आहे. देशाने नुकताच कारगिल विजय दिवस साजरा केला. पण काँग्रेसने कधीही कारगिर विजय दिवस साजरा केला नाही. ज्या वेळी डोकलाममध्ये भारतीय सैन्य धाडस दाखवत होतं, त्यावेळी काँग्रेसचे नेते कुणाकडून छुपी माहिती घेत होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. आताही काँग्रेसने पाकिस्तानला क्लीन चिट दिली. पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा पुरावा काँग्रेस मागत आहे. नेमकी हीच मागणी पाकिस्तान करत आहे. आज ज्यावेळी त्यांना सगळे पुरावे दिले तर त्यांची अवस्था बिथरल्यासारखी झाली आहे. 

भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले. 9 मे रोजी पाकिस्तानने एक हजार ड्रोन मिसाईलच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे मिसाईल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पडू शकत होते. पण ते सर्व मिसाईल भारताने हवेतच नष्ट केले. भारतीयांना याचा अभिमान वाटला. पण काँग्रेसने पाकिस्तानने केलेले खोटे दावे पसरवण्याचा प्रयत्न केला असंही मोदी म्हणाले.

केंद्र सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीची नाही :

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी भाषेचा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेत इयत्ता 1 ली पासून त्रिभाषा सूत्रीचा निर्णय घेत हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विरोधकांनी केला होता. तसेच, या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरत विरोध केल्यानंतर सरकारने हा निर्णय माघारी घेतला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारनेही काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा केंद्राने सक्तीची केली नसून त्रिभाषासूत्री सक्तीची असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर, आता पुन्हा एकदा हिंदी भाषा सक्तीची नसल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीची नसून पत्रव्यवहार करणाऱ्या राज्यांना त्यांच्या मातृभाषेत पत्रव्यवहार करता येणार आहे.

यापुढे चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत: फडणवीस यांची सर्वच मंत्र्यांना तंबी ;

वेध माझा ऑनलाइन
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्री चांगलेच वादात सापडले आहेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा बेडरुममधला एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्यांच्या खोलीत पैशांनी भरलेली एक बॅग होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.  या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे. यापुढे चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे.फडणवीसांनी घेतला मंत्र्यांचा क्लासराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगल्या खात्यांसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी,  ग्रामविकास विभाग, विधी व न्याय विभागाअंतर्गत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. दरम्यान, याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांचा क्लास घेतला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले ... माझ्यावर पाळत का? माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न होतोय…सरकार कशाला आणि का घाबरतंय?खडसे भडकले;

वेध माझा ऑनलाइन
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली. यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसेंनी माझ्या जावयाला अडकवण्यात येत असल्याचा दावा केलाय. एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी एक मोठा आरोप केला.माझ्या स्वत:च्या घराबाहेर साध्या वेशात आठ ते दहा पोलीस पत्रकार परिषदेत पाळत ठेऊन होते आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांसोबत आत येऊन बसले. माझ्यावर पाळत ठेवण्याचे काय कारण? असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. खडसे पुढे असेही म्हणाले की, हे पोलीस असा वेशात घरामध्ये येऊन बसले आणि पोलिसांना पत्रकार परिषदेमध्ये येऊन बसण्याचा कोणी अधिकार दिला. या राज्यात काय सुरू आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि बोलण्याचा अधिकार असताना माझं तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होतोय? असा सवाल करत खडसेंनी सरकारवरच निशाणा साधला. माझ्या छातीवर दहा-दहा पोलीस का आणून ठेवले जाताय? यामागे नेमकं कारण काय? सरकार कशाला आणि का घाबरतंय? असे सवाल उपस्थित करत खडसेंनी सरकारकडे या प्रश्नांवरील उत्तरांची मागणी केली आहे.

अमित शाह म्हणाले; पहलगाममधील दहशतवाद्यांचा खात्मा केला; प्रियंका गांधींच्या भाषणातून करारा जवाब :काय म्हणाल्या…

वेध माझा ऑनलाइन
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेच्या सभागृहात आजही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. आज संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाममधील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती अमित शाहांनी दिली. दरम्यान, या संदर्भात काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी आपल्या भाषणात सरकारला थेट सवाल विचारत धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.

आज दुपारी संसदेत प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सैन्याच्या शौर्याला सलाम करत पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्दयीपणे हत्या केलेल्या २५ भारतीयांची नावे वाचून दाखवली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात बैसरन खोऱ्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकांसह २६ नागरिकांना ठार करण्यात आले होते. मात्र काल आणि आज मत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. मात्र एकाही मंत्र्याने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला, तो का झाला? याबद्दल चकार शब्दही उच्चारला नाही, असे म्हणत ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गांधी यांनी केला.

लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी घेतला लाभ ; माहिती आली समोर?; अदिती तटकरे म्हणाल्या , कारवाई होणार

वेध माझा ऑनलाइन।
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल 14 हजार पुरुषांनीही घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. कारवाईबाबत आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
आदिती तटकरेंनी म्हटले की, लाडकी बहिण योजनेमुळे अनेक महिलांना आनंदाचे क्षण मिळाले. विरोधकांना मात्र ही योजना खुपत आहे. आम्ही वेळोवेळी माहिती देत आलो आहोत. काही गोष्टींबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 28 जूनला योजनेची घोषणा करण्यात आली होती, 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यावेळी काही पुरुषांनीही अर्ज भरल्याचे समोर आले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीन मुनीर डोनाल्ड ट्रम्प सोबत जेवला त्यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री काय करत होते ? राहुल गांधी यांचा सवाल ;

वेध माझा ऑनलाइन
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री काय करत होते असा प्रश्नही गांधी यांनी उपस्थित केला आहे. गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीन मुनीर आहे. तो ट्रम्पसोबत जेवत होता. ट्रम्प सर्व प्रोटोकॉल तोडून मुनीरचं स्वागत करतात. पंतप्रधान त्यांचा निषेधही नोंदवत नाही असं गांधी यांनी म्हटलं आहे.

पुण्यातले रेव्ह पार्टी प्रकरण ; एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक ; पतीला वाचवण्यासाठी पत्नी रोहिणी खडसे वकिलीचा ड्रेस घालून आल्या कोर्टात ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात सध्या पुण्यातील कथित रेव्ह पार्टीची सगळीकडे चर्चा आहे. या पार्टीत गांजासदृश पदार्थ, दारुच्या बॉटल्स सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आले आहे. आता आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी अंगावर वकिलीचा कोट चढवला आहे. त्या सुनावणीदरम्यान, पुणे न्यायालयात वकिलाचा कोट घालून हजर होत्या.
पुण्यातील खराडी येथील रेव्हा पार्टी प्रकरणी प्रांजवल खेवलकर यांच्यासह इतर सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सोपवण्यात आली होती. ही कोठडी आता संपली आहे. त्यामुळे आज या सर्व आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात रोहिणी खडसे यादेखील दिसल्या. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे आज न्यायालयात हजर होत्या. खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्या खुद्द एक वकील आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यादेखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून दिसल्या. त्यामुळे आता नेमके काय होणार? प्रांजल खेवलकर तसेच इतर आरोपींची सुटका होणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

मोदींमध्ये इंदिरा गांधीच्या तुलनेत 50 टक्के जरी हिंमत असेल तर ...काय म्हणाले राहुल गांधी ?

वेध माझा ऑनलाइन।
ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला यावर संसदेत चर्चा होत आहे. सोमवारपासून (28 जुलै) चालू झालेल्या या चर्चेत साधक-बाधक चर्चा होत आहे. हे ऑपरेशन राबवताना सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक, मोदी सरकारचे धोरण यावर विरोधक बोट ठेवत आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. दरम्यान, आज (29 जुलै) खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारची लक्तरं काढली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलतना मोदींमध्ये इंदिरा गांधीच्या तुलनेत 50 टक्के जरी हिंमत असेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असं जाहीर करावं, असं थेट आव्हानच दिलंय.

पहलगावरील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. भारताने हवाई हल्ल्यात अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, असा दावा केंद्र सरकारकडून केला जातो. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ले केले होते. दरम्यान, दोन्ही देशांत युद्ध भडकण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने मध्यस्थी केली होती. तसेच एकमत झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी झाल्याचे जाहीर केले होते. हाच मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केला. त्यांनी मोदींना थेट आव्हान दिले.

Saturday, July 26, 2025

कराडमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत सेना-भाजप युती होणार का? वेध-माझा च्या प्रश्नावर आमदार डॉ अतुलबाबांची प्रतिक्रिया काय ?


वेध माझा ऑनलाईन ।
कराडमध्ये सेना भाजप पक्षाची युती येत्या कराडच्या नगरपरिषद निवडणुकीत पहायला मिळणार का? या वेध - माझा च्या प्रश्नावर आमदार अतुल भोसले म्हणाले... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितले आहे की जिथं शक्य आहे त्याठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत... त्यामुळे आमची भूमिका स्पष्टच आहे. शिवाय आमचे संबंध चांगले आहेत. समंजसपणाने आम्ही येणाऱ्या निवडणुकीत मार्ग काढू अस म्हणत जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचे संकेत आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी आज दिले... मात्र कराडमध्ये पालिका निवडणुकीत ही युती होणारच...असे ठामपणे आमदार भोसले आजतरी म्हणाले नाहीत...

श्रावण महिना सुरू आहे. त्याअगोदरच्या आषाढ महिन्यात शहरात झालेल्या काही आखाड्या मोठ्या चर्चेत आल्या. त्यादरम्यान माजी आमदार बाळासाहेब पाटील व आमदार अतुल भोसले यांचे फोटो एकत्रपणे फ्लेक्सवर झळकवत एक आखाडी शहरात पार पडली. त्या फोटोवरून कराडच्या राजकारणात मनोमिलनाचे राजकारण होण्याचे संकेत मिळाले अशी चर्चा सुरू झाली.याला झालेल्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. त्या निवडणुकीत पक्षाची झूल बाजूला ठेवत डॉ अतुल भोसलेना एक मैत्रीपूर्ण मदत झाली व त्यानंतर त्यांना मोठ्या लिडने आमदारकी मिळाली अशी चर्चा होती
त्याचाच धागा पकडत होणाऱ्या पालिका निवडणुकीत डॉ अतुल भोसलेकडून त्याचीच मैत्रीपूर्ण परतफेड होणार का? अशा चर्चा सुरू असतानाच शहरात पार पडलेल्या "आखाडया' नी व काही ठिकाणी झलकलेल्या फ्लेक्सवरील आजी माजी आमदारांच्या फोटोनी शहरातील पालिका निवडणुकीसाठी नव्याने होणाऱ्या मनोमिलनाचे संकेत मिळाले असे बोलले गेले...त्याच अनुषंगाने आज आमदार भोसले स्टेडिउमवर पहाणी करण्याकरिता आले असता ,त्यांना कराडच्या पालिका निवडणुकीत युती म्हणून लढणार का?असे  विचारले असता कराडमध्ये पालिका निवडणुकीत ही युती होणारच...असे ठामपणे आमदार भोसले आजतरी म्हणाले नाहीत...ते म्हणाले...जिथं शक्य आहे त्याठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, समंजसपणाने मार्ग काढू... 
मग आता याचा अर्थ काय घ्यायचा? अशी आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

कराडच्या स्टेडियमच्या पुनर्निर्माण प्रक्रियेला सुरवात होत आहे त्या अगोदर त्याठिकाणची पहाणी करून विविध क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंबरोबर चर्चा करण्यासाठी आमदार अतुल भोसले त्याठिकाणी आले होते
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला 
त्यांच्यासह शिवसेना जिल्हा समनवयक राजेंद्रसिह यादव देखील तेथे हजर होते 

यावेळी आमदार भोसले म्हणाले नव्याने होणारे कराडचे स्टेडियम देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर कराडचे नाव उजवल व मोठे करणारे ठरेल . हे स्टेडियम स्वप्नवत होणार आहे यात शंका नाही. राज्य शासनाकडून 10 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आले आहेत. पैशाची काळजी करायचे कारण नाही.  कसलीही अडचण येणार नाही. राज्य व देश, पातळीवरील खेळाडू तयार होण्यासाठी याद्वारे मदत होणार आहे, त्या दर्जाचे काम व सर्व सुविधा याठिकाणी निर्माण होतील यासाठी मी सूचना केल्या आहेत. स्टेडियम तयार होताना क्वालिटी मध्ये कसलेही कोंप्रमाईज केले जाणार नाही, दर्जेदारच काम होईल असा ठाम विश्वास आमदार भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान जोपर्यंत या स्टेडियम चे काम चालू राहणार आहे तोपर्यंत खेळाडूंना पर्यायी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही आमदार भोसले यावेळी म्हणाले

राजेंद्रसिह यादव म्हणाले कराडचे स्टेडियम देशात आदर्शवत असे खेळाडूंसाठीचे संकुल म्हणून नावारूपास येईल स्टेडियम तयार होईपर्यंत खेळाडूंना खेळण्यासाठी आपण इतर दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहोत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील यादव यांनी यावेळी केले

यावेळी शहरातील काही खेळाडू व प्रशिक्षक यांच्यासह लोकशाही आघाडी, शिवसेना, तसेच भाजपचे काही माजी नगरसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असणारे काहीजण देखील यावेळी उपस्थित असल्याचे दिसले. 

कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरवदि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनतर्फे पुरस्कार प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णा सहकारी बँकेला मुंबई येथे ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन’च्यावतीने सन २०२३-२४ साठीचा ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री ना. पंकज भोयर यांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन’च्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या बँकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. या संस्थेने राज्यातील ५०० कोटी ते १००० कोटी रूपयांपर्यंतच्या ठेवी असणार्‍या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड या पुरस्कारासाठी केली. 

कृष्णा बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विस्तार केला असून, सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. बँकेच्या कार्याची नोंद घेऊन बँकेला सन २०२३-२४ साठीचा ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 

मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सहकार राज्यमंत्री ना. पंकज भोयर यांच्या हस्ते कृष्णा बँकेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, हर्षवर्धन मोहिते, विजय जगताप, संतोष पाटील, दिलीपराव पाटील, प्रदीप पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

यावेळी बोलताना ना. भोयर म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या पारदर्शक, ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची राज्य पातळीवर झालेली अधिकृत दखल आहे. आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत सहकारी बँकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. पारदर्शक व्यवहार, तांत्रिक सक्षमता आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक सेवा पोहोचवणे ही सहकार क्षेत्राची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी सामूहिकतेने, सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास भविष्यात मोठे चांगले बदल शक्य आहेत. 

याप्रसंगी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदींसह बँकींग क्षेत्रातील मान्यवर व विविध बँकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Friday, July 25, 2025

आनंदराव लांदे म्हणाले..."त्या' बोगस सेंटरवर चार दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करणार ;

वेध माझा ऑनलाईन
शहरात शिंदेमळा परिसरात हॉलिस्टिक हिलींग सेंटर सुरू असून या सेंटरचे मालक राजेश शिंदे यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. त्यानंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सेंटरमध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असून बेकायदेशीर सेंटरवर चार दिवसात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
याप्रकरणी कारवाईसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी चार दिवसात कारवाई करतो, असे सांगितले आहे. त्यामुळे गुरूवारचे आंदोलन स्थगित केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई न केल्यास पुढील महिन्यात आंदोलन करणार असल्याचे संकेत आनंदराव लादे यांनी दिले आहेत.

स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणार्‍या राजेश शिंदे याच्यावर दोन महिन्यापूर्वी परप्रांतातील मित्राला हाताशी धरून एका डॉक्टर महिलेसह दोन महिला व दोन नागरिकांचा परस्परसंबंध असल्याचा व्हिडीओ बनवून घेतला असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आनंदराव लादे यांनी पत्रकार परिषद घेत राजेश शिंदे याच्यावर गंभीर आरोप केले.
आनंदराव लादे म्हणाले, सन 2017 साली सोशल मीडियावर एका महिलेच्या नावाने अकाऊंट सुरू करून आपला फोटो अपलोड करत बदनामी करण्यात आली होती. याप्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे याप्रकरणी अनुसूचित जाती कायद्यांतर्गत राजेश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच हॉलिस्टिक हिलिंग सेंटरला किलेशन थेरपीसाठी इंडियन मेडिकल कौन्सीलची परवानगी आहे का, याची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी करावी. या सेंटरमधील डॉक्टरांनी विशेष अभ्यासाची प्रमाणपत्र व त्याची शिक्षणाची पदवी घेतली आहे का? याचाही तपाास करावा. हे सेंटर बेकायदेशीर असल्याचा दावा करत प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी आनंदराव लादे यांनी केली आहे.



Thursday, July 24, 2025

कराडचे माजी मुख्याधिकारी शंकर खंदारे अटकेत ; 10 लाखाची लाच मागितल्या प्रकरणी अटक ; कराड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात केले हजर; पाच दिवसाची पोलीस कोठडी ;

वेध माझा ऑनलाईन।
 गेल्या 4 महिन्यांपूर्वी कराड नगरपरिषदेत घडलेल्या लाच प्रकरणातील आरोपावरून  तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना  आज गुरुवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना कराड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

बांधकाम परवानगीसाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी खंदारे यांच्यासह चौघांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती, त्यामध्ये तिघांना अटक करण्यात यश आले होते, मात्र खंदारे फरार होते. आज गुरुवार, दि. 24 रोजी सकाळी साताऱ्यात स्थानिक गुन्हे विशेष शाखेने त्यांना अटक करून लाच लुचपत विभागाकडे सोपवले होते. त्यानंतर संबंधित विभागाने खंदारे यांना आज कराड येथील अतिरिक्त जिल्हा कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Wednesday, July 23, 2025

हजारोंच्या उपस्थितीने गाजली सुहास पवारांची "आखडी'; माजी नगरसेवक सुहास पवारांच्या "आखडी' ची शहरात जोरदार चर्चा ; डॉ अतुल भोसलेंच्या सुहास पवारांना फोनवरून शुभेच्छा ; पुन्हा आजी-माजी आमदारांच्या "मनोमिलनाच्या ' चर्चेला उधाण ;

वेध माझा ऑनलाईन।
सध्या शहरातील आजी-माजी नेत्यांचा आखाडीचा दणका ठिकठिकाणी सुरू आहे प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक व युवकांचे आशास्थान असलेले सुहास पवार यांची आखडी मंगळवारी दिनांक 22 रोजी पार पडली आमदार डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे राजकीय एकत्रिकरण या कार्यक्रमात कराडकराना पहायला मिळणार का?  व याचे परिणाम होणाऱ्या शहराच्या पालिका निवडणुकीत मनोमिलनाच्या रूपाने शहराला दिसणार का? अशी चर्चा होती 
या आखडी कार्यक्रमासाठी डॉ अतुल भोसले व बाळासाहेब पाटील यांचे फोटो एकत्रित फ्लेक्सवर झळकल्याने त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आणले होते  
दरम्यान आमदार डॉ अतुल भोसले बाहेरगावी असल्याने त्यांनी सुहास पवार यांना फोनवरून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तर माजी आमदार बाळासाहेब पाटील हे स्वतः कार्यक्रमस्थळी हजर असलेले पहायला मिळाले
सदर आखडी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती महिला देखील मोठ्या प्रमाणात  हजर होत्या या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे
सध्या शहराच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार आपली तयारी दाखवत काही सामाजिक इव्हेंट साजरे करताना  दिसत आहेत त्यासाठी सध्या आखडीचे आयोजन तसेच काहीजण वाढदिवस मोठा साजरा करून लोकसंपर्क वाढवताना दिसत आहेत  शहरातून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी या नेत्यांची ही तयारी असल्याचे मानले जात आहे माजी आ बाळासाहेब पाटील गटाचे माजी नगरसेवक सुहास पवार व मित्र परिवाराने नुकतेच आखाडी च्या निमित्ताने जेवणावळीचे आयोजन केले होते तसा मचकूर असणारे फ्लेक्स शहरातील चौकात लागले होते त्यावर भाजप आमदार डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे फोटो असल्याने स्वतः हे दोन्ही आजी-माजी  आमदार या कार्यक्रमाला येणार अशी चर्चा गावात झाली त्यामुळे होणाऱ्या शहरातील नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार असल्याचे या कार्यक्रमातून संकेत मिळत आहेत का? अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली 
विधानसभा निवडणूकीत सुहास पवार यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले याना  उघडपणे केलेली मदत शहरात चांगलीच गाजली त्यां दोघांचे एकमेकांशी असणारे मित्रत्वाचे संबंध यानिमित्ताने शहरासमोर आले त्यानंतर आता यावर्षीच्या  होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब पाटील व भाजप चे अतुल भोसले हे पक्षीय झूल बाजूला ठेवून गटपार्टीचे राजकारण करत पुन्हा एकमेकाला मदत करणार का? अशी चर्चा नगरसेवक पवार यांच्या या आखडी च्या निमिताने शहरात सुरू झाली आणि याच पार्श्वभूमीवर ही आखाडी जोरदार चर्चेची ठरली

माजी नगरसेवक सुहास पवार हे युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते निष्ठावन्त म्हणून देखील ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा त्यांना व पार्टीला मतदाराच्या रूपाने नेहमीच झालेला दिसून आलेला आहे कोरोना काळात त्यांचे कार्य न विसरता येण्यासारखे आहे सुहास पवार यांचा संपर्क प्रत्येक समाजात खूपच मोठा असल्याने त्यांच्या आखडी च्या कार्यक्रमाला हजारो लोकांनी हजरी लावत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलेले दिसले गेली 15 वर्षे सुहास पवार प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेची सेवा करत आहेत त्यांच्या आखडीचे निमित्त डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मनोमिलन होण्याला कारणीभूत ठरणार का?हेच काही दिवसांनी कळणार आहे अशी चर्चा आहे...

दरम्यान या "आखडी' कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब पाटील माजी उपनगराध्यक्ष सुभाष काका पाटील, लोकशाही आघाडी चे अध्यक्ष जयंत काका पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील लोकशाही आघाडी चे गटनेते सौरभ पाटील तात्या, जयंत बेडेकर दादा , रमेश मोहिते, गंगाधर जाधव, अख्तर भाई अंबेकरी, रणजीत पाटील नाना ,सुरेश पाटील नाना, शिवराज इंगवले, राहुल खराडे तसेच आमदार डॉ अतुल भोसले यांचे समर्थक कार्यकर्ते त्याचबरोबर प्रभागातील तरुण कार्यकर्ते व महिलांची मोठी उपस्थिती होती

रणजित पाटील(नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन ; हजारो लोकांनी घेतला लाभ ;

वेध माझा ऑनलाईन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व शिवसेना नेते रणजीत पाटील नाना यांच्या वाढदिवसानिमित्त  आयोजित महाआरोग्य शिबिराचा दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिक व महिलांनी लाभ घेतला. 
सकाळी शिबिराचे उद्घाटन कराड अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, विक्रम घोरपडे, सलीम मुजावर, डॉ. मोहन पाटील,  धीरजशेठ गांधी, प्रा. आटकर, पै. संतोष वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी तपासणी करण्यात आली जवळचा चष्मा मोफत देण्यात आला स्त्रीरोग तपासणी शिबिरात भाग घेणाऱ्या महिलांना भेटवस्तू देण्यात आली जनरल मेडिसिनचे मोफत औषध वाटप करण्यात आले त्याबरोबर दंतच चिकित्सा हाडांची तपासणी बीपी शुगर तपासणी महा लॅब द्वारे विविध चाचण्या याचाही गरजू नागरिकांनी लाभ घेतला गरजू महिलांना नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी मूळ किमतीवर 30 टक्के सवलत देण्यात आले या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचा गुलाबाचे रोप व फळ झाड देऊन सन्मान करण्यात आला. शाळा क्रमांक 9 मध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तर 10 अंगणवाडीतील मुलांना खाऊ व गणवेश वाटप करण्यात आले. एकूण चार हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांना रेनकोट; ज्येष्ठांना छत्री वाटप
शहर स्वच्छतेची कामे करणारे आरोग्य कर्मचारी, मुकादम यांना रणजीतनाना पाटील मित्र मंडळातर्फे रेनकोट वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या आशा वर्कर्स यांना गुलाबाचे रोप भेट देण्यात आले. तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री व काठी वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

रणजीतनानांच्या दातृत्वाला तोड नाही ; आमदार मनोज घोरपडे यांचे प्रशंसोदृगार; समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा;

वेध माझा ऑनलाईन।
समाजात अनेक लोकांकडे प्रचंड पैसा आहे. पण समाजासाठी खर्च करण्याची दानत लागते. ही दानत रणजीतनाना पाटील यांच्याकडे असून त्यांचे आणि समाजाचे जिव्हाळ्याचे नाते आहे, असे प्रशंसोदृगार आमदार मनोज घोरपडे यांनी काढले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटृर समर्थक, शिवसेना नेते सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील (नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक आप्पा माने, शिवसेनेचे विनायक भोसले, उद्योजक सचिन पाटील यांची उपस्थिती होती.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले की, रणजीत नानांच्या रुपाने मला सच्चा व जिवलग मित्र मिळाला आहे. शहरात मोठ्यांपासून लहानांपर्यंत त्यांचे सर्व स्तरात स्नेहाचे संबंध आहेत. छत्रपती संभाजी महाराज स्मारक व लिबर्टीचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही मोठी विकासकामे त्यांच्या अविरत धडपड व चिकाटीने मार्गी लागली. आपल्या उत्पन्नातील बराच भाग ते समाजासाठी खर्च करतात. आज वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ दहा हजार लोकांनी घेतला आहे. या सेवाभावी नेतृत्वाला समाजाने मोठे करावे.
विनायक भोसले यांनीही रणजीतनानांचे नेतृत्व कराडकरांनी मोठे करावे, असे आवाहन केले.
यावेळी कराडला देशपातळीवर स्वच्छतेत अव्वल आणण्यासाठी काम करणारे आरोग्य कर्मचारी, मुकादम,  माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, पुरस्कार प्राप्त पत्रकार देवदास मुळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महिला रिक्षा चालक मंगल आवळे यांचाही सत्कार करण्यात आला.
शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त सकाळपासून कराड शहर तालुका तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर मान्यवरांनी रणजीत नानांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, अँड. उदयसिंह पाटील, मंगेश चिवटे, सत्यनारायण मिणीयार यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार आनंदराव पाटील, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कार्यकारी संचालक दिलीप गुरव, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, माजी नगरसेवक अरुण जाधव, सुहास पवार, इंद्रजित गुजर, अतुल शिंदे, स्मिता हुलवान, अड. मानसिंगराव पाटील, श्रीमती कुसुम पवार, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर भाऊ शिंदे, राजेंद्रआबा यादव, माजी सभापती राजू कदम, महेश चव्हाण, दक्ष कराडकर चे प्रमोद पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत माने व सदस्य, श्रीमती यांच्यासह प्रत्यक्ष भेटून रात्री उशिरापर्यंत रणजीत नानांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.

Tuesday, July 22, 2025

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे भव्य महारक्तदान संकल्प अभियान संपन्न ; भाजप नेते विक्रम पावसकर यांच्या हस्ते झाले या अभियानाचे उदघाटन ;

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे भव्य महारक्तदान संकल्प अभियान राबवण्यात आले. या शिबीराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. 

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर ‘महारक्तदान अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ३३ मंडलांमध्ये महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कराड शहर, कराड दक्षिण मध्य, कराड दक्षिण पूर्व आणि कराड दक्षिण पश्चिम अशा चार मंडलांचे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. 

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते या शिबीराचे उद्‌घाटन करण्यात आले. शिबीरात अनेकांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तूचे वितरण करण्यात आले.

या अभियानासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक आणि महालक्ष्मी ब्लड बँक या संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. स्वाती पिसाळ, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पैलवान धनंजय पाटील, कराड शहराध्यक्ष सौ. लोखंडे, मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, प्रविण साळुंखे, माजी नगरसेवक सुहास जगताप, महादेव पवार, मलकापूरचे माजी नगरसेवक दिनेश रैनाक, सुनील शिंदे, शंकर पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे, राजू मुल्ला, भारत जंत्रे, संतोष हिंगसे, धनाजी माने, सुदर्शन पाटसकर, गिरीश शहा, वसीम मुल्ला, रमेश मोहिते, रमेश लवटे, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Monday, July 21, 2025

निमित्त "आखाडी' चे ; युवा नेते विनायक कदम यांची पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू ; आमदार डॉ अतुल भोसले ,राजेंद्रसिह यादव , विक्रम पावसकर यांची राहणार उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाईन।
सध्या शहरातील आजी-माजी नेत्यांचा आखाडीचा दणका ठिकठिकाणी सुरू आहे तर काही युवा नेते देखील असे आखाडीचे कार्यक्रम आयोजित करून लोकसंपर्क वाढवत शहरातून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी जणू तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे शहरातील युवा नेते व  प्रभाग क्रमांक दोनमधील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते विनायक विलासराव कदम यांनी आखाडीच्या निमित्ताने आपल्या वॉर्डमधील नागरिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे त्यासाठी त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन पत्रिका देत आमंत्रण दिले आहे या उपक्रमास आमदार डॉ अतुल भोसले, सेना नेते राजेंद्रसिह यादव, भाजप नेते विक्रम पावसकर यांच्यासह शहर व परिसरातील अनेक राजकीय नेते नगरसेवक उपस्थित राहणार आहेत  

विनायक कदम हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचे सामाजिक काम मोठे आहे त्यांचा लोकसंपर्क देखील दांडगा आहे त्यांनी कोरोना काळात मोठं काम केले आहे 
तसेच  आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून विनायक कदम व मित्रपरिवार यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना, आयुष्यमान कार्ड याचा भव्य कॅम्प घेत त्याचा फायदा जनतेला मिळवून देण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न आजही शहरात चर्चेत आहेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारासाठी त्यांनी मेहनत घेतली होती. 
त्यांचे समाजासाठी असलेलं योगदान तसेच त्यांचा जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि लोकाभिमुख कार्य हे त्यांना युवा नेता म्हणून ओळख देण्यासाठी बळकटी देत आहे. 

निमित्त माजी नगरसेवक सुहास पवार यांच्या "आखाडी ' चे...पडद्यामागे राजकारण घडतंय पालिका निवडणुकीसाठी "मनोमिलना ' चे ?

वेध माझा ऑनलाईन
सध्या शहरातील आजी-माजी नेत्यांचा आखाडीचा दणका ठिकठिकाणी सुरू आहे तर वाढदिवस मोठा साजरा करून काही नेते लोकसंपर्क वाढवताना दिसत आहेत  शहरातून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी या नेत्यांची ही जणू तयारी सुरू असल्याचे मानले जात आहे माजी आ बाळासाहेब पाटील गटाचे माजी नगरसेवक सुहास पवार व मित्र परिवाराने नुकतेच आखाडी च्या निमित्ताने जेवणावळीचे आयोजन केले आहे तसा मचकूर असणारे फ्लेक्स शहरातील महत्वाच्या चौकात लागले आहेत त्यावर भाजप आमदार डॉ अतुल भोसले व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे फोटो आहेत स्वतः हे दोन्ही आजी-माजी  आमदार या कार्यक्रमाला येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे होणाऱ्या शहरातील नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार असल्याचे या कार्यक्रमातून संकेत मिळत आहेत का? अशी चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू आहे

माजी नगरसेवक सुहास पवार हे युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते निष्ठावन्त म्हणून देखील ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा त्यांना व पार्टीला मतदाराच्या रूपाने नेहमीच झालेला दिसून आलेला आहे 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सुहास पवार यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले याना  उघडपणे केलेली मदत शहरात चांगलीच गाजली त्यां दोघांचे एकमेकांशी असणारे मित्रत्वाचे संबंध यानिमित्ताने शहरासमोर आले त्यानंतर आता यावर्षीच्या  होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब पाटील व भाजप चे अतुल भोसले हे पक्षीय झूल बाजूला ठेवून गटपार्टीचे राजकारण करत पुन्हा एकमेकाला मदत करणार का? अशी चर्चा यानिमिताने होऊ लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुहास पवार यांनी अरेंज केलेली उद्याची आखाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे होणाऱ्या या आखाडी च्या कार्यक्रमाला हे दोन्ही आजी-माजी आमदार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळाली आहे

एकूणच शहरातील होणाऱ्या पालिका निवडणूकीसाठी अशा एकत्रिकरणाच्या सार्वजनिक कार्यक्रमातून कोणा- कोणाचं आणि काय - काय राजकीय समीकरण साधलं जाणार? हे लवकरच समजणार आहे...तोपर्यंत शहरात अजून कुठं... कुठं... आणखी काय- काय पडद्याआड घडतंय हेच आता आपल्याला पहायचं आहे...!


Saturday, July 19, 2025

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान ; सातारा जिल्ह्यात ३३ ठिकाणी करण्यात येणार आयोजन; ५००० रक्तपिशव्यांच्या संकलनाचे उद्दिष्ट ;


वतेढ माझा ऑनलाईन।
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंगळवार दि. २२ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर ‘महारक्तदान अभियान’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ३३ मंडलांमध्ये महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातून एकूण ५००० रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा निर्धार आल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्यावतीने राज्यभर सेवा अभियानअंतर्गत महारक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. याअंतर्गत सातारा जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एकूण ३३ मंडल क्षेत्रांच्या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. 

दरम्यान, कराड दक्षिण मतदारसंघातही मंगळवारी (ता. २२) मार्केट यार्ड, कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते या शिबीराचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या अभियानासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक आणि महालक्ष्मी ब्लड बँक या संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.

या रक्तदान मोहिमेत नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, रक्तदान करण्याचे आवाहन आ.डॉ. भोसले यांनी केले आहे.

Friday, July 18, 2025

“सामाजिक भान आणि सेवाभावाची परंपरा” जपणाऱ्या मा. रणजीत (नाना) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज कराड येथे एक भव्य मोफत महाआरोग्य व सेवा शिबिर ; नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, आयोजकांच्या वतीने आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन ।
“सामाजिक भान आणि सेवाभावाची परंपरा” जपणाऱ्या मा. रणजीत (नाना) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे एक भव्य मोफत महाआरोग्य व सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे उद्या दिनांक 19 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वाखाण रोड, कराड अर्बन बँकेसमोर, पाटील गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हे शिबिर पार पडणार आहे.

या शिबिरात विविध आरोग्य सेवा मोफत दिल्या जाणार असून, शेकडो नागरिकांना याचा लाभ होणार आहे. विशेषतः नेत्र तपासणीसह मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी (प्रत्येक महिलेस खास भेटवस्तू), जनरल मेडिसिन, दंतचिकित्सा, हाड तपासणी, बीपी, शुगर व ईसीजी तपासणी तसेच आवश्यक औषधांचे वाटप यांचा समावेश आहे. एच. व्ही. देसाई आय सेंटर, ऑन्को लाईफ सेंटर, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबवले जात आहेत.
आरोग्य तपासणीबरोबरच समाजहिताच्या इतर उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व फुलझाडांचे वाटप, तसेच शैक्षणिक दाखले, रेशनकार्ड, मतदान नोंदणीसंदर्भातील मार्गदर्शन, पीएम किसान योजना व शेती विमा माहिती यांचा समावेश आहे.
गांधी फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेला हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, “सेवा हीच खरी श्रद्धा” ही भावना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा ठरतो आहे.
कराड परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कराड पंचायत समितीच्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर ; आ डॉ अतुलबाबांचे प्रयत्न;

वेध माझा ऑनलाईन
कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाजपा-महायुती सरकारने कराड पंचायत समितीच्या स्वतंत्र आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामीण विकास विभागाच्या आदेशानुसार हा निधी मंजूर करण्यात आला असून, ३६२० चौ. मी. क्षेत्रफळाच्या जागेत या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

कराड पंचायत समितीची सध्याची प्रशासकीय इमारत ही जुनी व जीर्ण झाली आहे. यामुळे कामकाजासाठी आवश्यक जागा अपुरी पडत आहे. याच इमारतीमध्ये बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे, बाल विकास प्रकल्प आदी विभागांची कार्यालये कार्यरत आहेत. कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका असून, शासकीय कामांसाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकं येतात. पण अपुऱ्या जागेमुळे लोकांची मोठी गैरसोय होताना दिसून येत होती. अशावेळी पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सुलभपणे सर्व शासकीय सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी कराड पंचायत समितीची नवी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी करण्याचा संकल्प कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला होता. 

या पार्श्वभूमीवर आ.डॉ. भोसले यांनी नव्या इमारतीच्या उभारणीसाठी काही महिन्यांपूर्वी कराड येथील श्री दैत्यनिवारणी देवी मंदिराशेजारील जागेची पाहणी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत करुन, नव्या इमारतीचा आराखडा तयार केला. शिवाय मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांना हा आराखडा सादर करुन, निधी मंजुरीसाठी प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी लावून धरली होती. 

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे या नव्या सुसज्ज इमारतीच्या उभारणीसाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सरकारच्या मंजुरीमुळे लवकरच या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू होणार असून, याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सर्वप्रकारच्या सुविधा उभारण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने संबंधितांना दिले आहेत. या इमारतीच्या उभारणीमुळे कराडच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे. या निधीबद्दल कराडवासीयांमधून भाजपा-महायुती सरकार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आणि आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे. 

अशी असेल इमारत..
कराड पंचायत समितीची नवी भव्य व सुसज्ज इमारत उभारताना, त्याठिकाणी नैसर्गिक प्रकाश, पाण्याचा योग्य वापर आणि हरित इमारतीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह व प्रसाधनगृहाची तरतूद आणि अपंगांसाठी रॅम्प, रेलिंग यासारख्या सुविधादेखील उभारण्यात येणार आहेत.

 आ.डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले..
कराड पंचायत समितीची नवी प्रशासकीय इमारत केवळ अधिकाऱ्यांच्या कामकाजासाठीच नव्हे; तर सर्वसामान्य जनतेसाठीही सुसज्ज, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक केंद्र ठरणार आहे. या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीमुळे पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान होऊन, नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकतील. कराड परिसराच्या प्रशासकीय विकासासाठी ही मोठी पाऊलवाट ठरणार आहे. तसेच या इमारतीमुळे कराडच्या सौंदर्यात भर पडणार आहे.


Thursday, July 17, 2025

कराड शहरातील वाढीव पाणीपट्टी रद्द करावी -- सुशिक्षित बेरोजगार संघटना आक्रमक;

वेध माझा ऑनलाइन
आर्थिक चालू वर्षी कराड नगरपरिषदेने अचानकपणे पाणीपट्टी दरात पाचशे रुपयेची वाढ करुन कराड शहरातील सर्व सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे.शहरतील नागरिकांना या वाढीव पाणीपट्टी दराची पुसटशी ही माहिती न देता वार्षिक पाणीपट्टी दरामध्ये पाचशे रुपये वाढ केली आहे. या बाबत राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना यांच्या वतीने कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. प्रशांत व्हटकर यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला तालुका मार्गदर्शक राकेश पवार, सचिन भिसे,विकी शहा, साजिद मुल्ला,पंकज मगर, सामाजिक कार्यकर्ते निखिल ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
निवेदनातील माहिती अशी की, पालिकेने वार्षिक चालू पाणीपट्टी दरात पाचशे रुपये वाढ केली आहे ती वाढ करत असताना शहरातील पाणीपट्टी धारक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता केलेली वाढ हि येत्या आठ दिवसांत रद्द करावी यावेळी मुख्याधिकारी कराड नगरपरिषद यांनी सांगितले की येत्या आठ दिवसात या गोष्टीचा मी स्वतः अभ्यास करून आपणास कशा पद्धतीने ती वाढ झाली आहे व का झाली आहे ते आपणास चर्चा करून कळविण्यात येईल असे सांगितले. तसेच या वाढी संदर्भात तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी ठराव केला असल्याचेही त्यांनी सांगितले परंतु यावर तोडगा काढण्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करू असे सांगितले मुख्याधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानून केलेली वाढ रद्द करावी यासाठी विनंती केली.अन्यथा कराड नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी सो, सातारा यांना ही पाठवण्यात आली आहे.

Wednesday, July 16, 2025

वेध माझा ऑनलाईन।
मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. ही लक्षवेधी ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई  यांनी विधानसभेत मांडली. यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या उत्तरावर ठाकरे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील विधानसभेत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. 


शंभूराज देसाई म्हणाले की, मला यात अधिक खोलात जायचे नव्हते पण आता माझ्याकडे अपूर्ण ब्रीफिंग आहे. मला नम्रपणे सांगायचे आहे की 2019 ते 2022 या वर्षांमध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नाही. मंत्री शंभूराजे देसाई यांनी असे म्हणताच विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शंभूराजे देसाई म्हणाले की, तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी कोणाचे सरकार होते? 2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमचे लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत शंभूराज देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मी 2019 ते 2020 यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो.⁠जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरची लागायचं कारण काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Tuesday, July 15, 2025

आमदार डॉ अतुल भोसलेना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त ;

वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. या धक्का तंत्राचा अनेक बड्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. लवकरच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या संकेतानुसार अनेक बड्या मंत्र्यांना आपली खुर्ची गमवावी लागणार आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.त्यामध्ये कराड दक्षिण चे आमदार डॉ अतुल भोसलेना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे 

 हे धक्का तंत्र फक्त भाजपच्या मंत्र्यांपुरतं मर्यादित असेल की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. अनेक मंत्र्‍यांचे पत्ते कट केले जातील. खांदे पालट होईल, अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यात डॉ अतुल भोसले याना संधी मिळणार अशी पक्की बातमी आहे 

संजय दत्तने सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट टाळता आले असते…; उज्ज्वल निकम यांचा दावा ;

वेध माझा ऑनलाईन
वरीष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी असा दावा केला आहे की, जर संजय दत्तने पोलिसांना माहिती दिली असती, तर 1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट टाळता आले असते. त्यांनी हेही सांगितले की, ते संजय दत्तला निर्दोष मानतात.


1993 च्या बॉम्बस्फोटांसह अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “अबू सलेमने बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन आणली होती. अभिनेत्याने त्यातून काही हँड ग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, पण त्याने फक्त एके-47 बंदूक स्वतःकडे ठेवली आणि बाकी सर्व परत केले. जर संजय दत्तने पोलिसांना त्या शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबद्दल माहिती दिली असती, तर पोलिसांनी तपास केला असता आणि 12 मार्च 1993 रोजी झालेले बॉम्बस्फोट थांबवता आले असते.”

Monday, July 14, 2025

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा फोटो ; सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ;

वेध  माझा ऑनलाईन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असून, शहरात शेकडो शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, काही बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा फोटो लावण्यात आला आहे, जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
परळीतील लावलेल्या या शुभेच्छा बॅनरांवर वाल्मिक कराड याचा फोटो दिसून आला आहे. विशेष बाब म्हणजे, कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या दोषमुक्तीबाबतचा निर्णय 22 जुलै रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या बॅनरवर त्याच्या फोटोचा समावेश असल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य ; म्हणाले... मराठीच्या मुद्यावर विजयी मेळावा होता... त्याचा राजकारणाशी संबंध नाही ;

वेध माझा ऑनलाईन
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे म्हणाले. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर बघू असं राज ठाकरे म्हणाले. नाशिकमध्ये अनौपचारिक गप्पादरम्यान राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्ती केल्यानंतर त्याच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला. त्यानंतर ही सक्ती मागे घेतली गेल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी मुंबईत विजयी मेळावा घेतला. तब्बल 20 वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हे दोन्ही बंधू एकत्र लढणार अशी चर्चा सुरू झाली.
आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बघू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवला. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. ही युती होऊ नये यासाठी महायुतीकडून पडद्यामागून हालचाल सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

मालवाहू ट्रकची विमानाला धडक... ; मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला ;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला आहे. टेकऑफपूर्वी एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या QP1410 या विमानाला धडक दिली. हे विमान मुंबईवरुन दिल्लीला जाणार होते. या अपघातात विमानासह आणि ट्रकचेही नुकसान झाले आहे. या अफघातानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले व प्रवासांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे 4.54 वाजता घडली. अकासा एअरलाइन्सचे विमान बेंगळुरूवरून मुंबईला आले होते, ते बे A-7 वर पार्क केले होते. काही वेळानंतर हे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते. या विमानातून माल उतरवला जात होता, त्यावेळी बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेसचा एक ट्रक विमानाच्या उजव्या पंखावर आदळला, यामुळे विमानसह ट्रकचेही नुकसान झाले आहे.

आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यांच्यावरील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात ;

वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यांच्यावरील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
ठाकरे म्हणाले, ऑगस्टमध्ये या प्रकरणाचा निकाल लागणार असेल, तर ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. सर्वोच्च न्यायालय ही आमची शेवटची आशा आहे, जिथे या चोरीच्या प्रकरणाचा निवाडा होईल. आमचे चिन्ह चोरले गेले आहे. मी नेहमी म्हणतो, निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे, पण पक्षाचे नाव बदलण्याचा किंवा कोणाचे नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही. असा अधिकार आयोगाला असूच शकत नाही आणि आम्ही तो मान्यही करणार नाही. चिन्हाबाबतचा वादही कोर्टात आहे, आणि आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असंही ठाकरे म्हणाले.

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले...वेळ पडली तर एकटे लढू; यावर उद्धव ठाकर काये म्हणाले...

वेध माझा ऑनलाईन;
राज्यात सातत्याने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलं. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भविष्यातील युतीचे संकेत दिले. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर  यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी जाहीर होऊ द्या, मग पाहू, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आधी आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती, आता उद्धव ठाकरेंनीही भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बोलू असेही त्यांनी म्हटले. तत्पूर्वी, याबाबत आदित्य ठाकरे यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण दिसत आहे, जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आमच्या बाजूने आम्ही करु, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आम्ही राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो असेही ते म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे आदित्य यांनी म्हटले होते. तर, आता उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे.

 बाळा नांदगावकर म्हणाले ...

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी होती. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट;

वेध माझा ऑनलाईन;
सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पाऊस कमी पडत आहे. गेल्या चार दिवसांत पावसाने काहीशी विश्रांती देखील घेतली होती. या विश्रांतीनंतर पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

उद्या सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडणार ; ५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार ;

वेध माझा ऑनलाईन; सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढला असून धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा 74.29 टीएमसी इतका झाला असून धरणाच्या दरवाजाला पाणी लागले आहे. त्यामुळे उद्या दि. १५ जुलै २०२५ रोजी ठीक सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडून ५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे. कोयना धरणात दरवाजे उघडून वरून 5000 आणि पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक असा एकूण 7100 क्युसेक विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू होईल.

Saturday, July 12, 2025

अजितदादांची शिंदे गटाने केली अडचण ! महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने आणला नवा फॉर्म्युला...

वेध माझा ऑनलाइन
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एकूण 29 महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. चव्हाण यांच्या याच विधानावर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते प्रताप सरनाईक यांनी महायुतीत महापौरपदाचा नवा फॉर्म्यूला समोर आणला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नव्या विधानानंतर आता अजितदादांची अडचण होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
प्रताप सरनाईक यांनी महापालिकेच्या निवडणुका आणि महापौरपद यावर भाष्य केले आहे. हे महायुतीचे सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर होता. तिथे त्याच पक्षाला महापौरपद दिलं पाहिजे. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाला महापौरपद मिळाला पाहिजे ही महायुतीची सूत्रे असतात असेही सरनाईक म्हणाले आहेत

जयंत पाटील यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा ; शशिकांत शिंदे झाले नवे प्रदेशाध्यक्ष!

वेध माझा ऑनलाईन
शरद पवार यांचे विश्वासू व अत्यन्त निकटवर्तीय मानले जाणारे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांना राज्याचे अध्यक्ष म्हणून शरद पवार गटाकडून माळ घालण्यात आली आहे शिंदे हे देखील शरद पवारांचे अत्यन्त जवळचे मानले जातात

गेल्या 10 जून रोजी जयंत पाटील यांनी या पदावरून आता मला मुक्त करा अशी विंनती पक्ष नेतृत्वाला केली होते त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी शरद पवारांचे निकटवर्तीय शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे आपला पदभार स्वीकारणार आहेत

मतदार यादीमध्ये घोळ; काँग्रेसच्या आरोपावर मंत्री शंभूराजे देसाई यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान ;

वेध माझा ऑनलाईन- भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका जिंकल्या असा आरोप करत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे  मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम यापुढे ही गठीत केलेली समिती करणार आहे...या विषयी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले अस काही होत नसत... निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे...त्यामुळे काँग्रेसचे हे सर्व आरोप चुकीचे आहेत...पृथ्वीराज चव्हाण यांना मी आव्हान देतो की त्यानी या विषयावर माझ्याशी समोरासमोर बोलण्याची तयारी ठेवावी...मी चर्चेसाठी कधीही कुठेही यायला तयार आहे...अस म्हणत मंत्री देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान दिले आहे 
कराडमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी हे आव्हान दिले आहे
यावेळी त्यांनी बऱ्याच राजकीय विषयांना हात घालत दिलखुलास चर्चा केली 

यावेळी ते म्हणाले नाना पटोले यानी चुकीचे वागत विधानसभा अध्यक्षांचा अपमान केला तो त्यांनी हौस चा ही अपमान केला आहे अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे चूकच आहे त्यामुळे त्यांचे  एकदिवसीय निलंबन करण्यात आले

ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आले आहेत मात्र त्यांची राजकीय भूमिका एकत्र असणार का यावर अजूनतरी प्रश्नचिन्ह आहे कारण राज ठाकरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत माझ्या परवानगीशिवाय माध्यमातून बोलू नका अस त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे त्यामुळे ते जेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यानंतर आम्ही त्या दोघांच्या एकत्र येण्यावर बोलू अस मंत्री देसाई यावेळी म्हणाले

मंत्री मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या वीज खात्यावर नुकतीच टीका केली होती याविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले त्यांनी टीका केली नाही तर त्याविषयीची माहिती देत त्या खात्यातील त्रुटी दाखवत सूचना केल्या आहेत त्यांना तुम्ही पत्रकारांनी टीका म्हणू नका असही ते म्हणाले

 उबाठा गटाचे नेते अनिल परब याना मंत्री शंभराज देसाई ...तू बाहेर ये तुला बघतो...अस म्हणणारा व्हीडिओ राज्यात व्हायरल झाला आहे...याबाबत पत्रकारांना स्पष्टीकरण देताना मंत्री देसाई म्हणाले..आमच्या गटातील कोणीही  गद्दार म्हटलेलं ऐकून घेणार नाही...मात्र माझं ते बोलणं रागाच्या भरात होत...मी याविषयी काल माध्यमातून सविस्तर बोललो आहे...

पाटण विधानसभा मतदार संघातील मंत्री देसाई यांचे विरोधक सत्यजित पाटणकर भाजपमध्ये गेले आहेत... त्याबद्दल एकेकाळचे विरोधक आता तुमच्या मित्रपक्षात गेल्यामुळे आता ते तुमचे तुमचे मित्र झाले आहेत का?... तुम्हाला  आनन्द झालेला आहे का?... तुमची त्यांच्या प्रवेशाबद्दलची प्रतिक्रिया काय?...याबद्दल बोलताना ते म्हणाले...मी माझी प्रतिक्रीया ज्या संबंधिताना द्यायची आहे त्यांना त्याचवळी दिली आहे...

याबाबत पत्रकाराना पण प्रतिक्रिया द्या ना...तुम्हाला त्यांच्या प्रवेशामुळे आनन्द झाला आहे असं तरी म्हणा ना...खरतर तुम्ही आता खुशच दिसताय...अस पत्रकारांनी छेडले असता...मग मी काय गंभीर चेहरा करून बसू का ? अस म्हणत... मंत्री देसाई यांच्यासह उपस्थित सर्वांच्यातच त्याठिकाणी एकच हशा पिकला...

गोपीचंद पडळकर यांन शरद पवारांवर केलेल्या टीकेला... आव्हाडांचे मंगळसूत्र चोर म्हणून प्रतित्युर ;

वेध माझा ऑनलाईन।
काही दिवसांपूर्वी भाजपचे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवनात गोपीचंद पडळकर उपस्थित असताना "मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा..", अशा घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनीही नाव न घेता त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलंय. 


पडळकरांनी काय केली होती टीका?
सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांंनी पवार कुटुंबियावर निशाणा साधला होता. 

गोपीचंद पडळकर यापूर्वी देखील शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना पाहायला मिळाले आहेत. यापूर्वी त्यांनी शरद पवारांचा उल्लेख 'महाराष्ट्राला लागलेला कोरोना', असा केला होता. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक हल्ले झालेला पाहायला मिळाले आहेत. शरद पवारांच्या एका कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकर यांची गाडी देखील फोडली होती. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी जेव्हा जेव्हा शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका केलीये. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणात सक्रिय! सहकार क्षेत्रातून केली राजकारणात एन्ट्री!!

वेध माझा ऑनलाईन :
बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी यशश्री यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केले आहेत. सहकार क्षेत्रातून यशश्री यांचे राजकारणातील हे पहिले पाऊल मानले जात आहे. आतापर्यंत या बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे यंदाही यशश्री यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

कराडच्या पुष्कराज राहुल कुलकणी यांचे चार्टर्ड अकाउंटेट परिक्षेत उत्तुग यश- कराडचे प्रतिथयश चार्टर्ड अकाउंटेट पी एल कुलकर्णी यांचे ते नातू आहेत...

वेध माझा ऑनलाईन।
येथील पुष्कराज राहुल कुलकणी यांनी चार्टर्ड अकाउंटेट परिक्षेत उत्तुग यश मिळवले. कऱ्हाडचे प्रथियश चार्टड आकाउटंट पी. एल. कुलकर्णी यांचे ते नातू आहेत. तर कर सल्लागार राहुल कुलकर्णी व सौ. शिल्पा कुठकर्णी यांचे पुत्र आहेत. पुष्कराज यांचे शिक्षण कऱ्हाडच्या कृष्णा इंग्लीश स्कूलमध्ये झाले. कऱ्हाडलाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुष्कराज यांनी अंतिम सीए परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यांना चार्टर्ड अकाउंटंट पदवी मिळाली आहे. पुष्कराज यांनी बॅडमिंटनमध्येही जिल्हा, राज्य व विद्यापीठस्तरीय स्पर्धात पदके मिळवली आहेत. राष्ट्रीय खेलो इंडिया सार्धेत सहभाग घेतला होता. त्याच्या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

सदर यश प्राप्त केल्यानंतर बोलताना पुष्कराज म्हणाला...
माझे आजोबा पी. एल. कुलकर्णी यांनी चार्टड आकाउंटंट म्हणून जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवून ही परिक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय ठेवले. त्यात माझे आजोबा सीए पी एल कुलकर्णी,आई, बाबा, काका, काकींसह सर्वच नातेवाईक व मित्रांचे चांगले सहकार्य मिळाले. यशामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, अशी प्रतिक्रीया पुष्कराज कुलकर्णी यांनी दिली.

Friday, July 11, 2025

शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे, संजय शिरसाट अडचणीत ! शिरसाट यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून ? राज्यात चर्चा;

वेध माझव ऑनलाईन।
राजकीय पक्ष सत्तेत असला की आपसूकच त्या पक्षाकडे सत्तेची ताकद येते. त्याचा फायदा पक्षाला तसेच पक्षातील राजकीय नेत्यांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होतच असतो. याचे काही ऐतिहासिक दाखलेही आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांनी सत्तेत असणाऱ्या पक्षात उड्या मारलेल्या आहेत. यातील बऱ्याच नेत्यांवरील आरोपांच्या आणि चौकशीचा ससेमिरा गायब झालेला आहे, असा दावा विरोधकांकडून केला जातो. सध्या मात्र राज्याच्या राजकारणात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. सत्तेत असूनही  शिंदे गटाच्या मागे वेगवेगळे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. सत्तेत असूनही शिंदे गटाचे तीन नेते सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत सापडले आहेत. 
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे. 2019 ते 2025 या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे, असे या नोटीशीत म्हणण्यात आले आहे. याबाबत खुद्द शिरसाट यांनीही सांगितलं होतं. 

त्यानंतर शिरसाट यांच्याच विधानाचा आधार घेत शिंदे गटाचेच नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनाही प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले जात होते. या वृत्ताचे मात्र श्रीकांत शिंदे यांनी खंडन केलेले आहे. मला कोणतीही नोटीस आलेली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे नेते टार्गेटवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
दुसरीकडे शिरसाट यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते पलंगावर बसलेले असून त्यांच्यापुढे पैशांनी भरलेली एक बॅग दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून? असा प्रश्न विचारला जातोय. या व्हिडीओमुळेही शिरसाट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या व्हिडीओमुळे शिरसाट यांची एका प्रकारे अडचणच झाली आहे.

मुंबईत ठाकरे बंधूंचा दणका - अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम ; अमराठी व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद;

वेध माझा ऑनलाईन; राज्यात काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरून सामाजिक व राजकीय वाद निर्माण झाले आहेत. विशेषतः मीरा रोड परिसरात याचे तीव्र पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेतला आहे. मनसेकडून बोरिवली पश्चिम येथे अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम राबवण्यात आला.
मनसेच्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवून त्यांचं स्थानिकांशी सुसंवाद अधिक सुलभ करणं हा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून मराठीची बाराखडी, मूलभूत शब्द, आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वाक्यरचनांचं अध्ययन केलं.
मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला. 

कराडच्या सोमवार पेठेत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहर पोलिसांनी येथील सोमवार पेठेत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून साडेपाच लाख रूपये किमतीचे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने शुक्रवारी ही कारवाई केली.

श्रेयस गणेश शिंदे (वय 22, रा. सोमवार पेठ, कराड) व शाहिल सुतार (वय 21, रा. शास्त्रीनगर, मलकापूर) अशी याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील सोमवार पेठेतील एका घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सुरू केला. तपासादरम्यान श्रेयस शिंदे  व शाहिल सुतार या दोघांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी  केलेला सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अशोक भापकर, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदळकर, पोलीस नाईक सुजन जाधव, अनिल जाधव, संदीप कुंभार, शिवाजी काटे, मोईनस मोमिन, दिग्विजय सांळुके, संग्राम पाटील, अमोल देशमुख, शैलेश साळुंके, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.

Tuesday, July 8, 2025

पुढील २४ तासांत कोयना धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता !

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. दिवसाला सरासरी २ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ होत असून सध्या धरणात ७१.०० टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी स्थितीत निर्माण झाली असून त्या अनुषंगाने आज पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देशी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या आवाहन करावे, अशा सूचना दिल्या कोयना धरणात मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक झपाट्याने होत आहे. दरम्यान, धरणाची गेट लेव्हल ७३.५० टीएमसी आहे. अवघ्या २.५० टीएमसी अंतरावर ही मर्यादा गाठली जाणार असल्याने पुढील २४ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदारयाद्यांतील गैरप्रकार काँग्रेस रोखणार !!काँग्रेसची समिती गठित - समितीच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड ; निवडणूक आयोगाला हाताशी धरुन भाजपानं चोरीच्या मार्गानं सत्ता मिळवली ; काँग्रेसचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन
मतदार याद्यांतील गैरप्रकार कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने नुकतीच एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परीक्षित वीरेंद्र जगताप हे सदस्य आहेत, तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत. मतदार याद्यामधील गैरप्रकाराबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यावर आयोगाने समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोटाळे करत आहे.
निवडणूक आयोगाला हाताशी धरुन भाजपानं चोरीच्या मार्गानं सत्ता मिळवली पण यापुढं असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील, यावर उपाय सूचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.

डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर ;

वेध माझा ऑनलाईन।
शिक्षण, सहकार, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडतर्फे यंदाचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुवार (दि. 10) जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे होणाऱ्या ‘गुरुगौरव’ समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा समूहाने प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय, नर्सिंग, औषध निर्माण, कृषी व पशुवैद्यकीय शिक्षणसंस्था उभारून ज्ञानप्रसारात महत्त्वाचे योगदान दिले आहे. करोना काळात त्यांनी शेकडो रुग्णांवर मोफत उपचार करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली. कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक, कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

या गौरवसमारंभात अन्य नामांकित व्यक्ती आणि संस्था यांचाही सन्मान केला जाणार असून, खालील पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले आहेत:
विद्यारत्न पुरस्कार : रयत शिक्षण संस्था, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय (स्वायत्त) कराड, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार : प्रमोद संकपाळ, कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह कराड, आदर्श शिक्षिका पुरस्कार : डॉ. स्नेहल मकरंद राजहंस, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार : सुषमा इंदुलकर, पी.के. सावंत माध्यमिक विद्यालय, अडरे (चिपळूण), आदर्श प्राचार्य पुरस्कार : डॉ. सतीश भिसे, निवृत्त प्राचार्य, औषध निर्माण महाविद्यालय कराड, उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार : प्रकाश पागनीस, प्रवचनकार व रंगकर्मी पुणे, उत्तम शिक्षक पुरस्कार : उदय कुंभार, टिळक हायस्कूल कराड,
उत्तम शिक्षक (प्राथमिक विभाग) पुरस्कार : ज्योती ननवरे, टिळक हायस्कूल कराड, उत्तम सेवक पुरस्कार : शारदा चव्हाण, शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम शाळा कराड, आदर्श विद्यार्थी पुरस्कार : सानिका रामचंद्र गरूड, टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड, सेवाव्रती पुरस्कार : अशोक रंगराव पवार, निवृत्त अभियंता, कराड नगरपरिषद, विज्ञान शिक्षक पुरस्कार : जीवन थोरात, विज्ञान शिक्षक, टिळक हायस्कूल कराड यांना जाहीर झाला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कुलपती डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे आणि सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी केले आहे.