पहिली ते आठवी वर्गातील सर्व विद्यार्थी सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली
केंद्र सरकारच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले कोरोनाचा पार्शवभूमीवर गेले वर्षभर शाळा भरल्याच नाहीत इयत्ता 5 ते 8 वी च्या शाळा काही ठिकाणी भरल्या आणि त्या थोड्याच दिवसात बंदही पडल्या सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण बऱ्याच ठिकाणी सुरू आहे एकूण परिस्थितीचा विचार करता 1ली ते 8 वी पर्यंतची मुले पास करून त्यांना 9 वित पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाल्या इयत्ता 1 ली ते 8 वी च्या परीक्षा रद्द झाल्या असून इयत्ता 9 वी ते 11 वी साठीचा निर्णय लवकरच जाहीर करू असेही त्या म्हणाल्या
No comments:
Post a Comment