Friday, June 4, 2021

उद्या (शनिवारी) कराडातील सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने होणार साजरा...विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील सोमवार पेठेतील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांचा उद्या (शनिवारी) वाढदिवस होत आहे सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर साध्या स्वरूपात आणि घरगुती पद्धतीने तो होणार आहे अशी माहिती स्वतः अजय उंडाळकर यांनी दिली आहे ...कराड दक्षिण चे नेते आणि राज्य काँग्रेसचे सरचिटणीस ऍड उदयसिह पाटील (दादा) उंडाळकर यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात...आजपर्यंत अनेक सामाजिक कामातून त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत...
 
अजय उंडाळकर हे व्यक्रीमत्व तसे कष्टाळू वृत्तीचे... आपल्या कामात प्रामाणिक राहण्याचा त्यांचा स्वभाव...त्यातूनही समाजासाठी आपण काही केले पाहिजे ही त्यांची नेहमी धडपड दिसते...आपला दूध विक्रीचा व्यवसाय साभाळून ते परिसरातील विविध मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी दिसतात...त्यांनी विविध उपक्रमात भाग घेऊन नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे...त्यामध्ये आधार कार्ड नोंदणी असेल,मतदार नोंदणी असेल, कोरोना काळातील रक्तदान शिबिर असेल प्लाझ्मा देण्यासाठी लोकांना मदत करण्याचा विषय असेल... अशा विविध प्रकारच्या अनेक लोकोपयोगी कामात ते स्वतःला व्यस्त ठेवून जनतेच्या उपयोगी पडण्यासाठी स्वतः धडपडतात...गेले वर्षभर कोरोना संकटामुळे  लॉकडाऊन चा सामना नागरिकांना करावा लागतोय त्या काळात लोकांना दूध, भाजीपाला,यासह किराणा व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा ते मागणीनुसार करत आहेत गरजुना अनेक आवश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी वेळोवेळी  कोरोना काळात केलं आहे...त्यांचा स्वतःचा दूध विक्री व्यवसाय असल्याने त्यांना लोकांसाठी अत्यावश्यक सेवा देणे सहजपणे शक्य झाले...कोरोना लसीकरणाबाबतची जागृती व सहकार्य करण्यासाठी त्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात... त्यांच्या या कार्याचेही कौतुक होताना दिसतंय... सोमवार पेठेतील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी स्वखर्चातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवून परिसरातील लोकांच्या सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे... सोमवार पेठेत अधून मधून चोऱ्यांचे प्रमाण वाढते अशा वेळी लोकसेवेसाठी त्यांनी पुढे होऊन कॅमेऱ्याची सुरक्षा सम्पूर्ण परिसराला दिली आहे त्यांच्या सामाजिक विविध राबविलेल्या उपक्रमांचे नेहेमीच कौतुक होते...लोकांसाठी काम करायला कोणते राजकीय पद किंवा हुद्दा असण्याची गरज अजिबात नसते... तर जनतेसाठी धडपडण्याची... वेळ प्रसंगी पदरमोड करत लोकसमस्या सोडवण्याची प्रवृत्ती अंगी असावी असावी लागते ...आणि त्याच वृत्तीने समाजात लोकांसाठी धडपडणाऱ्या अजय उंडाळकर यांचा वाढदिवस साजरा होत आहे .. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!

No comments:

Post a Comment