Wednesday, November 17, 2021

कराडातील सोमवार पेठेत धोकादायक चौकात बसवले कॉनव्हॅक्स मिरर ; अपघात टाळण्यासाठी सुहास जगताप यांची संकल्पना

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील नगरसेवक सुहास जगताप यांच्या कल्पनेतून सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स  मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले. याचे उद्घाटन पोलिस उपअधिक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी नगरसेविका सौ. अंजली कुंभार यांची उपस्थिती होती. सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी हे आरसे बसवण्यात आले.यावेळी रणजित पाटील म्हणाले, सोमवार पेठेतील चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूकीची गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी कॉनव्हॅक्स   मिररची आवश्यकता होती. सुहास जगताप यांनी ही गरज ओळखून समाजउपयोगी केलेले हे काम कौतुकास्पद आहे. 

दुष्यंत देशपांडे प्रास्ताविक करताना म्हणाले,  सुहास जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून नागरिकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे विकासकामे केली आहेत. सोमवार पेठेमध्ये नागरिकांची सातत्याने ये जा असते तसेच प्रितीसंगम घाटाकडून जाणारे वाहने सोमवार पेठेतून वळवण्यात आली आहेत. त्यामुळे या वाहनांचा मोठा लोड या पेठेत येतो. पेठेत 15 धोकादायक चौक असून   वाहनांच्या गर्दीमुळे अनेकदा छोटे मोठे अपघात घडत असतात. चौकातून रस्ता ओलांडताना वाहनधारकांना इतर वाहनांचा अंदाज येण्यासाठी कॉनव्हॅक्स  मिररची आवश्यकता होती. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. 
सुहास जगताप म्हणाले, पुणे  मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये अशा प्रकारचे मिरर बसवण्यात आले आहेत. सोमवार पेठेतील वाढत्या वाहतूकीमुळे याठिकाणच्या चौकामध्ये अशा कॉनव्हॅक्स   मिररची आवश्यकता असल्याचे जाणवले यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. 
यावेळी एन. आर. पाटील, शिवाजीराव जगताप, मोहन आरे, मिलिंद गरूड, विराग जांभळे, वासुदेव कुलकर्णी, शहाकाका, नंदकुमार ढवळीकर, विजय पटवर्धन, संजय घळसासी, दीपक काकडे, अभय वखारिया, नथु कुंभार, उमेश शेंडे,श्रीराम येळगावकर, पवारसाहेब, शिवाजीराव पाटील गोवरेकर, राम देव, दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील ,कोपर्डेकरसाहेब  आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment