कराड
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांचा वाढदिवस कराड आणि परीसरातील "वाय एस जगन अण्णा फॅन्स क्लब' यांच्या वतीने केक कापून नुकताच साजरा करण्यात आला. आंध्रप्रदेश चे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे ते चिरंजीव होत
जगन मोहन त्यांचे वडील राजशेखर रेड्डी यांचे दुर्घटनेने अचानक निधन असो... किंवा त्यांना अधिक संपत्ती बालगळ्याच्या प्रकरणात जेल मध्ये जायला लागलेले प्रकरण असो..ते जगनमोहन यांनी वाय एस आर काँग्रेस राजकीय पार्टी तयार करण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास असो ...त्यांना खूपच अडचणीना सामोरे जावे लागले... मात्र एक दिवस "सफलता' झक मारत त्यांच्या पायाशी लोळण घेत आलीच...
आंध्रप्रदेश चे आज ते लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत सम्पूर्ण जगभर त्यांचे फॅन्स आहेत त्यांचा वाढदिवस काल कराडातदेखील त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात शाहू चौक येथे साजरा केला... जगन मोहन रेड्डी यांचा राजकीय प्रवास खूपच खडतर आहे त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी हयात असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला 2004 ला केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही त्यानंतर 2009 ला त्यांना राजकारणात सुरुवात करण्यात यश मिळाले मात्र त्याच वेळी त्यांचे वडील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावले कालांतराने त्यांनी पुरेसे पाठबळ असताना मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे विचारणा केली काँग्रेसने ती नाकारली त्यांना घाणेरड्या राजकारणाचे बळी होत जेल मध्येही जावे लागले कालांतराने काँग्रेस मधून बाहेर पडून जगन मोहन यांनी वडिलांच्या नावे वाय एस आर काँग्रेस ची निर्मिती केली त्यांनी काँग्रेस व चंद्राबाबू नायडू या दोघाना एकावेळी फाईट करत 175 पैकी 151 जागा निवडून आणल्या तर 25 पैकी 21 लोकसभा जागा निवडून आणत आपली सिद्धता सिद्ध केली दरम्यानच्या काळात त्यांनी 351 दिवसाची पदयात्रा काढून लोकांमधून आपले नेता म्हणून स्थान अधिक बळकट केले या पदयात्रेत त्यांनी 2 कोटीहून अधिक लोकांशी थेट संपर्क साधला त्यांनी त्यावेळी 3648 किलोमीटर पायी प्रवास केला आज त्याच लोकांनी त्यांना त्यांच्या अवघ्या 47 व्या वर्षी अक्षरशः डोक्यावर घेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री केले आहे जगभर त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगान गाणारे चाहते आहेत
त्यांचा वाढदिवस काल सम्पूर्ण देशभर पार पडला कराडमध्ये ही त्यांच्या नावे फॅन्स क्लब आहे अनेकांचे ते आयडॉल आहेत काल येथील शाहू चौक येथे केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कराडात भविष्यात या फॅन्स क्लबचे हजारो सदस्य असतील असा विश्वास युवा नेते राहुल खराडे यांनी रेड्डी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलून दाखवला
यावेळी जगमोहन रेड्डी फॅन्स क्लबचे सदस्य सौ. गीतांजली थोरात, राहुल खराडे ,सचिन पवार (महाराज), समाधान चव्हाण(बापू) , भूषण जगताप (सर), राज ओसवाल, विनोद पवार, आदिल मोमीन, अमित पवार, संजय चेन्ने, रोहित कट्टीम्हणी ,कासिम शेख संदीप साळुंखे ,नितीन पाटील निलेश चौगुले , समीर पटवेकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment