वेध माझा ऑनलाइन - तीन दिवसांनंतर म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या बँकांचे नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि पीएनबी बँकेच्या व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत.
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांमध्ये मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.
No comments:
Post a Comment