Friday, February 4, 2022

बंडातात्या कराडकरांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार ; ना बाळासाहेब पाटील यांचे पुण्यात वक्तव्य... एका वृत्त वाहिनीशी बोलताना मांडली भूमिका ; बंडातात्या कराडकर अडचणीत येण्याची शक्यता...


वेध माझा ऑनलाइन - 
बंडातात्यांवर पोलीस आपली कारवाई करतीलच मात्र आपण   बंडातात्यांवर  अब्रूनुकसानीचा  दावा ठोकणार आहोत असे नामदार बाळासाहेब पाटील यांनी पुण्यात एका वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे त्यामुळे बंडातात्याना त्यांचे कालचे फटकळ  बोलणे चांगलेच अंगलट येणार असे दिसत आहे 

शासनाच्या खूल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी काल ह भ प बंडतात्या कराडकरांनी साताऱ्यात आंदोलन केले त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांची जीभ चांगलीच घसरल्याचे पहायला मिळाले त्यांनी खासदार सुप्रिया सुळे माजी मंत्री पंकजा मुंढे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जसराज पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान करत राज्यात खळबळ माजवून दिली होती त्यानंतर याबाबत आपली पहिलीच प्रतिक्रिया ना बाळासाहेब पाटील यांनी आज पुण्यात एका वृत्त वहिनीशी बोलताना दिली आहे त्यांनी बंडातात्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सूतोवाच केले आहे 

ना पाटील म्हणाले, राजकारणात आणि समाजकारणात एखाद्या स्थानावर येण्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे परिवाराचे तसेच कार्यकर्त्यांचे देखील मोठे कष्ट असतात एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर त्या व्यक्तीबद्दल वाईट बोललं जातं नाही पण बंडातात्या काल कै. पतंगराव कदम यांचे स्वर्गीय चिरंजीव अभिजितबद्दल जे बोलले ते खरोखरच दुर्दैवी आहे माझा मुलगाही दारू पितो असेही ते बोलण्याच्या ओघात म्हणाले माझा मुलगा गेली सात वर्षे वारी करतो...मिडिया समोर बोलताना आपण काय बोलत आहोत हे तात्यांच्या लक्षातच येत नाही... असेही ते म्हणाले 
साताऱ्यात सर्वपक्षीय महिलांनी तात्यांच्या एकूणच कालच्या वक्तव्याबाबत मोर्चा काढला आहे आपल्या  राज्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे महिलांचा आदर आपल्या संस्कृतीत केला जातो तात्यांनी काल सुप्रिया सुळे पंकजा मुंढे यांच्याबाबत देखील जी विधाने केली ती दुर्दैवी आहेत त्यानी अशी वक्तव्य करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कराडातील वारकरी मठात सुरू असलेला वाद मिटवावा स्वर्गीय मारुतीबुवांचे अनुयायी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या कालच्या वकव्याचा बोलवता धनी वेगळाच असावा अशी शंका देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली 

शासनाच्या वाईन विक्री निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले ही वाईन विक्री कोणाही दुकानदारास सक्तीची किंवा बंधनकारक नाही भाजप येथे या विषयाला विरोध करते आणि मध्यप्रदेश मध्ये समर्थन करते अशी दुटप्पी भूमिका योग्य नाही असेही ते यावेळी म्हणाले

No comments:

Post a Comment