वेध माझा ऑनलाइन - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दोन लोकांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केला आहे. आरोपींनी चार राउंड फायर केल्या, अशी माहिती ओवेसी यांनी स्वत: ट्विटरवर दिली आहे.
"काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार केला गेला. चार राउंड फायर झाल्या. ते तीन-चार लोकं होती. गोळीबार करुन सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली आहे. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून गेलो आहे. या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे", असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment