Saturday, February 5, 2022

आता पाळीव कुत्रामध्येही कोरोनाव्हायरसची लक्षणं सापडली आहे. ; प्राण्यांमध्ये कोविड पसरला तर मोठा धोका उद्भवू शकतो ; तज्ञांचे मत

वेध माझा ऑनलाइन - कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्स थैमान घालत आहेत. आता कुठे परिस्थिती सामान्य होत असताना आता आणखी एका आजाराचं संकट उभं येऊ ठाकलं आहे. माणसांनंतर आता पाळीव कुत्रामध्येही कोरोनाव्हायरसची लक्षणं सापडली आहे. तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांमध्ये कोविड पसरला तर मोठा धोका उद्भवू शकतो

कोरोनाव्हायरस होऊ नये, यासाठी माणसं आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात. त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या नियमांचं पालन करू शकतात. पण जरा विचार करा, मुके जीव त्यांना असे नियम, कायदे समजावणं आणि त्यांचं पालन करायला लावणं अशक्य आहे, त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरस संसर्ग पसरला तर काय होईल?  त्यामुळेच यूकेतील यॉर्कशायरमध्ये पाळीव कुत्र्यामध्ये कोरोनाव्हायरसची  लक्षणं दिसल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जर प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमण पसरलं तर जगाला पुन्हा एका संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
यॉर्कशायर लाइव्हच्या रिपोर्टनुसार, यॉर्कशायरध्ये समुद्रकिनारी जाणाऱ्या प्राण्यांमध्ये अशी लक्षणं आढळली आहेत. ज्यामध्ये पाळीव कुत्रेही गंभीर आजाारने ग्रस्त झाले आहेत.  कुत्र्यांना एका अज्ञात आजाराने आपल्या विळख्यात घेतलं आहे. या आजाराची लक्षणं पाहता ज्याची भीती होती, त्याच धोक्याचा इशारा असल्याचं संशोधकांनी सांगितलं.  प्राण्यांच्या संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञांच्या मते, पाळीवर प्राण्यांमध्ये संसर्गाची आलेली अचानक लाट यामागे खतरनाक कोरोनाव्हायरस असू शकतो.

लिव्हरपूल युनिव्हर्सिटीतील पशूतज्ज्ञ प्रोफेसर एलन रेडफोर्ड कुत्र्यांमध्ये होणाऱ्या या आजाराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रो. एलन स्मॉल अॅनिमल वेटरनरी सर्विलान्स नेटवर्कच्या नेतृत्वातील एका तज्ज्ञ टीमचे सदस्य आहेत. ज्यांनी याबाबतचा नवा डेटा जारी केला आहे. त्यानुसार यॉर्कशायरमध्ये तीन आठवड्यांत आजारी प्राण्यांची संख्या अपेक्षेपेक्षा वाढली आहे आणि एका नव्या संकटाकडे इशारा करत आहे. या परिस्थितीवर नीट लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment