वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याने शिवसेनेच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.
No comments:
Post a Comment