येथील भोई गल्लीत 1972 साली नवरात्रात जमिनीत आदीमाया देवीची मूर्ती सापडली होती. त्यावेळी भाविकांनी तेथेच या देवीची प्रतिष्ठापना केली होती. यावर्षी या मंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार 26 रोजी घटस्थापना व अभिषेक होणार आहे. सायंकाळी पाच वाजता अभंग व भक्ती गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री नऊ वाजता लहान मुलांच्या स्पर्धा होणार आहेत. मंगळवार 27 रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर होणार आहे. सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मित्र मंडळाचे भजन तर रात्री नऊ वाजता लहान मुलांच्या स्पर्धा होणार आहेत. बुधवार 28 रोजी सकाळी अकरा वाजता भजन, सायंकाळी पाच वाजता आप्पासाहेब खोत यांचा कथाकथनचा कार्यक्रम तर रात्री नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार 29 रोजी सकाळी अकरा वाजता शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता अभय भंडारी यांचे हिंदू संस्कृती उत्सव व नवरात्रीचे महत्त्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवार 30 रोजी रामकृष्ण गीता मंडळ सप्तशती कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होणार असून सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चन होणार आहे. शनिवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भजन सायंकाळी चार वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे तर रात्री नऊ वाजता महा बोंडला होणार आहे. रविवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता शालेय स्पर्धा, रांगोळी, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा होणार आहेत. सोमवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होम हवन व रात्री नऊ वाजता सिने अभिनेते सुरेश चव्हाण यांचा गोंधळ होणार आहे. मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी खंडे नवमी व कुमारीका पूजन सकाळी 11 वाजता तर सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता भव्य दरबार मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री आदिमाया मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment