Sunday, January 1, 2023

पत्रकारांपासून सावध रहा ; शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला ;

वेध माझा ऑनलाइन - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शरद पवार यांनी द्राक्ष बागयदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माझ्यासमोर बसलेले पत्रकार आहेत. त्याच्यापासून सावध रहा तुमचं उत्पन्न सार्वजनिकरित्या सांगू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. 

इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला शरद पवार यांनी भेट दिली.या शेतकऱ्याने एका एकरात शंभर टनाहून अधिक उप्तन्न घेतले आहे. मागील एनेक वर्षापासून हा शेतकरी शंभर टनाहून अधिक उत्पन्न घेत आहे. ऊसाच्या शेताला भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार म्हणाले, साखर उत्पादनात भारत एक नंबरचा देश आहे. ब्राझीलमधील लहान शेतकरी 50 हजार टन ऊसाचे उत्पादन घेतो. तेथील 6-7 शेतकरी कारखाना चालवतात. आपल्याकडे काही हजारात सभासद असतात. यापूर्वी एकरी 100 टन पेक्षा जास्त ऊस आणि 50 कांडी ऊस मी बघितला आहे. हे करण्याचा उद्योग या शेतकऱ्यांनी केला आहे. शरद पवार पुढे म्हणाले, माझ्यासमोर बसलेले पत्रकार आहेत. त्याच्यापासून सावध रहा. किती उत्पन्न मिळालं हे सार्वजनिकरित्या सांगू नका.नाहीतर हे लोक दाखवतील शेतकऱ्यांना ऐवढे पैसे मिळतात,मग दिल्लीतले लोक शेतकऱ्यांवर कर लावतील, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सावध केल.तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधला.

 

 


No comments:

Post a Comment