वेध माझा ऑनलाइन - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. पण, या दौऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांचं कार्यक्रम पत्रिकेवरच नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा औरंगाबाद दौरा आहे. ते औरंगाबाद लोकसभा आढावा बैठकही घेणार आहेत. जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंढे या राष्ट्रीय सचिव पदावर आहेत. मात्र त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापले नाही.औरंगाबाद लोकसभेच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे प्रत्येक वेळी सभा घेतात. आता त्यांचे नाव पत्रिकेवर नसल्याने त्या सभेला उपस्थित राहणार की नाही हा सस्पेन्स निर्माण झाला आहे विशेष म्हणजे, रविवारीच बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते. यावेळी जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे गैरहजर होत्या.
No comments:
Post a Comment