Monday, January 2, 2023

भारतीय जनता पार्टीच्यावतीने ढेबेवाडी फाटा व दत्त चौक येथे अजित पवारांचा निषेध ; अजित पवार मुर्दाबाद च्या दिल्या घोषणा ;

वेध माझा ऑनलाईन - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने ढेबेवाडी फाटा व दत्त चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजित पवार मुर्दाबाद', 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय' अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हे अख्ख्या देशाचे आराध्य दैवत आहेत. धर्मवीर संभाजीराजेंनी देश व धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अतुल्य कार्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते. अशावेळी विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही भाजपाच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. 
दत्त चौक येथे निषेध नोंदवताना भाजप शहर अध्यक्ष एकनाथ बागडी म्हणाले अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही निषेध करतो पुन्हा अस वक्तव्य केल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला मलकापूर तसेच कराडमध्ये झालेल्या या दोन्ही निषेध मोर्चाना विविध पदाधिकारी महिला तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment