वेध माझा ऑनलाइन - गेल्या 5 वर्षांत सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला, अशी प्रखर टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. शेतकरी विकास पॅनेलच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात आयोजित कराड दक्षिणमधील मतदार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान उमेदवार पैलवान आनंदराव मोहिते यांनी यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली ते म्हणाले ...सत्ताधारी मंडळी स्वतःच्या कारभाराबाबत बोलण्यापेक्षा भोसले व पाटील कुटुंबावर नाहक टीका करत आहेत. खरंतर सहकारात उत्तुंग काम केलेल्या या कुटुंबांवर बोलण्याचा कोणताही नैतिक हक्क मंडळींना नाही. कारण ज्यांनी आमदारकी, खासदारकी आणि मुख्यमंत्रीपद भोगले अशांनी सहकारात एखादी संस्था काढायचे राहू दे, निदान एखादी पानपट्टी तरी काढली का? याचे उत्तर द्यावे, अशी टीका त्यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली.
यावेळी डॉ. भोसले पुढे म्हणाले, बाजार समितीचा गेल्या वर्षातील नफा हा केवळ साडेतीन लाख रुपये आहे, तर प्रशासक आल्यावर मात्र नफ्यात वाढ झाल्याचे दिसून येते. जे सत्ताधारी बाजार समितीला नफा मिळवून देऊ शकत नाहीत, ते शेतकऱ्यांचे भले काय करणार? सोसायटी निर्माण करुन मतदार तयार करण्याचा आणि आपले सत्तास्थान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या लोकांनी दीर्घकाळ केला. सोसायटी गटात वर्चस्व ठेऊन बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविण्याचे काम त्यांनी केले अशा प्रवृत्तींना आता धडा शिकविण्याची आता गरज आहे. यासाठी शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा
आ. पाटील म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. ज्या काळात आमच्याकडे बाजार समिती होती, त्या ५ वर्षांच्या काळात आम्ही समितीचे उत्पन्न वाढविले. आपल्या येथे गूळ, हळद मोठ्या प्रमाणावर असताना इथल्या शेतकऱ्याला बाहेरच्या बाजारपेठेत का जावे लागते? उंब्रज, मसूर येथील उपबाजारांचा विकास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले? याचे त्यांनी उत्तर द्यावे.फळ प्रक्रिया करण्यासाठी ‘मॅग्नेट’ नावाचा प्रकल्प सुरु करण्यासाठी मी पणनमंत्री असताना राज्याच्या पणन विभागाकडून आपल्या कराडच्या बाजार समितीलाही पत्र पाठविले होते. पण निष्क्रिय सत्ताधाऱ्यांनी यासाठी प्रस्तावच दाखल न केल्याने, जवळपास 10 फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प आपल्या कराडमध्ये येऊ शकला नाही. हा प्रकल्प झाला असता तर इथल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ झाला असता असेही आ पाटील म्हणाले
No comments:
Post a Comment