Thursday, June 1, 2023

सौरभ तात्यांनी धारेवर धरलेला कराड पालिकेचा "तो' अधिकारी खरंच राजीनामा देणार ? की पोकळ धमकी देतोय ; कराडात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन। कचरा डेपो ला काही दिवसांपूर्वी आग लागली होती त्या पार्शवभूमीवर  पालिका प्रशासनाच्या कामाबाबत शहरात नाराजी आहे असे पालिकेच्या एका अभियंत्याला माजी गटनेते सौरभ पाटील यांनी सांगितले असता मी राजीनामा देतो असे उत्तर या अभियंत्याने दिले त्यामुळे हा अभियंता खरच राजीनामा देणार ? की नुसतीच पोकळ धमकी देतोय? अशीही चर्चा यानिमित्ताने लोक करताना दिसत आहेत

दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या कचरा डेपोला अचानकपणे मोठी आग लागली होती...  दरम्यान ही आग लागल्याचे वृत्त सोशल मीडियावरून काही क्षणात शहरात पसरले... त्याचवेळी लोकशाही आघाडीचे नेते व माजी नगरसेवक सौरभ पाटील याना ही आग लागल्याची बातमी समजताच त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याला फोन केला व या आगीचे कारण विचारले... त्यावेळी आपण घरी असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले ... त्यानंतर सौरभ पाटील यांनी त्या अधिकाऱ्याला आग लागलेल्या स्पॉटवर बोलावून घेत चांगलेच झापले आणि तुमच्या कामाबद्दल शहरात नाराजी आहे असे सौरभ पाटील या अधिकाऱ्याला शांतपणे म्हणाले असता... या अधिकाऱ्यांने लोक नाराज असतील तर मी राजीनामाच देतो असे... उत्तर दिले... त्या बोलण्याचा राग सौरभ तात्याना आला मग मात्र त्यांनी या अधिकाऱ्यांला,...आता तुम्ही राजीनामा द्यायचाच... शब्द माघारी घ्यायचा नाही... असे ठणकावत चांगलेच झापले... खरतर पालिकेतील विभागात काम करणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला त्याच विभागाची माहिती किंवा त्या विभागाच्या कामाबद्दल लोकांची मते सांगितली तर राजीनामा देतो असे उत्तर कोणालाच अपेक्षित नसते...किंबहुना नाही... पण तसे उत्तर दिले गेले त्यामुळे पुढचा विषय वाढला अशी या घटनेबाबतची माहिती देताना स्वतः सौरभ तात्यांनी वेध-माझा ला सांगितले...

या अधिकाऱ्यांना ढीगभर पगार आहेत...तरीही स्वच्छ सर्वेक्षण किंवा वसुंधरा स्पर्धेदरम्यान या अधिकाऱ्यांच्या चर्चा वेगवेगळ्या कारणाने गाजल्याही आहेत...गावातल्या कचरा डेपोला आग लागते आणि हे अधिकारी घरी आहे म्हणून सांगतात... हे संताप येण्यासारखं नाही का ? डेपोला आग लागक्याचे कारण हे अद्याप सांगू शकत नाहीत हा कर्तव्यात केलेला आळशीपणा नाही का? मग तुम्हाला नीट काम करायचं नसेल तर सौरभ तात्या राजीनामा द्या म्हटले यात गैर काय? आणि तुम्ही राजीनामा देणार? की नुसतच ब्लॅक मेल करणार?हाही प्रश्न आहेच , पण एवढी मुजोरी आणि मस्ती प्रशासनाच्या नावावर करणे ही आपल्या कर्तव्याप्रति केलेली हरामखोरीच नाही का? सध्या लोक प्रतिनिधी शहरात कार्यरत नसताना प्रशासन म्हणून हे अधिकारी गावाचे मालक होऊ पाहत आहेत ? हे शहरातील लोकांना मान्य नाहीये या अधिकाऱ्यांच्या असंख्य भानगडी कानावर येत असतात मात्र सगळेच तसे असतात असे नाही पण जे तसे आहेत त्यांचा बुरखा आता टराटरा आम्ही फाडणार आहोत पालिका म्हणजे या अधिकाऱ्यांना चरायच कुरण वाटतय का?आणि म्हणून आपले कर्तव्य विसरून गावाचे मालक झाल्याची झापड या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर आलीये का? तसे असेल तर मग तीच झापड काढायची आता वेळ आली आहे 
सौरभ तात्यांनी झापलेल्या या अभियंत्याबाबत देखील अशा अनेक चर्चा शहरातील लोकांच्यात नेहमीच असतात कचरा डेपोला आग लागली तेव्हा हा अधिकारी घरात होता असे सौरभ पाटील म्हणाले तसेच या अधिकाऱ्याला या आग लागण्या मागचे कारणही सांगता येत नाही... काय म्हणायचं असल्या अधिकाऱ्यांना? आणि म्हणूनच हा अधिकारी स्वतःहुन खरच राजीनामा देणार आहे की त्याने आपली निष्क्रियता लपवण्यासाठी दिलेली ही केवळ एक पोकळ धमकी आहे ? याची खात्री होणे गरजेचे आहे अशी चर्चा आहे

No comments:

Post a Comment