Thursday, June 8, 2023

कराडच्या प्रीतिसंगमावर नदी पात्रात बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू ;


वेध माझा ऑनलाइन । कराडात प्रीतीसंगमावर  एका मुलीचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी अंदाचे साडेपाच च्या दरम्यान घडली  आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,
रेठरे धरण येथे राहणारी सेजल बनसोडे ही मुलगी कराडमध्ये नातेवाईकांकडे आली होती.नातेवाईक ती आणि तीचे कुटुंबीय प्रीतीसंगम परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यांच्यातील काही मुली  नदीपात्रात पोहण्यासाठी उतरल्या त्यांच्यासोबत नातेवाईकही होते. मात्र थोडे अंतर गेल्यानंतर त्या चार पैकी एका मुलीचा हात पोहताना सुटला आणि ती नदीपात्रामध्ये बुडाली तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. नन्तर सदर मुलीचा मृतदेह कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला

No comments:

Post a Comment