वेध माझा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका कोळशाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कातकरी समाजातील महिलेने 5 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आरोपी रफिक लतिफ शेख ऊर्फ बाळू शेख याला ताब्यात घेतले आहे15 दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे संबंधित पीडित महिलेने आपल्या जबाबात म्हणले आहे. या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पीडित महिलेने साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात राहणारी एका कातकरी समाजातील महिलेवर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका कोळसा उत्पादन करणा-या कंपनीच्या मालकासह 5 जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.पिडीत महिला 28 वर्षीय असून, तिला तीन मुलं आहेत. ती कातकरी समाजातील असून, रायगड जिल्हयातील माणगाव तालुक्यातील आहे. कामासाठी ती तिचा नवरा, सासरा आणि दोन मुलं हे सातारा जिल्हायातील फलटण तालुक्यात एका कोळसा उत्पादित करणा-या कारखान्यात कामाला लागली होती. 15 दिवसापूर्वी पिडीतेवर कोळसा कारखान्याच्या मालकासह 5 जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने आरोप केला आहे. आहे.. सध्या या प्रकरणात सातारा पोलीस सखोल तपास करत आहेत या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment