दरम्यान, रामराजेही अजित पवारांसोबत गेल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “आज ते इथे उपस्थित नाहीत याबद्दल समाधान आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मला आज त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांची जी मतं मी आज ऐकली, ते ऐकल्यावर कार्यकर्ते माझ्यावर अधून-मधून नाराज का होते, ते मला कळलंय”, असं सूचक विधान शरद पवारांनी यावेळी केलं.
Monday, July 3, 2023
साताऱ्यात शरद पवार म्हणाले...अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे ;
वेध माझा ऑनलाईन । राष्ट्रवादी चे राज्याचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील हेच आहेत अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे अजितदादां व त्यांच्या सहकाऱ्यांना अपात्र करायचं की नाही हे जयंत पाटील व सहकारी ठरवतील मात्र आमचा पक्ष फोडणार्यांना आम्ही आता धडा शिकवणार आहोत अजितदादांना अपात्र करण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाईही करणार नाही आम्ही जनतेत जाणार आहोत आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्व चव्हाण साहेबांच्या समधीस अभिवादन करून आम्ही त्याची सुरुवात केली आहे ते साताऱ्यात बोलत होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment