वेध माझा ऑनलाईन। दोन जिल्ह्याच्या हद्दीवर टोल नाका असावा असा निकष आहे, परंतु कराड तालुक्यातील तासवडे येथील टोल नाका ना जिल्हा ना तालुक्याच्या हद्दीवर आहे, त्यामुळे येथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, जे लोक कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जात असतात, त्यांना त्याठिकाणी कोणतीही सवलत दिली जात नाही, त्या स्थानिक लोकांना सवलत देणार का असा प्रश्न माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज विधानभवनात उपस्थित केला, तसेच दोन जिल्ह्याच्या हद्दीवर टोल नाका असल्याबाबतच्या निकषाबद्दल उत्तर मा.मंत्री महोदयांकडून अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.
तासवडे येथे औद्योगिक वसाहत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते, टोल नाक्याच्या जवळपास अनेक छोटी मोठी गावे आहेत, स्थानिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो, दोन जिल्ह्याच्या हद्दीवर टोल नाका असावा असा निकष आहे, परंतू तासवडे टोल नाका या निकषात बसत नाही. कामानिमित्त लोक तालुक्याच्या ठिकाणी जात असतात त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो, स्थानिकांना याठिकाणी सवलत मिळावी देणार का असा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानभवनात उपस्थित केला.
No comments:
Post a Comment