वेध माझा ऑनलाइन। संपूर्ण सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात देखील मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे कराड शहर जवळचा मार्ग जलमय झाल्याने तिथली वाहतूक मंदावल्याचे चित्र निर्माण झाले होते
आज दुपारी सुमारे तीन ते चार तास मुसळधार पावसाने शहर व परिसराला चागलेच झोडपले त्यामूळे शहराला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी साचले होते तसेच पुलाच्या सहापदरीकरण
कामामुळेही ठिकठिकाणी पाणी साठल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे वाहतूक मंदावली गेली व त्याठिकाणी एकूणच वाहतूकीची झालेली कसरत त्याठिकाणी पहायला मिळाली
शहरातील नागरी वस्तीत बहुतांशी ठिकाणी पाणीच पाणी झालेले पहायला मिळाले अनेक ठिकाणी रस्त्यातील खड्डे पाण्यानी गच्च भरलेले आढळले त्यातून गाड्या जाताना अनेक ठिकाणी इतरांच्या अंगावर पाणी उडल्याने किरकोळ वाद होण्याचे प्रकार पहायला मिळाले पाऊस सुरू झाल्यापासून व्यापार पेठेत ग्राहकांची वर्दळ खूपच कमी जाणवली लोक पावसात बाहेर पडलेच नाहीत त्यामूळे व्यापार पेठेतील उद्योग धंद्यावर या परिस्थितीमुळे आज परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिल्या सायंकाळी देखील पावसाची रिपरिप चालूच होती अनेकठिकानी पावसामुळे काहीकाळ लाईटही गेली होती
No comments:
Post a Comment